भाग - 53
कॉलेजच्या गेटमधून एक अलिशान गाडी आत आली आणि त्यातून दोन हॅण्डसम हंक उतरले. कॉलजचे ट्रस्टी प्रिन्सिपल स्वतः त्यांना घ्यायला आले. बुके देऊन त्यांच स्वागत झालं. त्या दोघ युवकांना त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्यांचा सोबत नाश्ता कॉफी वगैरे घेतली आणि कार्यक्रमाला सुरवात झाली. सर्वात पहिले त्यांची ओळख करून दिली. त्याने सर्वांना
"हॅलो गाईज, सर इतकेही फॉर्मल होऊ नका मी आजही या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. " त्याने हसत म्हटलं. तसं कित्येक मुली त्याच्याकडे आवासून पाहतच राहिले. त्या दोघांची पर्सनॅलिटी एकदम जबरदस्त होती. ओळख झाल्यावर खाली असलेल्या चेअर वर बसले. जजेसही त्यांच्या ठरलेल्याजागी स्थानापन्न झाले होते आणि क्रार्यक्रम सुरू झाला.. एक एक परफॉर्मन्स होत होते. हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडात होत होता. शेवटचा एक परफॉर्मन्स राहिले होता.. विश्वा घरी जाण्यासाठी आग्रह करत होता. त्याचे क्रार्यक्रमात अजिबात लक्ष नव्हते. तो तर सतत मोबाइल उघडून पाहत होता.
"सत्या मी निघतो. तू थांब हवंतर ती महामाया अजून काही आली नाही." शेवटच वाक्य तो हळू आवाजात म्हणाला.
" लास्ट परफॉर्मन्स आहे. विनर डिक्लेअर करतील मग जाऊया."
" अरे..
“ जस्ट फाइव्ह मिनिट .”
“ हं ." नाराजीने तो समोर बघत होता.
पूर्ण अंधार झाला. एक स्पॉट लाईट लागली. मधोमध कृष्ण तिरकस उभा राहून डोक्यावर मोरपीस अटकवलेली आणि हातात मुरली घेतलेली आणि कृष्णाच्या खाद्यांवर हात ठेवून त्यावर मान ठेवून डोळे बंद करून ती मुरलीची धून ऐकण्यात गुंग झाली होती.
वो है रँगीला छैल छबीला
वो है नट्खट वो जमुना तट
फेरे लगाये, मुरली बजाये
गोपियों के संग रास रचाए
मुरली बजैया रास रचैया
श्याम सलोना है…
राधा कृष्णासोबत नृत्य करत होती. ती त्या अँक्ट सोबत इतकी समरस झाली होती की स्वतःला विसरून गेली. ती राधा होती कृष्णाची राधा.
भक्तीला त्या वेशभूषेत स्टेजवर बघून तो अंचबित झाला.
भक्ती देहभान विसरून नृत्य करण्यात हरपली होती तिचं ते रूप पाहून विश्वाला आणखी एक शॉक बसला होता. भक्ती इथे असेल हे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिच ते मनमोहक रूप पाहून त्याचे डोळे बाहेर यायचे बाकी होते. गाणं संपल तसं हॉलमध्ये सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. विनर घोषित झालं आणि त्या दोघांना स्टेजवर आमंत्रित केलं. भक्ती आणि प्रियांश यांनीसोबत नृत्य केले. त्यांना बोलवलं आणि बक्षिस देण्यासाठी विश्वाला बोलवलं. आता शॉक बसायची वेळ भक्तीची होती. तो इथे चिफगेस्ट म्हणून येणार हे तिलाही माहित नव्हते. त्याला समोर पाहून तिची भितीने वाट लागत होती. स्वतःला नॉर्मल करत विश्वाच्या हातून पारितोषिक आणि घेऊन हलकी स्माईल करत ती जायला वळली. दोन पावलं उचलली की तिला गरगरायला लागलं आणि प्रियांशने तिला कमरेतून पकडलं तस विश्वाच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या. भक्तीने डोळे बंद केले. प्रियांश तिला उचलणार तोच विश्वा पुढे येवून तिला उचलून घेतले. सत्यनला ही शॉक बसला होता. भक्तीची अवस्था पाहून त्याला वेदना होत होत्या. ती बेशुद्ध पडताच विश्वाच्या हृदयातून कळ निघाली. सत्यनही पाठोपाठ गेला. विश्वाने गाडीत मागच्या सीटवर तिला ठेवले आणि तो दुसऱ्या साईडने तिच्या जवळच बसला. सत्यनने पटकन ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी स्टार्ट केली. मध्येच विश्वराज तिच्या गालावर थपथपवून उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता.. सत्यन ही मध्येच मागच्या आरशातून तिलाच बघत होता. बेशुद्ध पडल्यावर तो ही कासावीस झालेला होता..
“सत्यन ही उठत का नाहीये. काय गरज होती इथे येण्याची .. काय अवस्था झाली.” विश्वराज काळजीने चिडत बडबडत होता..
“रिलॅक्स विश्वा … काही नाही झालयं तिला … विकनेस मुळे झालं असेल .” सत्यन विश्वराजला समजवत होता की स्वतःला हे त्यालाच समजत नव्हतं.
हॉस्पिटल आलं तस त्याने पटकन तिला दोन्ही हातांवर उचलून गाडीच्या बाहेर आणलं. बाहेरच स्ट्रेचर घेऊन वॉर्डबॉय आणि सिस्टर उभे होते. सत्यनने आधीच फोन करून सांगितले होते. ती आत जाताच डॉक्टरांनी तिला चेकअपला घेतलं.
“ मिस्टर विश्वराज मी तुम्हाला सांगितल होतं ना त्यांची काळजी अन्यथा ॲडमिट करावं लागेल. ..” त्यांनी तिच्या हाताला ड्रिप लावली..
“ साँरी डॉक्टर.” तो इतकेच म्हणाला.
“थोड्यावेळाने शुद्धीवर येतील .”
“एक्सक्युज मी .” म्हणत डॉक्टर निघून गेले.
ती निपचित होऊन बेडवर पडली होती आणि तो एकटक भक्तीकडे पाहत होता. सत्यनने त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर दिला.
“का ऐकत नाही रे ही माझं, नेहमी माझ्या निर्णयाला विरोध करत असते. आज तिला काही झालं असतं म्हणजे? ती आपल्या जबाबदारीवर आली आहे. तिला काही झालं म्हणजे ? .." विश्वा अस्वस्थ झाला होता पण का हेच कारण होत का त्याच्या अस्वस्थ होण्यामागे की आणखी दुसरचं सद्ध्या त्याला काही कळत नव्हतं पण तिच्या बद्दल काहीतरी होत जे त्याला वारंवार तिच्याकडे खेचत होत.
“डोन्ट वरी ती ठीक होईल." सत्यन म्हणाला पण तोही आतून घाबरला होता.
काही वेळानंतर तिला शुद्ध आली तसं डॉक्टरांनी तिला तपासले. तर ठीक असल्याचे सांगितले.
"मी घरी जाऊ शकते ?"तिने बारीक आवाजात विचारले.
"नो , नेव्हर .. तीन दिवस तर नाही . डॉक्टर म्हणाले तसा तिचा चेहरा उतरला.
बाहेर प्रियांश आणि त्यांचा ग्रूप तिची शुद्धीत येण्याची वाट पाहत होता. ती शुद्धीत आल्यावर प्रियांश आत आला आणि भक्तीजवळ जाऊन उभा राहिला. त्याला पाहून विश्व राजच्या कपाळावर आठ्यांच जाळ पसरलं .. हातांच्या मुळी आवळल्या गेल्या. प्रियांशने तिचा हात हाती घेतला आणि म्हणाला.
"तू काळजी करू नकोस भक्ती. मी त्या मुलाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलय. उद्याच त्याचं ऑपरेशन होणार आहे." प्रियांश म्हणाला तशी तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली.
"थॅक्यू प्रियांश थँक्यू सो मच." भक्ती हसत म्हणाली. इकडे विश्वाचा राग वाढतच होता.
"काळजी घे भक्ती, निघतो आम्ही." प्रियांश.
सर्व ग्रुप मेंबर भेटून निघून गेले. ते गेले तसे विश्वा तिच्याजवळ आला आणि म्हणाला,
सर्व ग्रुप मेंबर भेटून निघून गेले. ते गेले तसे विश्वा तिच्याजवळ आला आणि म्हणाला,
" तुला नाही म्हणालो होतो ना मी मग काय गरज होती जायची. इतकी महत्त्वाचं होतं तुला .. या कॉम्पिटिशनमध्ये गेली नसती आणि हरली असती तर काय मोठं बिघडणार होतं तुझं .. तुला काही झालं असतं म्हणजे ? " विश्वा पॅनिक होत म्हणाला तसे तिचे डोळे मोठे झाले. ती त्याच्या चेहर्यावरचे हावभाव पाहत होती.
“अंऽऽ ?" भक्ती त्याच्याकडे पाहून म्हणाली..
“म्हणजे तू माझी जबाबदारी आहे. करार आहे आपला." तो स्वतः ला सावरत म्हणाला. करार शब्द ऐकून तिने चेहरा निर्विकार केला.
" हे कॉम्पिटिशन जिंकणं माझ्यासाठी महत्वाचं होतं मिस्टर विश्वराज .." ती कोरडेपणाने म्हणाली.
"विश्वा चल तिला आता आराम करू दे." सत्यनने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.. विश्वा ताडकन उठून बाहेर निघाला. हॉस्पिटलच्या रुममध्ये सत्यन आणि भक्तीच होते.
" कसं वाटतयं बच्चा तुला ? जीव घेतेस की माझा, घाबरलो होतो न मी."
"मी बरी आहे दादू आता पण या सर्कीटचा फ्यूज का उडालाय?"
"मी सांगेल नंतर आधी तू आराम कर ." असं बोलून तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो बाहेर निघून गेला.
विश्वा बाहेर आल्यावर मनातच धुसफुसत होता.
" ती अशी कशी बोलू शकते माझ्यासोबत. मी का काळजी करतोय तिची? अफकोर्स ती माझी जबाबदारी आहे. माणुसकीच्या नात्याने मी काळजी तर करणारच." विश्वा त्याच्या मनातील प्रश्नांची उत्तरं स्वतःच देत होता..
त्याने डॉकटरांसोबत बोलून डिस्चार्ज करून घेतला होता. डॉक्टरांनी सक्तीचा आराम करायला सांगितला. डॉक्टरांनी त्यांच्या सोबत एक नर्स ही दिली.
घरी आल्यावर विश्वा तिला दोही हातांवर उचलून त्यांच्या रूममध्ये आणून बेडवर ठेवलं.
सिस्टर ही रूमच्या बाहेर ही दिसली तर तुमची नोकरी गेलीच समजा." विश्वाने त्या नर्सला एक प्रकारची धमकीच दिली..
"हो सर ." नर्सने आवंढा गिळला. प्रश्न सिस्टरच्या नोकरीवर आला होता म्हणून तिही शांतच बसली.
क्रमश ..
