Login

भूलले तुझ्या प्रितीला अंतिम भाग ४

प्रेम नि:स्वार्थी असते.

मोहन : खरतर तुला कधीच कळालं नसतं. केवळ गीताच्या हट्या पायी समजलं. मी तुमच्या घरातून निघालो ते तुम्हांला अद्दल घडवण्यासाठी. माझ्या गीताच्या आयुष्याची राख रांगोळी करुन काय मिळाले तुम्हांला. काय दोष होता तिचा. ती आधीच दु:खाने होरपळून निघाली ती काय शिक्षा देणार तुम्हांला. म्हणून मी तुझं माझ्यावर प्रेम आहे हे सुरवातीपासूनच माहित होतं तरी मी माहित नसल्या सारखे दाखवत होतो.


वेदिका : का माझ्या भावनांशी खेळलास तू. माझा काय दोष यात.

मोहन : तुझा नाही पण तुझ्या वडिलांनी वेळीच उपचार केले असते गाडी थांबवून तर आज गीताचे आई-वडिल वाचले असते.

गीता : हे तू मला देखील सांगितल नव्हते. फक्त मैत्रिणीला भेटायला घेवून येतो इतकचं सांगितलं.

मोहन : त्या गुन्हेगाराला तुझ्यासमोरं उभ करायचं होतं. वेदिकाच्या वडिलांनाच खरतर उभ करायचं होतं. पण त्यांनी सगळे पुरावे, गाडीचा नंबर बदलला आहे.

वेदिका : बदला घेण्यासाठी तू मला तुझ्यात गुंतून ठेवलसं. माझ्या भावना अश्या चुरगाळाव्या कश्या वाटल्या तुला. मला गीता बाबत घडलेल्या घटनेबाबत खेद आहे. मी माझ्या वडिलांना शिक्षा देणार आहे. मी त्यांच्या बाजूने साक्ष देईन. आणि पुरावे देखील गोळा करेल. गीता तू काळजी नको करु. मोहन तूला मी कधीच कळली नाही हेच खर. माझ तुझ्यावर असणारं प्रेम कधी जाणवेल का तुला काय माहित.

वेदिका गीताला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या वडिलां विरोधात पुरावे गोळा करते. वडिलांना पोलिसांच्या हाती देते. मोहन वेदिकाची क्षमा मागतो. झाला प्रकार विसरुन आपली मैत्री नितांत जपूया असे वचन वेदिका कडून घेतो.

काॅलेजचे शेवटचे वर्ष संपणार असते. परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन मोहन वेदिकाला भेटतो. सोबत गीता सुद्धा असते. वेदिका दोघांना सांगते. काही दिवस मावशी कडे राहायला चालले. आपण आज रात्री डिनरला हाॅटेल मध्ये भेटूया. तुम्ही दोघं मला घ्यायला घरी या. असे म्हणून वेदिका गीताला कडकडून भेटते. मोहनच्या हातात हात घेवून नक्की भेटूया परत पाणवलेल्या डोळ्यांनी निघून जाते.

त्या रात्री तिघेही छान आनंदात असतात. दुस-या दिवशी वेदिका मावशीकडे निघून जाते. चार- पाच दिवस मस्तीत राहते. जणूकाही शेवटच्या घटका मोजाव्यात तशी जगत असते. खरचचं वेदिका स्वत:ला संपवून टाकते. घरातच स्वत:ला फाशी लावून घेते. तिचा आवाज ऐकताच मावशी धावत-पळत रुम मध्ये येते. वेदिकाला ताबडतोब हाॅस्पिटल मध्ये नेण्यात येते. त्याचवेळी रुममध्ये असणारी एक चिठ्ठी वेदिकाच्या मावशीला सापडते. तिथे एक पत्ता आणि डोळे यांना द्या असे सांगितलेलं असते. नाव अज्ञात ठेवायला सांगितले जाते.

मावशी चिठ्ठीत लिहल्याप्रमाणे त्या पत्याजवळ राहणा-या दवाखान्यात जाते. या मुलीला बोलावून तिला हे डोळे बसवा असे सांगते. नाव अज्ञात ठेवून गीताला वेदिकाचे डोळे बसवले जातात.
गीताचे आॅपरेशन यशस्वी होते. गीताला सर्वात आधी मोहनला बघायचे असते. गीता मोहनचा हात हातात घेते. आणि डोळे पाणावतात.
मोहनला वेदिकाचा भास होतो. वेदिका तर मावशीकडे गेली असं का होतयं. आपण वेदिकाच्या मावशी कडे जावूया असे गीताला सांगतो.

गीता : मला पण वेदिकाला बघायचे आहे. जावूया आपणं.

वेदिकाच्या मावशीकडे गेल्यावर वेदिका या जगात नाही हे समजते. त्याचबरोबर गीताला वेदिकाने जाताना डोळे दान केले हे देखील कळते. 

वेदिकाचं असणारं खर प्रेम सूड घेण्यामुळे कधी कळलचं नाही याचा पश्चाताप मोहनला होतो. त्या रात्री मोहन झोपी गेला असताना स्वप्नात त्याला वेदिका दिसते. ती हेचं ओरडून सांगत असते. साधी भोळी असणारं प्रेम तुला कधीच समजलं नाही. गीता आणि तू सुखाचा संसार कर. गीताच्या डोळ्यांच्या रुपाने मी नेहमी तुला पाहिनं.

इतक्यात मोहनला जाग येते. आठवड्याभरात गीताशी लग्न करुन मोहन सुखाचा संसार करतो.

समाप्त:

कथामालिका काल्पनिक रचली गेली आहे. त्रूटी आढळल्यास क्षमस्व. कशी वाटली कमेंट करुन नक्की सांगा.

0

🎭 Series Post

View all