माझी मैत्रीण श्वेता त्यादिवशी रडतच घरी आली. दोन कप चहा प्यायली तेव्हा कुठे तिचे अश्रू गप्प बसले. एक महिनाच झाला होता तिच्या लग्नाला. साधी सरळमार्गी माझी मैत्रीण. कोणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करणारी. मला तिची काळजीच लागून राहायची आणि तसंच काहीतरी झालं. ती बोलू लागली तसे मी कान टवकारले.
"काय सांगू आशु तुला. सासरी कितीही चांगलं वागा; पण कोणाला काहीच पडली नाही. सतत मला ओरडा बसतो." गळणारं नाक पुसत ती म्हणाली.
मी तिच्या पाठीवरून हात फिरवला, तसं ती म्हणाली एक कप चहा दे गं, पुन्हा चहा प्यावासा वाटतो आहे.
मी तिच्या पाठीवरून हात फिरवला, तसं ती म्हणाली एक कप चहा दे गं, पुन्हा चहा प्यावासा वाटतो आहे.
मी चहा बनवायला गेली तर, ती हुंदके देत रडत होती. मी पटकन चहा ठेवला आणि पुन्हा तिच्या बाजूला बसली.
पुन्हा तिच्या पाठीवरून हात फिरवला तर म्हणाली, "चहा जरा गोड कर."
मी पुन्हा जाऊन चहामध्ये साखर घातली.
पुन्हा तिच्या पाठीवरून हात फिरवला तर म्हणाली, "चहा जरा गोड कर."
मी पुन्हा जाऊन चहामध्ये साखर घातली.
"श्वेता, तू सांगणार आहेस का काय झालं.?" माझे कान आतुर झाले होते. सासरी नक्कीच काहीतरी घडलं होतं.
तिने दिर्घश्वास घेतला तसं नाकातून बाहेर फिरायला आलेला शेंबूड पुन्हा जाऊन जागेवर गप्प बसला.
मी कसंबसं तिला धीर देत होते.
आता तिने बोलायला सुरुवात केली.
"माझी सासू फारच विचित्र आहे. तिच्या चांगल्यासाठी काही करावं म्हंटलं तर ती माझ्यावरच चिडून बसली. दोन दिवस झालं फुगून बसली आहे."
"नक्की काय झालं सांग तरी." माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
ती म्हणाली, "अगं आशु चहा आटेल गं. आधी चहा घेऊन ये आणि दोन बिस्कीट आण तोंडी लावायला."
मी तिला चहा आणि बिस्कीट आणून दिलं.
"आशु, खूप छान झाला आहे हं चहा." ती चहाचा घोट घेत म्हणाली.
"बरं आधी सांग मला काय झालं. तुझी सासू तोंड का फुगवून बसली आहे?"
पुन्हा ती रडू लागली.
मला फार वाईट वाटत होतं तिच्यासाठी. माझी जीवलग मैत्रीण. फार साधीभोळी.
"आशु, माझ्या सासूने मला सांगितले होते. त्या बाजूच्या कमला मावशी आहेत ना त्या सतत काही ना काही आपल्याकडे मागायला येतात, तर नाही म्हणून सांगायचे. ती बाई डोक्याला ताप आहे. तिला बघितलं तरी माझा बीपी वाढतो. कशाला येते काय माहित. साखर,कांदा, इस्त्री, मिक्सर सतत काही ना काही घेऊन जाते. घेऊन गेलेली वस्तू आणत देखील नाही. गेल्यावेळी इस्त्री घेऊन गेली ते महिन्याने दिली. डोक्याला ताप आहे ती बाई. हे सगळं बोलत असतांना आईचा चेहरा फार उतरला होता. मला ना खरंच माझ्या सासुसाठी वाईट वाटलं. बीपीचा त्रास आहे गं त्यांना. त्या कमला मावशींना कळायला नको का? काय सारखं सारखं मागायला येतात. रोज लागतात त्या वस्तू विकत घ्यायला नको. बरोबर ना?"
"हो बरोबर आहे. पुढे काय?"
एक दिवस त्या आल्या आणि मला म्हणाल्या, "श्वेता, जरा लसूण दे गं. मला आईंनी सांगितलं होतं. मला ना रहावलं नाही, मी पटकन त्यांना म्हणाले हे असं सारखं सारखं आमच्या घरी वस्तू मागायला येता तुम्ही, हे आमच्या आईंना आवडत नाही. त्यांचा बीपी शूट होतो."
कमला मावशी माझ्या सासुकडे बघायला लागल्या.
"गंमत करते आहे हो माझी सून." माझी सासू हसतच म्हणाली.
मी कसली ऐकते.
मी सरळ त्या मावशींना म्हणाले,
"काही गंमत करत नाही. तुम्ही येता, आमच्या घरातील सामान घेऊन जाता. गेल्यावेळी आमची इस्त्री महिनाभर ठेवून घेतली होती. काही नाही आता यापुढे आमच्या घरात वस्तू मागायला यायचं नाही.
त्या पाय आपटतच निघून गेल्या."

हे ऐकून तर मी कपाळाला हात लावला.
"अगं, श्वेता काय केलं हे?"
"आशु, बघ मला खोटं बोलायला,वागायला जमत नाही. स्पष्टपणे बोलायला मला आवडतं. तसे माझे संस्कार आहे. जे केलं मी माझ्या सासूच्या काळजीपोटी केलं. त्यादिवसापासून त्या मावशी आमच्या घरी फिरकल्या नाही. ते माझ्या सासूला दिसत नाही.
आशु, मला इतकं सूनवलं ना सासूने. तुला काय सांगू. काही नाही गं चांगल्याचा जमाना राहिला नाही. सासूला किती त्रास होत होता, मी पुढाकार घेऊन बोलले;पण कौतुक तर नाही चार शब्द मला सूनवले. नाही गं आशु सुनेला किंमत नसते सासरी हेच खरं. कितीही करा,काहीही करा पण तिला नावच ठेवली जातात. माझा नवरा देखील माझं कौतुक करायचं सोडून मलाच ओरडला. मला म्हणाला तुला कोणी सांगितलं होतं हे सगळं बोलायला. खरंच आईचीच बाजू घेतली त्यानेही. अगं महिनाच झाला आहे लग्नाला आणि माझ्यावर किती अन्याय होतो आहे सासरी. नवरा देखील सपोर्ट करत नाही. मला काहीच सुचत नाही. काय करू गं आशु?

तिच्या ह्या प्रश्नाचे उत्तर काय आणि कसे द्यावे? मला काहीच समजत नाहीये.
तुमच्याकडे आहे का बरं ह्या प्रश्नाचे उत्तर? असेल तर कंमेंटमध्ये द्या.
अश्विनी ओगले.