Login

भेटली तू पुन्हा ! भाग - छपन्न

भक्ती विश्वराज
भाग - 56

आणि विश्वराज फ्रेश होऊन बाहेर आला. 
बाहेर सत्यन, विश्वा चहा पित गप्पा मारत बसले होते की, भक्ती त्याच्या मागे येऊन उभी राहिली. तिने ब्ल्यू टॉप आणि जीन्स घातली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. डोळ्यांत एक चमक होती.  साध्या अवतारातही ती सुंदर दिसत होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. तीही त्याच्याकडे पाहत होती. भक्ती बाजूला झाली तसे त्याचे डोळे मोठे झाले आणि चेहर्‍यावर मोठ्ठी स्माईल आली. त्याच्यासमोर त्याची आई जीन्सटॉप आणि डोळ्यांवर गॉगल लावून उभी होती. तो आश्चर्याने पाहत होता.

"आई." विश्वाने आवाज दिला.

"यू कॉल मी मॉम. बरोबर ना." अंजली भक्तीला टाळी देत म्हणाली आणि त्याला दुसरा धक्का बसला.

"ओ माय माय मासी यू लुकिंग सो ब्युटीफूल." सत्यन ही त्यांच्याच अंदाजात अंजलीला मिठी मारत म्हणाला.

"आई खूप गोड दिसतेस तू." विश्वराजने अंजलीला मिठी मारली.

"अजून एक सरप्राईज बाकी आहे." असं म्हणत तिने शिट्टी वाजवली आणि एक बाईक तिच्यासमोर उभी राहिली. अंजलीपुढे जाऊन बाईक वर बसली आणि तिच्या मागे भक्ती बसली. अंजलीने बाईक स्टार्ट करुन निघाली.विश्वा तर पाहतच राहिला अंजली गेली त्या दिशेने, त्याने पटकन दुसरी बाईक घेतली. तो आणि सत्यन गाडीवर बसून त्यांच्यामागे गेले. विश्वाला भक्तीचा  भयंकर राग येत होता. सत्यन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता.अंजली सराईतपणे गाडी चालवत होती. एक राऊंड मारुन ते घरी आले. अंजली खूप खूश होती. तो आनंद तिच्या चेहर्‍यावर दिसत होता. विश्वा पटकन भक्तीचा हात पकडून  जोरात खेचून तिला बाजूला घेऊन गेला.

"तुला काही अक्कल आहे का? आईची कंडीशन माहितेय न तुला तरीही तू घेऊन गेलीस. तिला काही झालं असतं, तर मी तुला सोडलं नसतं." तो तावातावाने बोलत होता. दंडावरची पकड घट्ट झाली होती. तिचा हात दुखायला लागला होता.त्याचा त्रास भक्तीच्या चेहऱ्यावर दिसत होता.

"आहऽ हात सोड माझा दुखतोय." ती कळवळली. लगेच तिच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याला तिचे अश्रू दिसले अन् हाताची पकड आपोआप  सैल झाली. ती त्याचा हात झटकून निघून गेली. तोही निघून गेला.


"आई तू बरी आहेस ना?" विश्वा अंजलीजवळ येऊन काळजीने म्हणाला. 

"हो विशू मी ठीक आहे. खूप फ्रेश वाटतयं मला." अंजली उत्साहात म्हणाली. भक्ती चेहरा ठीक करुन स्माईल करत आली.

"थँक्य यू बाळा, मला खूप इच्छा होती अशी मस्त बाईक चालवायची पण कधी वेळच मिळाला नाही." ती हसून भक्तीला म्हणाली. ती हसली आणि तिच्या समोर येऊन बसली. हे ऐकून तर विश्वाला अपराधी वाटत होते. रागाच्या भरात तिला दुखावले होते.

"तू खुश ना बस्स ! अपुन को फिर क्या चाहिए." ती तिच्या अंदाजात म्हणाली. विश्वाच्या चेहऱ्यावर हलकेच हसू पसरले. अंजलीने भक्तीचा चेहरा ओंजळीत घेतला आणि कपाळावर ओठ ठेवले. 

"तू लवकर का नाही आलीस?" अंजलीने भक्तीला विचारले.

"यानेच उशीर केला मला आणायला. मी तरी काय करु?" भक्ती विश्वाकडे बोट दाखवत म्हणाली. विश्वा दोघींना न्याहाळत होता, भक्ती आल्यापासून आई जास्तच खुश राहत होती. थोड्यावेळापूर्वी तो तिच्यावर रागवला होता. आता तिला सॉरी म्हणायचे होते याचाच विचार तो करत होता आणि ती तर त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती.

विश्वा विचार करत असतानाच सत्यन त्याच्याजवळ आला.

"काय रे काय झालं इतका कसला विचार करतोय?" 

"ते मला भक्तीला सॉरी म्हणायच होतं." विश्वा.

"का?"

"कारण मी खूप बोललो, तिला दुखावलं "विश्वा.

"बरं मग कसली वाट पाहतोय." सत्यन.

"तिचीच वाट पाहतोय ती तर पाहतही नाहिये माझ्याकडे." विश्वा चेहरा पाडत म्हणाला.

"कशी पाहणार तुझ्याकडे, तू दुखावलं आहे तिला आणि रागाच्या भरात खूप काही बोलून जातो त्यात तुला काही दिसतही नाही आणि समजत ही नाही. "सत्यन.

"काय करु सत्या?" विश्वा सत्यनकडे पाहत म्हणाला.

"ते तुझं तू पहा, मी काहीच नाही करु शकत." सत्यन बोलून निघून गेला. सगळ्यांशी हसून बोलणारी भक्ती, त्यानंतर त्याच्याशी बोलली नाही आणि त्याच्याकडे पाहिले देखील नाही. जेवण झाल्यावर तो रुममध्ये तिची वाट पाहत बसला पण ती आलीच नाही. वाट पाहता पाहताच त्याला झोप लागली अन् तो झोपून गेला. खूप उशिरा ती रुममध्ये आली तर तो झोपला होता, मग फ्रेश होऊन तिने मलम घेतला आणि थोडा सैलसर असा ड्रेस घातलेला होता. तिने दोन्ही दंडांना हळूवार मलम लावला.  दंड चांगलाच लाल झाला होता. विश्वाच्या बोटांचे ठसे तिच्या दुधाळ गोऱ्या रंगावार उमटले होते. उशी घेऊन ती सोफ्यावर जाऊन झोपली.
सकाळी नेहमीच्या वेळी तो उठला तर त्याला बेडवर भक्ती दिसलीच नाही तो उठून त्याने बाजूला पाहिले तर ती सोफ्यावर झोपलेली होती.


"बेडवर सुद्धा आली नाही ती, माझा खूपच राग आलाय वाटतं आणि मी ही वाट बघत मला बेडवरच झोप लागली." तो स्वतःशी म्हणाला. तो तिच्याकडे पाहत होता आणि पटकन उठून तिच्याकडे गेला, कारण भक्ती सोफ्यावरुन पडत होती. त्याने लगेचच तिला दोन्ही हातांवर उचलून बेडवर झोपवलं. अशातच त्याचं लक्ष तिच्या दंडावर गेलं, तर त्याला तो दंड लाल झालेला दिसला. त्याने तिच्या दंडावर उमटवलेली लाल नक्षी पाहून, त्याला जास्तच गिल्ट येऊ लागले होते. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिर झाली. रेखीव भुवया, लांब तरतरीत नाक, लाल डाळींबच्या दाण्यासारखे लाल चुटूक ओठ तो क्षणभर पाहतच राहिला. पाहता पाहता तो तिच्या ओठांच्या जवळ आला होता. त्याच हृदय तेज गतीने धडधड करत होतं. कसेबसे त्यानं मनाला आवरलं आणि बाहेर जिमला निघून गेला. 

" काय करत होतो मी तिच्या ओठांना .." विश्वाचं एक मन म्हणाला.

" किस करत होता आणि काय करत होता. तिच्या ओठांकडे बघून त्या ओठांवर झुकला होता तू आणि पुन्हा विचारतो मला काय करत होतो म्हणून?" त्याचं दूसर मन.

" पण मी का झुकलो तिच्या ओठांवर? बरं झालं तू आवरलसं नाहीतर मी तिच्या लाल ओठांवर ओठ ठेवून किस केलं असतं." त्याच पहिल मन ."

"इंडियट तू मला जर आवरलं नसलं तर मी त्या लाल स्ट्रॉबेरी सारख्या ओठांच्या साखरपेरणीत गुंतलो असतो पण तू का अडवलसं मला?" त्याचं दूसर मन चिडून म्हणालं.

मनाच्या संवादात तो वैतागला होता. त्याने दोन्ही हाताने गच्च पकडलं आणि मोठ मोठे श्वास घेऊन तो मनाला शांत करत होता.


थोड्यावेळाने भक्ती उठली तर तिला ती बेडवर दिसली अन् कपाळावर आठ्या आणून ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. फ्रेश होऊन अंजलीला भेटली. त्यांच्यासोबत नाश्ता केला, त्यांना गोळ्या दिल्या. 


दोन तीन दिवस भक्तीने अंजलीच्या  बकेटलिस्ट मधील इच्छा पूर्ण केल्या. या दिवसात ती अंजलींना एक मिनिटांसाठीही दूर ठेवल नव्हतं. कायम त्यांच्या सोबत राहत होती. भक्ती अंजलीची तिच्या परिने काळजी घेत होती.आणि सगळ्यांचा निरोप घेऊन परत मुंबईला रवाना झाले. या दिवसात सतत बोलणारी ती एकदाही त्याच्याशी बोलली नाही. त्याने ही खूप प्रयत्न केले तरीही ती बोलत नव्हती. त्याने सॉरी कार्ड लिहून ठेवले तर तिने ते डस्टबिन मध्ये त्याच्यासमोरच फेकले. फुल देवून झाले पण काहीच नाही. तिला चॉकलेट्स आणले तर तिने ते सगळ्यांना वाटून दिले. राग तर कधीच गेला होता, पण तिला तो दाखवायचा नव्हता ना भक्ती मॅडमला. भक्ती त्याच्यासोबत बोलत नसल्यामुळे त्याच्याशी भांडण नसल्यामुळे त्याला अस्वस्थ वाटत होते. त्यात तिचं दोन तीन वेळा संजूशी बोलणे ऐकून त्याला संजू विषयी उत्सुकता लागली होती. संजू कोण, तिचा मित्र की प्रेम करते ? कोणी का असेना, असंही एक वर्षापर्यंत ती आपल्या सोबत आहे नंतर ती निघून जाईल. पण मी इतका विचार का करतोय तिचा? कारण मला ती आवडायला लागली की प्रेम करायला लागलो तिच्यावर? का अस्वस्थ होतंय मला ती बोलत नाहीये तर? का मी तिच्यामागे घुटमळतोय.' असे भलतेसलते प्रश्न निर्माण होत होते. या प्रश्नाने त्याला जास्तच अस्वस्थ होत होते.

क्रमश ..