Login

भेटली तू पुन्हा ! भाग - शेहेचाळीस

भक्ती विश्वराज


भाग - 46


“कोण होतं त्या मागे ..?” ती प्रश्नार्थक नजरेन

“एकच व्यक्ती.” तो  तिच्या नजरेत बघत 

“रिया मेहता .. तिने अचूक ओळखले होते..



सहावर्षापूर्वी


विचार करतच रस्त्याने ती पुढे जात होती. राहण्याचा प्रश्न आणि पोटापाण्याचा प्रश्न तिच्या समोर उभा होता. रस्ता पार करत असतांना एक भर वेगाने गाडी तिच्या जवळून गेली..


“ ये भैताडा डोळे फुटलेत का? गाडी चालवता येत नाही तर चालवता कशाला ? रस्ता काय तुझ्या बापाचा आहे .” ती गाडीवाल्याला मोठ्याने ओरडत म्हणाली. तिचं ओरडणं ऐकून ती गाडी मागे येऊ लागली आणि क्षणातच ती गाडी तिच्या जवळ येऊन थांबली.. ब्लॅक थ्री पिस मध्ये असलेल तो बाहेर आला. डोळ्यांवरचा गॉगल काढून त्याने तिच्याकडे पाहिलं.

“ काय म्हणालीस तू ? हा रस्ता माझ्या बापाचा आहे का? तर हो हा रस्ता माझ्या बापाचा आहे. आधी तुला रस्त्यावर चालायला शिकवले पाहिजे. चालता येत नाही आणि वर मला बोलते.” 
त्याला एके ठिकाणी लवकर जायचे होते पण मध्ये आलेल्या या मुलीमुळे त्याला तिकडे जाण्यास उशीर होत होता.


“ ये डोळे गेलेत का तुझे ? की रात आंधळेपणा आहे. इतकी मोठी मुलगी तुला दिसली नाही. अपघात झाला असत माझा मग काय केलं असतं. गरिबांच्या जीवाची काही किंमत नसते तुम्हा मोठ्या लोकांना.” आधीच रागीट असलेल्या त्याला तिच्या बोलण्याने त्याच्या रागात भर पडत होती.

“एक्सीडेंट झाला असता झाला का? इतकं बोलायला ..”

“म्हणजे एक्सीडेंट झाल्यावर बोलयच. काय माणूस आहे हा. थोडी ही लाज वाटत नाही बोलायला.”

“ लाज कुणाची काढतेय यू सिली गर्ल.. तुझ्यामुळे वेळ जातोय युजलेस.” शब्दाला शब्द वाढत होता. कुणीच माघार घ्यायला तयार नव्हतं 

“ ये ये .. तू मुर्ख तुझं खानदान मुर्ख .” ती त्याच्या अंगावरच आली. ते बघून गाडीतून आणखी एक व्यक्ती बाहेर आली.. 

“ प्लिज शांत व्हा .” 

“ सॉरी मॅम ॲम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम .. आमची चूक झाली.” गाडीतून बाहेर आलेली दूसरा व्यक्ती एक हात त्याच्या छातीवर ठेऊन हलकेच मान झुकवून विनयशील होत म्हणाला. 

“ तू कशाला माफी मागतोय तिची ? तिला समोर बघून चालता येत नाही त्यात आपली चुकी नाहीये. दुसऱ्या व्यक्तीने तिची माफी मागितले हे त्या पहिल्या व्यक्तीला अजिबात पटलेलं नव्हतं. 

“ अरे आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. ” 

“ मी पण खूप खूप सॉरी . माझीही चूक झाली. माफ करा.” ती त्या दुसऱ्या व्यक्तीला मनापासून माफी मागत होती..

“ त्याला सॉरी काय म्हणतेस मला म्हणं.” त्याच्या बोलण्यात उपहास होता .

“ तू आधी मला सॉरी म्हटलेस का ? तर नाही मग माझ्या सॉरी म्हणण्याचा प्रश्न काय ? जशास तसे .” ती नाक मुरडत मोठ्या तोऱ्यात म्हणाली. ते ऐकून त्याच्या नाकपुड्या रागाने फुगल्या होत्या. डोळे लाल होत होते.

“ तुम्ही खूप जेंटलमन आहात. थोडा जेंटलनेस तुमच्या गरम डोक्याच्या मित्राला पण द्या. मुलींसोबत कसं बोलावं हे समजेल तरी.” ती त्या पहिल्या व्यक्तीच्या नजरेकडे बघून दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली.. तिच्या विषयीचा राग अगदीच उफाळून वर येत होता. रागात श्वास फुलत होता.  खुन्नस देऊनच तो तिच्याकडे बघत होता.

“ विश्वा अरे चल.” दुसरा व्यक्तीने त्याला भानावर आणले.

“ मावशी वाट बघत आहे .” तसा तो भानावर आला. तिच्याकडे रागीट नजर टाकून तो  गाडीत बसला.

“ गेला उडत, मला काय!” या अर्विभात तिनेही त्याला नाक तोंड वेडंवाकडं करून प्रतिउत्तर दिले. .

थोड्याच वेळात तो एक भल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये धावतच गेला. एका तासाआधीच तो भारतात पोहचला आणि तिथूनच हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाला होता, तोच मध्ये तिचे आणि त्याचे जबरदस्त भांडण झाले. आत गेल्यावर बेडवर एक पन्नास वर्षीय महिला तिच्या हाताला ड्रिप लावलेली, तोंडावर ऑक्सिजन मास्क लावलेला तिच्या जवळच एक काळा कोट परिधान केलेला एक माणूस हातात काहीतरी फाईल घेऊन बसलेला होता. तो जवळ आला, तसा तो काळा कोट घातलेला माणूस उठला.


“ आई ss. " त्याने आर्त हाक दिली. आई औषधांमुळे नुकतीच झोप लागली होती. जावळे वकिलांनी त्याच्या पुढ्यात पेपर ठेवले.

"ही काय वेळ आहे का जावळे अंकल?" तो काळा कोट घातलेल्या माणसावर चिडत पण हळू आवाजात म्हणाला.

"ताईसाहेबांचा हुकूमच आहे तो." जावळे वकिलांनी त्याच्या समोर पेपर पुढे केले.  नाइलाजास्तव त्याने ते पेपर वाचले आणि वाचून कपाळावर आठ्या आणि टेंशन आले.

"काय वेडेपणा घेऊन बसलीय ही ?" तो थोडा वैतागला होता ते पेपर वाचून. त्याच्या मित्राने म्हणजेच सत्यनने त्याच्या हातातील पेपर्स घेतले आणि वाचू लागला.

"व्हॉट?" पेपर वाचून सत्यनला  ही आश्चर्यच वाटले 

"बघ ना कसली डिमांड करतेय. आत्ता या वेळेला हिला काय सुचतंय सांग ना. बघ कसा हट्ट धरुन ठेवलाय हिने. सगळं माझ्यापासून लपवलं, इतकी आजारी असतांना सुद्धा ती मला काही बोलली नाही." तो या परिस्थितीत वैतागत होता . त्याच्या आईला होणारा त्रास त्याच्याने बघवत नव्हता.. 
तितक्यात डॉक्टर रूममध्ये आले.

"डॉक्टर आई कशी आहे?" विश्वराजने डॉक्टरांना विचारले.

"मि. विश्वराज तुम्ही माझ्या केबिनमध्ये या." तसा तो ताडताड डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. 

केबिनमध्ये जाऊन विश्वराज घाईघाईने म्हणाला,
"डॉक्टर माझी आई बरी होईल ना? ती पहिल्यासारखी नॉर्मल कधी होईल? डॉक्टर मी आईला असं बेडवर पडलेलं बघू शकत नाहीये."

विश्वराजने एकामागून एक प्रश्नांची सरबत्तीचं चालू केली होती. आपल्या आईबद्दल वाटणारी काळजी त्याच्या डोळ्यांत स्पष्टपणे दिसून येत होती.

"सॉरी मिस्टर विश्वराज,मी काहीच करु शकत नाही. त्यांचे आयुष्य फार कमी उरले आहे. कदाचित वर्ष,महिने,फार फार तर काही दिवस,त्यांना खूप खूश ठेवा,त्यांच्या इच्छा पूर्ण करा." डॉक्टर त्यांना धीर देत समजावत होते..

विश्वराजला मनातून खूप भरुन आले होते. सत्यनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मनातच सर्व भावना रोखून ठेवल्या. त्याला आईसमोर कमजोर दिसायचे नव्हते. तो आईजवळ गेला. तिच्या कपाळावर हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने आईला जाग आली. तिने त्याच्याकडे पाहिले आणि बाजूला तोंड केले.


“ आई s.” त्याने पुन्हा आवाज दिला पण आईने त्याला ओ पण दिला नाही . त्याच्याकडे बघितल  सुद्धा नाही.” विश्वराज नाराज झाला.
“आई ss” त्याने पुन्हा हाक दिली तरी त्यांचा नो रिप्लाय.

“ सत्यन मला इथून घरी घेऊन चल आणि माझी खोटी काळजी करण्याची गरज नाही..” आई विश्वराजकडे तिरकस नजर टाकून म्हणाली.

“ आई, लहान मुलांसारखा हट्ट का करतेय. आधीच तब्येतीबद्दल काहीच सांगितले नाहीत. वर लहान मुलांसारखे वागतेय.. हे बरोबर आहे काय.” विश्वराज जरा चढ्या आवाजात म्हणाला . 


“ सत्यन मी म्हटलं ना माझं ऐकायचं नसेल तर माझ्याशी काही बोलायची गरज सुद्धा नाही.” आई विश्वराज ऐकवत सत्यनला म्हणाली.. विश्वराजने एक सुस्कारा सोडला आणि तो रुमच्या बाहेर गेला. .

आता पर्यंत तुम्हाला समजल असेल हे टॉम ॲण्ड जेरी सारखे भांडणारे आहेत तरी कोण? दोघांच्या पास्टला सुरवात झाली आहे. .