©®प्रज्ञा बो-हाडे
जलद लेखन
वेदिकाला डान्सची भयानक आवड. रात्रंदिवस डान्सची प्रॅक्टिस करत. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच शाळेतल्या गॅदरींग मध्ये स्टेजवर सर्वांच्या पसंतीला उतरली होती. अभ्यासात जेमतेम जरी असली तरी बोलण्याच्या बाबतीत कोणाचाच हात धरु शकत नव्हती.
नम्रपणे संवाद, नेमक्या वेळेस साचेबंध वाक्यरचना अशी की मोठ्या माणसांनाही जमणार नाही असे वेदिकाचे बोलणं. वेदिका जसजशी मोठी होऊ लागली तशी शाळेमधल्या अनेक स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घेवू लागली. डान्समुळे पहिल्या पासून शरीराला पोषक आहार घेण्याचे माहिती होते. इतर मैत्रिणींप्रमाणे कोरडा खाऊ, बिस्किटं, चाॅकलेट खाण्याचा आग्रह वेदिकाने कधी केलाच नव्हता. त्या ऐवजी सॅलेड, मोड आलेली कडधान्य उकडून डब्याला आणत असायची.सडसडीत बांधा, गोरीपाणं, फुलासारखी नाजूक वेदिका दिसायला लागली होती. चटकन तिला पाहताच कोणीही वेदिकाच्या प्रेमात पडेल अशी दिसायला मनमोहक होती.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर वेदिकाने कला क्षेत्रात प्रवेश घेतला. काॅलेजचा अभ्यास सांभाळत नाट्य सादरीकरण, पुरुषोत्तम करंडक, डान्स, या स्पर्धांमध्ये भाग घेणं वेदिकाने सुरु केलं. नाटक सादर करताना दुस-या तुकडीतले, वरच्या क्लास मधील मित्र-मैत्रिणी देखील भाग घ्यायचे.
वेदिका एका नाटकात राणीची भूमिका बजावत होती. तर मोहन राजाची भूमिका साकारत होता. मोहन वेदिकाला सिनियर होता. दिसायला देखणा, गालावर खळी, निळेशार डोळे, कुरळे केस. अगदी कथेतल्या राजकुमारासारखा राजबिंड होता. त्याला पाहताचं वेदिका त्याच्या प्रेमात पडते.
मोहनला आवडणा-या भाज्या आई कडून बनवून घेवून वेदिका डब्यात आणू लागली. मैत्रीच्या नात्यापलिकडे मोहनच्या मनात मात्र दुसरे कोणतेच विचार येत नव्हते. कदाचित वेदिक देखील मैत्रीच्या नात्यानेच ऋणानुबंधाचे सूर जुळवत आहे असेच मोहनला वाटत होते.
नाटकाचे सादरीकरण उत्तम झाले. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक मिळाले. मोहन आणि वेदिकाच्या हातात ट्राॅफी देण्यात आली. काॅलेजचे प्रिन्सिपल मोहन आणि वेदिकावर खूश होते. असेच सहभाग घेवून प्रगतिपथावर कायम जिंकत रहा. असा आशिर्वाद देखील दिला. नाटक तर., संपले आता मोहन नेहमीसारखा रोज भेटणार नाही या विचाराने वेदिका अस्वस्थ झाली होती.
वेदिकाचं मैत्री पलिकडे देखील काहीतरी असल्याची जाणीव मोहनला होताचं. काही काम अर्जंट आल, अभ्यास आहे, ज्यादाचं लेक्चर आहे. असे सांगून मोहन वेदिकला टाळू लागला.
मोहन भेटायला येईल का वेदिकाला? मोहनचे दुस-या कोणत्या मुलीवर प्रेम तरं नाही ना? जाणून घेवूया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा