Login

भित्यापाठी ब्रह्मराक्षस भाग एक

डर के आगे जीत है

जलद कथा लेखन.

       भित्यापाठी ब्रम्हराक्षस.

               भाग _ एक.

   रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे छोटे मोठे बंगले.आणि बिल्डिंग्ज.एवढी सगळी प्रॉपर्टी असते.बाकीचा सगळा मोठेपण असतो.श्रीमंतीचा दिखावा दाखवायचा असतो.आणि चोऱ्या भामट्याची भीतीही असते.त्यासाठी सर्वात प्रामाणिक वॉचमन,किंवा पहारेकरी बिना जास्त कष्टाचा ,खर्चाचा,आणि त्रासाचा हवा असतो.म्हणजे कसं की,पाळीव प्राणी सांभाळण्याची हौस असते गरजही असते पण त्यांची देखरेख ,त्यांच्या उठाठेवी,कोण करणार हा मोठाच प्रश्न असतो.मग त्यावर एक छान तोडगा शोधला जातो.रस्त्यांवरच्या भटक्या कुत्र्यांना जरासा जीव लावायचा.सकाळी थोडे दूध ,बिस्किटे अगदी प्रेमाने चूचकारून

बोलावून खायला द्यायचे.आणि रात्रीचे जेवणातले उरले सुरले सगळे खपवले जाते.आणि कुत्र्यांची भूकही मिटते आणि वर पुण्य मिळाल्याचा आनंद मिळतो .हा फायदा तर वेगळाच.

 रोजच्या सवयी प्रमाणे सकाळचा मॉर्निंग वॉकचा टप्पा पूर्ण करण्याच्या 

नादात चालत असताना,मागूनही कोणतरी येत आहे असा भास होत होता.मागून चालणाऱ्या पावलांचा वेग कमी जास्त होत नाहीये हे लक्षात यायला लागले होते.जणूकाही दोन व्यक्ती सोबतच चालत आहेत असे बघणाऱ्याना वाटावे असे.रस्त्याला पुढे थोड्या अंतरावर छोटा चौक होता.आता चौकातून कोणीतरी डाव्या किंवा उजव्या बाजूला वळायला पाहिजे होते.आणि मग अचानक त्या मागून येणाऱ्या पावलांनी पटकन पुढे माझ्या सोबत येऊन विचारले," आंटी तुम्ही कुठं जाणार आहे.?"

ती एक नववी दहावीत शिकणारी टिन एजर मुलगी होती.अर्थातच तिला बघताच माझ्या चेहऱ्यावर आपसूकच स्माइल आले.

" का ग.काय झाले.?"

" काही नाही आंटी.कोणत्या साइडला जाणार आहे.?"

" नाही ग.मी इथून. चौकातून रीटर्न होणार आहे."

तो पर्यंत चौक आलेलाही होता.

" आंटी आंटी थांबा न एक मिनिट."

मला नेहमीची सवय झाल्याने जे लक्षात आले नाही ते ती विस्मयाने दाखवत होती.

" आंटी बघा ना .कुत्री. किती आहेत इकडे.मला खूप भीती वाटत आहे."

चारपाच कुत्री आमच्या मागून जोरात भुंकत ओरडत आमच्याच दिशेने येत होती.

" अग हे तर रोजचेच आहे.ते काही तुझ्यावर येत नाहीयेत.ते त्यांचं काम करत आहेत.हा त्यांचा एरिया आहे.इथल्या लोकांनी पाळलेली पण भटकी कुत्री आहेत ती.तुला काही नाही करणार."

एवढे सांगत असतानाच ,रस्त्याचे डाव्या बाजूच्या लेन मधून अजून पाच सहा कुत्र्यांचा ग्रुप जोरात भुंकत पळत येताना दिसला.

आता ती मुलगी थरथर कापायाला लागली होती.माझ्या अगदी जवळ येऊन थांबली होती.

" आंटी आंटी थांबा ना इथे."

तिचे डोळे माझ्या कडे.आणि येणाऱ्या कुत्र्यांच्या ग्रुपकडे बघत भिरभिरत होते.बोलताना आवाजातला थरकाप स्पष्ट जाणवत होता.तिने पटकन माझ्या हाताला पकडले.तिचे हात थरथरत होते.

आणि तेवढ्यात ती पाच सहा कुत्री आमच्या जवळून पळत जाणार होती आणि त्यांना बघून ती मुलगी सुद्धा पळण्याचे विचारातच होती.माझा हात तिला सोडवत नव्हता.

आता मात्र मी देखील बिथरल्यासारखी

झाली होते.

" अग अग थांब पळू नको.आणि घाबरु नको.एका जागेवर शांत उभी रहा.हालचाल करू नको.आणि त्यांचेकडे जास्त बघू सुद्धा नको.शांत हो एकदम."

मी अक्षरशः रागावलेच तिला.आणि माझे हे सगळे बोलणे संपेपर्यंत मागून येणारी कुत्री सुसाट पळत येऊन पुढे निघूनही गेली होती.ती ज्या दिशेने गेली होती.त्या दिशेचे कुत्र्यांचा दुसरा ग्रुप देखील तयारीतच होता.त्यांच्या वर हमला करायला.त्यांना बघून तो ग्रुप परत मागे फिरला होता.आणि..

" आंटी आंटी आता सगळे इकडेच येतात आहेत परत."

आता ती जास्तच घाबरली होती.

" अग तू का बघते त्यांच्याकडे.त्या दोन ग्रुप मध्ये चालले आहे ते.तुला काय त्याचं."बघ गेले ना सगळे .जा तू आता."

दोन्ही कुत्र्यांचे ग्रुप .आपापल्या मार्गाने निघूनही गेली होती.

" आंटी तुम्ही कुठं जाणार आहात आता.?"

" सांगितले ना आताच .मी इथून परत फिरणार.तू जा आता ."

" आंटी मला थोडी सोबत करा ना.पुढच्या वळणा पर्यंत ."

" तू कुठं चालली आहेस.?"

" मला समोरच्या ग्राऊंडवर जायचयं खेळायला."

" मग रोज कशी जातेस.?"

" नाही रोज नाही जात.सुट्टीच्या दिवशी च जाते.मैत्रिणीने सांगितले की. ह्या लेन मधून शॉर्टकट आहे.इकडून ये म्हणून."

" बरं चल. पण जाशील ना बरोबर." 

तिला थोडीशी सोबत करून परत मागे फिरले.

आणि घरी आल्यानंतर ही दिवसभर मला का माहित नाही. सारखी ती मुलगी आठवत राहिली.पोहचली असेल ना ती व्यवस्थितपणे खेळायच्या ग्राऊंडवर.

दुपारी माझी पिलू टीव्ही वर यू ट्यूब चे व्हिडिओ बघत बसली होती.

मनातले त्या मुलीचे विचार विसरावेत म्हणून मी पण व्हिडिओ बघायला बसले.

©® Sush.

( वाचूया पुढच्या भागात.काय असेल त्या व्हिडिओ मध्ये.)

🎭 Series Post

View all