Login

भेटली तू पुन्हा ! भाग - सत्तावन्न

भक्ती विश्वराज
भाग - 57



दोन तीन दिवस भक्तीने अंजलीच्या  बकेटलिस्ट मधील इच्छा पूर्ण केल्या. या दिवसात ती अंजलींना एक मिनिटांसाठीही दूर ठेवल नव्हतं. कायम त्यांच्या सोबत राहत होती. भक्ती अंजलीची तिच्या परिने काळजी घेत होती.आणि सगळ्यांचा निरोप घेऊन परत मुंबईला रवाना झाले. या दिवसात सतत बोलणारी ती एकदाही त्याच्याशी बोलली नाही. त्याने ही खूप प्रयत्न केले तरीही ती बोलत नव्हती. त्याने सॉरी कार्ड लिहून ठेवले तर तिने ते डस्टबिन मध्ये त्याच्यासमोरच फेकले. फुल देवून झाले पण काहीच नाही. तिला चॉकलेट्स आणले तर तिने ते सगळ्यांना वाटून दिले. राग तर कधीच गेला होता, पण तिला तो दाखवायचा नव्हता ना भक्ती मॅडमला. भक्ती त्याच्यासोबत बोलत नसल्यामुळे त्याच्याशी भांडण नसल्यामुळे त्याला अस्वस्थ वाटत होते. त्यात तिचं दोन तीन वेळा संजूशी बोलणे ऐकून त्याला संजू विषयी उत्सुकता लागली होती. संजू कोण, तिचा मित्र की प्रेम करते ? कोणी का असेना, असंही एक वर्षापर्यंत ती आपल्या सोबत आहे नंतर ती निघून जाईल. पण मी इतका विचार का करतोय तिचा? कारण मला ती आवडायला लागली की प्रेम करायला लागलो तिच्यावर? का अस्वस्थ होतंय मला ती बोलत नाहीये तर? का मी तिच्यामागे घुटमळतोय.' असे भलतेसलते प्रश्न निर्माण होत होते. या प्रश्नाने त्याला जास्तच अस्वस्थ होत होते


"कोणाचा विचार करतोय भक्तीचा?"

"हो." तो नकळत बोलून गेला आणि लगेच भानावर येऊन त्याने स्वतः ला सावरले.

"ते .. म्हणजे .. ते  .. मी हा विचार करतोय की आई खुप खुश आहे ना भक्ती आल्यापासून." विश्वा अडखळत म्हणाला.

"हो मावशी एकटीच तर खूश आहे. तू कुठे खूश आहे ती तर तुझ्याशी भांडत असतेस." सत्यन त्याच्या चेहर्‍यावरचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न करत होता.

"ती तर बोलली नाही आणि भांडलीही नाही माझ्यासोबत." तो उदास झाला होता.

"म्हणून बारा वाजलेत चेहऱ्यावर मग सरळ जाऊन बोल की, तुझ्याशिवाय करमत नाही प्रेमात पडलोय तुझ्या." सत्यन.

"असं काही नाहीये." विश्वा नजर चोरत म्हणाला.

"मग तू का अस्वस्थ होतोस? का लक्ष लागत नाहीये तुझं? का विचार करतोय इतका? फार्महाऊसवर तिच्यासोबत मॅच खेळलास, कधी नव्हे तू हसायला लागलास. सर्वांसोबत वेळ घालवतोय नाहीतर नुसतं काम आणि काम हेच तुझं जग होतं. " सत्यन त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला. तितक्यात विश्वाचा फोन वाजला आणि बाहेर निघून गेला. फोन वर बोलून झाल तसं तो पुन्हा विचारात पडला .

'खरचं मी प्रेमात पडलोय का तिच्या? तिचं बोलणं, चिडवणं आणि भांडण आवडायला लागलयं.  सत्या जे बोलतोय ते बरोबरच बोलतोय.' यावेळी त्याच्या मनाने प्रश्नाच बरोबर उत्तर दिले आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले.

"काय मग भेटलं का उत्तर?" त्याला एकटाच हसत असताना पाहून सत्यनने विचारले.

"हो भेटलं माझं उत्तर मला." विश्वाने हसतच सांगितले आणि सत्यनला आनंदाने मिठी मारली.


सकाळी भक्तीचा मोबाईल वाजला, तेव्हा ती बाथरुममध्ये होती. फोन वाजतोय म्हणून तो टेबलजवळ गेला. त्याला स्क्रिनवर संजू हे नाव दिसले. ते पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"या संजूला हिच्याशिवाय चैन पडतं नाही का? या संजूच काहीतरी करायलाच पाहिजे." विश्वा मनाशी काही ठरवून ऑफिससाठी तयार होऊन बाहेर न्यूजपेपर वाचत बसला मग भक्ती ही तयार होऊन बाहेर आली. अंजलीला नाश्ता देऊन डायनिंग टेबलवर त्याच्यासाठी नाश्ता लावला. तिच्या बांगड्याच्या किणकिणने तो न्यूजपेपर ठेवून वर बघतो, तर तिने आज पिंक अँड व्हाईट फ्लॉवर प्रिंट असलेला चुडीदार ड्रेस घातला होता. केस पिन मध्ये अडकवून बाकीचे मोकळे सोडलेले, एका हातात बांगड्या आणि एका हातात तिचं नेहमीच घड्याळ, चॉकलेटी डोळ्यात बारीक अशी काजळाची रेघ ओढलेली, दाटसर पापण्या, ओठांवर हलकी पिंकशेड लिपस्टिक लावलेली. तो तर तिच्याकडे एकटक बघतच राहिला. हृदय जोराने पळत होते. भक्तीने स्वतःला वाढले आणि अंजलीसोबत गप्पा मारत खाऊ लागली. विश्वा तर खातांनाही मध्ये मध्ये तिच्याकडे पाहत होता. तिही डोळ्यांच्या कड्यातून त्याला पाहत होती. त्याचे पूर्ण लक्ष तिच्याचकडे होते, ती बोलत असताना तिच्या ओठांची मोहक हालचाल त्याला वेड लावत होती.

"आईऽऽग्गं" तो हळूच म्हणाला.

" हूँ , बोल ना काय म्हणतोय, काही त्रास होतोय का?" त्याच्य छातीवर हात बघून अंजली त्याला काळजीने विचारले.

"काही नाही असं वाटतं माझं हृदय बंद पडणार." तो एकनजर भक्तीकडे बघत म्हणाला.

"विशू, काही काय बोलतो आधी डॉक्टरांना दाखवून ये बरं." अंजली काळजीने म्हणाली.

"आई त्याची डॉक्टरीण बघत नाही त्याच्याकडे मग दुखणारच नं." विश्वा मिश्किल हसत म्हणाला. तेव्हा कुठे अंजलीला विश्वाचा बोलण्याचा रोख समजला.. दोघांच्या चेहऱ्यांचे निरिक्षण करत होती.. विश्वाराज तिच्याकडे बघत ओठांत हसत होता. तर ती त्याच्याकडे पाहत नव्हती. दोघांच काही असेल म्हणून ती काही बोलली नाही.


 भक्तीला तर मनातून खूप हसू येत होतं, पण तिने चेहऱ्यावर तसे दिसू दिले नाही..

"आई, माझ्याकडे हार्टसाठी हेल्दी फूड आहे. मी आलेच हं ." तिने विचार केला मग  ती किचनमध्ये गेली. आणि पटापट तिने हात चालवून ट्रे मध्ये घेऊन आली आणि त्याच्या समोर ठेवले.

"काय आहे हे?" त्याने झाकलेल्या डिशकडे पाहत विचारले. तिने त्या पॉटवरचे झाकण बाजूला केले तर तिथे हिरवा पदार्थ दिसला. एका ग्लासमध्ये ग्रीन ज्यूस होते.

"काय बनवलं बाळा तू ?" अंजलीने विचारले.

"आई, माझी एक मैत्रीण हृदय तज्ञ आहेत तिनेच सांगितलं होतं मला, हा कारल्याचा ज्यूस, कारल्याचा हलवा आणि हे कारल्याचे पराठा." ती एक एक वस्तू दाखवत म्हणाली. विश्वाने सर्व पाहून डोळेच मोठे केले.

"इतकं मी नाही खाऊ शकत तू ही खा थोडं." विश्वा भक्तीला म्हणाला .

"माझ हृदय एकदम ठिकठाक आहे. मला नाही याची गरज ते तुम्हीच खावा आणि हे जर खाल्ले तरच माफी मिळणार." ती हसत म्हणाली. त्याने एक सुस्कारा सोडला.
त्याने खायला सुरवात केली. तो खात होता आणि भक्ती त्याला डोळे मोठे करुन पाहत होती. भक्तीला वाटत होते, त्याची मज्जा येणार तो खाणार नाही. पण तो कुरबूर न करता चेहरा वाकडातिकडा न करता खात होता आणि तिच्याकडे स्माईल देत खात होता त्यात तिला त्याचा जास्तच राग येत होता. तिने मनात वैतागतच कपाळावर हात मारुन घेतला.

"फिनिश. छान झाले होते सर्व पदार्थ, पुन्हा बनवशील." त्याने सर्व संपवले. तिला हसत म्हणाला.

"कारल्याला कारलचं आवडणार नं." ती हळूच म्हणाली पण त्याला हे ऐकू गेले. तो गालात हसला आणि रुममध्ये गेला.

"आई याने कसं काय संपवलं?" तिने अंजलीला आश्चर्यचकीत होऊन विचारले. तिला अजूनही त्याचं आश्चर्य वाटत होत.

" मुळात तो कारले आवडीने खातो. तेही कच्चे." अंजली म्हणाली आणि तिनेच ते खाल्ले असे वाटू लागले आणि तिने तोंड वेडवाकडे केले. तिला पाहून आई हसायला लागली.

"कडू कारलं यॅकऽऽ." त्या विचारानेच तिला मळमळायला लागले.
 ती वर धावतच गेली. ती बेसिन जवळ जाऊन खाल्लेला नाश्ता बाहेर काढला.

'मला नुसता विचार आला तर उल्टी झाली याने तर खाल्लं, मानलं पाहिजे याला.' ती मनातच त्याला दाद देत म्हणाली.

"पूर्ण खाऊन तुझी अट पूर्ण केलीय मी, तर आता मला  माफी मिळायला पाहिजे. सॉरी त्या दिवशी काहीही विचार न करता तुला खूप बोलून गेलो. आय एम रेली सॉरी.  आईच्या तब्येतीची काळजीपोटी मी जास्त बोलून गेलो पण तू आल्यापासून आई खूप खुश आहे. त्यासाठी थॅक्य यू.”  विश्वा तिच्यासमोर येत म्हणाला.

"ठीक आहे केलं माफ." 

"मी इतकं कडू खाल्लं तर मला काही स्वीट मिळायला पाहिजे नं." तो तिच्याकडे मिश्कीलपणे हसत म्हणाला.

"ठीके आणते मी खाली जाऊन." ती म्हणाली आणि जायला वळली तर त्याने तिचा हात पकडून तिला 
 जवळ ओढले तिने त्याच्या छातीवर हात ठेवले

"मला हे स्वीट हवयं." तो तिच्या गालावर आणि ओठांवर बोट फिरवत म्हणाला. त्याच्या जवळ ओढल्याने तिचं हृदय स्पीडने धावत होत. तो जवळ आला की पोटात काहीतरी ढवळाढवळ होत होती. आता ही पोटात गुळगुळ करत भांगडा चालू झाला होता. ती मूर्तीसारखी उभी राहून टकमक पाहत होती. तिला काहीच कळत नव्हते. त्याने गालावर हलकेच ओठ टेकवून तो खाली निघून गेला तरी ही मूर्ती सारखी डोळे वटारुन बघतच होती.फोनच्या रिंगने ती भानावर आली तोपर्यत विश्वा ऑफिसला निघून गेला होता.

ती कितीतरी वेळ गालावर हात ठेवून होती.. 

“ भक्ती गालाला काय झालं असा हात का ठेवून आहेस. काही लागलय, दुखतयं का?” 

“ नाही .. दुखत नाहीये.” तिने पटकन गालावरचा हात काढला.. 

“आई मी जरा बाहेर जाऊन येते..”

“ बरं जा सांभाळून .”

“हो.” म्हणत तिने पर्स हातात घेऊन घराच्या बाहेर पडली.

विश्वराज ऑफिस मध्ये आल्यावर सकाळी झालेल्या गोड क्षणांमध्ये हरवला होता. तिचे बावरून मोठे झालेले डोळे लुक लुक करून त्यांच्याकडेच पाहत होते. ते आठवूनच त्या ओठांवर स्माईल आली.. तिचं त्याच्याजवळं असणं हवंहवसं वाटत होतं. पहिल्यांदाच तो कोणत्या तरी मुलीचा म्हणजेच भक्तीचा विचार करत होता.

क्रमश..