Login

भेटली तू पुन्हा ! भाग - बावन्न

भक्ती विश्वराज
भाग - 52

"सोनाने तक्रार केली तर बुकलून काढील तुला .. चल ठेव फोन आणि विचार कर माझ्या बोलण्याचा." ती मोबाइल कानाला लावून  बोलत होती आणि विश्वा आरश्याजवळ उभा राहून तयार होत होता. त्याने तिचे संपूर्ण बोलणं ऐकले होते.
 तो तिच्याशी न बोलता तरातरा निघून गेला. तिने त्याच्याकडे नाक ओठ पुढे घेऊन दोन्ही बाजूने फिरून घेतले.

"अग गं काय हे? कोण सोना आहे ही माझी गर्लफ्रेंड अन् मलाच माहिती नाही.." पलीकडून परेश तिच्या बोलण्याने गोंधळला होता. बिचारा केव्हापासून ऐकतोय जे त्याच्या डोक्यावरून गेलं होत.


" पर्‍या हे ज्याला ऐकवायचं होतं त्यानं ऐकलं तर तू शांत बस. "

"कठीण आहे माते आमचं …"  परेशने हात जोडले.

"चल बाय  मी नंतर कॉल करते." भक्ती.

  विश्वा गाडीत बसला. सत्यन ने गाडी स्टार्ट केली.

"सत्या ही दिसते केवढी आणि बोलते केवढी. तुला माहितीये काय काय बोलत होती फोनवर .. कोणाला तरी फोनवर उपदेश चालू होते. इनडायरेक्टली मला बोलत होती. रोबोट अॅण्ड ब्ला ब्ला .." असं म्हणत विश्वाने सर्व सांगितले .

"म्हणजे ती तुलाच म्हणाली.  खरं तेच म्हणाली नं तू स्वतःला कामात इतकं व्यस्त केल आहेस की तू मनमोकळेपणाने हसला नाहीये. जगणं विसरलास.  असचं जर चालू राहिलं तर लवकरच तू म्हातारा होशील आणि म्हणेल मुझे बुढ्ढा मिल गया ." सत्यन हसत म्हणाला. त्याच्या डोळ्यांसमोर भक्ती आली आणि सकाळचा तिने केलेला ड्रामा ही न कळत त्याच्याही चेहर्‍यावर हसू पसरलं.


********************************************************

"आई माझ्या कॉलेजमध्ये कल्चरर प्रोग्रॅम आहे त्यात मी पार्टीसीपेट करतेय." भक्ती अंजलीला म्हणाली.

"कधी आहे?" अंजली.

"सॅटर्डेला ." भक्ती.


"तुझी तयारी झालीय का?" अंजली.

" नाही ना ..आता होईलच.आई मी थोड लेट आली तर चालेल नं. तुला काही प्रोब्लेम तर नाही नं." भक्तीने विचारले.

"मला काहीच प्रोब्लम नाही तू आरामत ये पण जास्त उशीर नको करूस."अंजली .

"थॅक्यू आई."   तिने आईला मिठी मारली.

ती तिच्या डान्स प्रॅक्टीसला लागली. रात्री सोफ्यावर बसल्याने  तिला झोप लागली होती. ती रुममध्ये सोफ्यावर झोपली होती. तर विश्वा स्टडीरूममध्ये लॅपटॉप वर काम करत होता. तितक्यात आई आत आली. तर ती सोफ्यावर झोपली होती.  तिला तिथं झोपललं पाहून त्यांना वाईट वाटलं.

"विशूऽऽ ." त्यांनी त्याला आवाज दिला. तो बाहेर आला.

"विशू, तुमच्यात सर्व ठीक आहे नं मग ती इथे का झोपलीय. बेडवर का नाही? "

" सर्व ठीक आहे गं. ती बुक वाचत बसलेली होती त्यातच तिला झोप लागली ते बघ तिकडे बूक आणि चष्मा आहे. " त्याने आईसमोर तिला दोन्ही हातावर उचलून बेडवर ठेवून तिच्या अंगावर ब्लॅकेट ओढले.
 
" तू मेडिसीन घेतली का? "

" हो घेतली." 

"चल तू आता आराम कर."  तो आईला रुममध्ये नेत म्हणाला. आईला रुममध्ये नेऊन बेडवर झोपवून गुडनाईट म्हणून तो बाहेर आला.

"विशू , अल्लड पोरगी आहे रे ती. जप तिला." आई पाठीमागून म्हणाली .

" हो .. तू झोप." दार लावून तो त्याच्या बेडरूममध्ये आला. ती बेडवर झोपली म्हणून तो सोफ्यावर जाऊन झोपला.

 भक्ती सकाळी उठली तेव्हा ती स्वतःला बेडवर पाहून विचारात पडली.

"कुणी आणलं मला इकडे. झोपेत चालत तर नाही आली मी. असं कधीच याआधी झालं  नव्हत .. " ती ओठांवर बोट ठेवून कपाळावर आठ्या पाडून गहन विचार करत बडबडत होती.

"आता झोपेत चालते तर ठीक होतं पण हे वेड्या सारखे बडबड करण्याचे झटकेही येतात तुला." तो भक्तीला चिडवत म्हणाला.

"अरे हे तर काहीच नाही. मला तर मारण्याचे झटके येतात. दाखवू का?" ती हाताचा बुक्का करत जबरदस्तीच हसून म्हणाली.

" तुला तर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायला पाहिजे." विश्वा.

"तुझ्यासोबत राहतेय न मी. हवं तर तसचं समजं" ती दात दातखत म्हणाली. झोपेतून उठून केसांचा मेसी बन दोन तीन बटा चेहऱ्याच्या दोन्ही गालांवर खेळत होत्या तसल्या अवतारातही खूपच क्यूट वाटली त्याला. तिच्या त्या हसण्यावर काहीवेळ तो मोहित झाला.



भक्तीच्या कॉलेजमध्ये डान्स कॉम्पीटीशन असल्यामुळे सकाळीच ती लवकर आवरून कॉलेजला जात होती. त्याच्याशी बोलायला भांडायला ही तिला वेळ नव्हता. जिंकली तर ती ती रक्कम एका छोट्या मुलाच्या डोळ्यात रंग भरणार होती म्हणून ती जीव तोडून मेहनत करत होती. अगदी उद्याच कार्यक्रम होणार होता. आजही ती रिअसल करून फार दमली होती. त्यात थोडा  ताप ही आलेला ..पायाची वाट लागली होती. थकून ती सोफ्यावर झोपून गेली. झोपेतच पाय दुखत असल्यामुळे ती कण्हत होती. पोटाजवळ पायाचे मटकुळे करून झोपली होती. विश्वाला  रात् घरी पोहचण्यासाठी रात्रीचे बारा वाजले होते. रुममध्ये आल्यावर त्याच्या कानावर तिच्या कण्हणचा आवाज पडला. तो तिच्या जवळ गेला. तिच्या कपाळावर हात ठेवला तर त्याला चटकाच बसला. तिला चांगलाच ताप भरला होता. त्याने तिला उचलून बेडवर आणलं आणि डॉक्टरांना कॉल करून बोलवून घेतले. अंजलीला सांगणं त्याने टाळलं. डॉक्टर आले त्यांनी चेक केलं. ताप खूप जास्त होता. त्यांनी मेडिसीन लिहून दिलं. 

"उदयापर्यंत टेम्परेचर कमी झालं तर ठीक नाहीतर उद्या त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल. स्ट्रिक्टली आराम करायला लावा." डॉक्टर बोलून निघून गेले. त्याने तिला उठवून औषध दिली आणि झोपवलं. त्यला आठवलं तो आजारी असल्यावर अंजली  त्याच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्टी ठेवत होती म्हणून तो एका भांड्यात पाणी घेऊन तिच्या उशाशी बसून पट्टी ठेवत होता. सकळी त्याचा डोळा लागला. तापही थोडा उतरला होता. भक्तीला जाग आली तिने डोळे उघडून पाहिले. तर  विश्वा बसल्या बसल्याच झोपी गेला होता. ती उठली आणि तयार होऊन कॉलेजला निघून गेली. विश्वाला जाग आली तेव्हा ती बेडवर नव्हती. त्याने वॉशरुममध्ये पाहिलं तर तिथेही नव्हती. अंजलीच्या रुममध्ये जाऊन पाहिल तिथेही नव्हती.

"काय झालं विशू, भक्तीला शोधतोय का?"

"हम्मऽऽ "

"अरे ती कॉलेजला गेली तिच कॉम्पिटिशनआहे."


"अंगात एवढा ताप असताना कॉलेजला जायची गरज होती का?" विश्वा तोंडात पुटपुटला.

"काही म्हणलास का तू?"अंजली.

"काही नाही मी रेडी होतो ऑफिससाठी." तो रुममध्ये तयार होऊन ऑफिसला निघून गेला. 

ऑफिसमध्ये आल्यापासून तो सर्वांवर बरसत होता. धाडधाड फायरिंग सुटली होती. त्याला अजिबात तिचं वागणं पटलेलं नव्हतं .

“काय चाललयं तुझं, का सर्वांवर तोफ बरसतोय. काही प्रॉब्लम झालय का ? तब्येत बरी नाहिये का?" सत्यनने त्याच्या कपाळाला हात लावला.”

"मला काही झाल नाहिये सत्या."

" मग चिडचिड का करतोय."

" अरे ती महामाया.."

" कोण महामाया?" त्याने न समजून विचारले.
 
" दूसरी कोण असणारं?

" भक्ती ?"

" हो तीच ."

" का काय झालं?"

" तब्येत बरी नसतांना कॉलेजला गेली. डॉकटरांनी स्ट्रिक्ली आराम करायचा सांगितला होता पण ही तर माहितीच आहे तुला." सुस्कार सोडत म्हणाला.


"काय? तिला बरं नाहिये."  सत्यन मोठ्याने म्हणाला आणि त्याची काळजी पाहून विश्वाच्या कपाळावर आठ्या पडल्या.

" म्हणजे ती माझ्या बहिणेसारखी आहे नं ." सत्यन शांत आवाजात म्हणाला.

" मग सांगा तुमच्या बहिणाबाईला नको तिथे शाहणपणा करू नये."

"आधी भेटू तर दे चांगलीच कान उघडणी करावी लागेल." सत्यन मनात म्हणाला.

" मी बोलतो तिला." सत्यन म्हणाला आणि केबिनच्या बाहेर निघाला तोच पुन्हा आत आला.

" अरे विसरलोच संध्याकाळी M .K .G. कॉलेजला आपल्याला चिफ गेस्ट म्हणून जायचं आहे लक्षात ठेव." सत्यन बोलून निघून गेला. कॅबिनच्या बाहेर येऊन तो कॉल करत होता पण सद्ध्या पलीकडचा मोबाइल बंद दाखवत होता. त्याने त्या नंबरवर मॅसेज टाईप करून पाठवला. त्याने रागात मोबाइल पॉकेटमध्ये टाकला.
सत्यनच्या चेहर्‍यावर टेंशन दिसत होते. वाट पाहण्याखेरीज त्याच्या हातात काहीही नव्हते.


क्रमश ..