जलद कथा लेखन.
भित्यापाठी ब्रम्ह राक्षस.
भाग _दोन.
अवकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी अफाट भव्यदिव्य डोंगर माथ्यावर कबुतर पक्षी तिच्या पिलांना अंड्यातून ऊबवतात.
हे डोंगर इतके उंच असतात की, साध्या डोळ्यांनी खालचे जमिनीवरचे
दृश्य दिसू शकणार नाही.
दिवस अन् रात्र पहारा ठेऊन उबवलेली पाच सहा नाजुक,इवलेसे जीव,अर्धा इंचाचे छोटे छोटे पंख, इत्तूशी चोच,अन् सुंदर मंजुळ किलबिलाट.
हळूहळू घरट्यातून बाहेर यायला लागतात.चालायला लागतात.कबुतरिने चोचीने भरलेले खायला लागतात.
असे कितीसे बळ आले असेल त्या अर्ध्या इंची पंखात .आणि तो एक दिवस निश्चित ठरला जातो.
कबुतर त्यांना स्वतःच्या विशिष्ठ आवाजात काहीतरी सांगत असते.ते पिले तिचे अनुकरण करत असतात.
ती पुढे पुढे चालत राहते.ती पाच सहा पिले तिच्या मागून प्रचंड विश्वासाने ,अनोख्या धैर्याने ,सर्व जीव एकवटून चालत असतात.खडकाळ जमिनीवर पडत असतात.परत उठत असतात. एकमेकांना आवाज देत मागे मागे पळत असतात.
शेवटी तो डोंगर माथ्याचा विशिष्ठ टप्पा येतो.अगदी डोंगराच्या कडावर कबुतर उभे राहते.आवाज सतत चालूच असतो.आणि पुढच्या क्षणी त्या भयंकर उंच कड्यावरून सर्व बळ. पंखात एकवटून जोरात हवेत झेप घेते.
वर आकाशात गिरक्या मारायला चालू करते.पिले तिचा आवाज ऐकत असतात.ती तिचे अनुकरण करायला सांगत असते.
सगळी पिले आवाज ऐकत असतात. एकमेकांना साद घालत असतात.केविलवाणा चिव चिवचिवाट चालूच असतो.
आणि पुढच्या क्षणापासून एका मागून एक सगळी पिले त्या डोंगर माथ्यावरून खाली जमिनीकडे झेपावतात.झोकून देतात स्वतः ला.
पंखात बळ येण्यासाठी.उडायला शिकण्यासाठी.जिवंत राहण्यासाठी .पक्षी म्हणून जन्माला आल्याची किंमत मोजण्यासाठी. उडणे शिकावेच लागणार असते.पंख आहेत मग उत्तुंग भरारी घ्यावीच लागणार असते.
एकामागून एक सगळी पिले डोंगर कड्यावरून खाली झेपावतात.
उंचा वरून खाली येत असताना,आजूबाजूच्या डोंगराच्या टकरा बसून जोरजोरात आपटले जातात.वेगाने खाली येतच राहतात.
खाली जमिनीवर येई पर्यंत त्यातील एखादे दुसरेच जिवंत राहिलेले असते.
कबुतर वर आकाशातून नजर ठेवून असते.साद घालत असते.पिलू आवाजाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असते.कबुतर त्याच्या पुढे चालायला लागते.
आता जमिनीवरचा जीवन संघर्ष चालू झालेला असतो.हा जीवन प्रवास त्यांना एकट्याने करायचा असतो.
अतिशय खडतर,अवघड,प्रतिकूल परिस्थिती वर विजय मिळवून.
धन्य तो निसर्ग...धन्य त्याची लीलया...धन्य ते पशू पक्षी...!
मनुष्य प्राण्याला दाखवून देतात...स्वतःचे आयुष्य स्वतःलाच जगावं लागतं...असे जीवन जे कोणावर अवलंबून नसावे...म्हणजे परावलंबी नसावे...खरे स्वावलंबी ...खरे स्वाभिमानी जीवन...!!
मनुष्या मध्ये असणाऱ्या आनंद,राग,लोभ, मस्तर,प्रेम, दया, करुणा,ममता. या सगळ्या भावनांप्रमाणे ' भीती ' ही देखील एक प्रभावी भावनाच आहे.
भीतीवर विजय मिळवता येणे महत्वाचे आहे.काही ध्येयवादी लोक त्यांच्या ध्येय प्राप्ती साठी स्वतःमधील कमतरतेला सामर्थ्या मध्ये बदलून टाकतात.
खरचं आहे.कारण आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे .असे थोर महात्म्ये सांगून गेले आहेत.
©® Sush.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा