भूत बंगला भाग चार अंतिम

विनोदी भयकथा
"अग खुशी..कधीची दार वाजवते आहे मी. जिवंत आहेस की खपलीस..मी दार तोडायला माणूस बोलवणार होते . आधी दार उघड.."चिडलेल्या आवाजात श्रावणी बोलू लागते.

"श्रावणी ताई तू..आणि कुठलं दार उघडू? एवढं बोलतच खुशी हातातला फोन बघते त्यावर नाव असत ' सगळ्या मावश्यानमधे साई जिला घाबरतो ' अग बाई..खरच श्रावणी ताई तुझा फोन आहे.

"नाही भुताचा आहे..तू आधी दार उघड तुझ भुतं उतरवते मी" रागातच श्रावणी बोलते.

धडपडत खोली बाहेर येऊन हॉलच दार उघडुन बघते तर श्रावणी कमरेवर हात ठेवून डोळे मोठ्ठे करून दारात उभी असते आणि बरीच माणस दाराबाहेर जमलेली असतात.. कसनुस चेहऱ्यावर हसू आणत सगळ्यांना सॉरी बोलत खुशी श्रावणीला पटकन घरात खेचते.

"अग बाई...तुझ्या इतकी बारीक नाहीये मी...जरा हळू पकड हात..." श्रावणी बोलली.

"अग श्रावणी ताई.. मला तर वाटल खरच अशोक मला गोव्याला घेऊन गेलाय पण तू दार ठोकल तेंव्हा लक्षात आल मला स्वप्न पडल होत.."नाराजीच्या सुरात खुशी बोलली.

"अग बाई..नशीब दार उघडलं नाहीतर आमच्या लक्षात येत होत की तू जिती हाय की खपली.."खुशीचा डोक्यात टपली देत श्रावणी बोलली.

अग अंबाबाई..ते सोड..पण स्वप्नात काय झालं ते तर ऐक.. आणि मग खुशी स्वप्नात घडलेला सगळा प्रकार तिला सांगते आणि यावेळी मात्र श्रावणी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेते.

"काय रे देवा...कठीण आहेस तू. मॅडम बोलल्या भूत बंगला बघायचा का आणि तू लगेच जाऊन पण आलीस आणि ते ही गोव्याच्या भूत बंगल्यात.. खरचं काय पोरगी आहेस तू.. बर हे घे..चिवड्याचा डब्बा...उद्या नाशिकला सगळे जण भेटलात की नाश्त्यात खावा सगळ्यांनी..हेच द्यायला आले होते. उद्या नीट सांभाळून जावा..आणि अशी अँटीक स्वप्न पाहत जाऊ नको बाई..एखाद दिवस खरच गेलीस की काय समजतील लोकं..चल बाय..निघते मी आणि सांभाळून जा तिघे..आणि स्वप्नात जी शिक्षा प्रशांत सरांना दिली आहे ती पूर्ण करून घे.. बाकी कांदा भजीच संजना मॅडम बघून घेतील. चल बाय..आणि सगळ्यांना विचारलं म्हणून सांग..
एवढं बोलून श्रावणी निघाली. खुशीने नाराजीतच दार लावलं आणि आता गेली तोच पुन्हा दारावर थाप पडली.

"काय ग श्रावणी ताई..काही विसरलीस का?"खुशीने विचारलं.

"अग हो..मला सांग त्या हवन मधे टाकलेल्या कागदपत्रांवर काय लिहिलं होत?" श्रावणी विचारते.

"अग ते होय..त्यावर संजना मॅडम नी लिहून घेतल होत..इथून पुढे काहीही झालं मग ते भांडण असो किंवा नसो..मला कांदाभजी आणि गरम गरम आल्याचा चहा तुम्ही स्वतःच्या हातांनी बनवून द्यायचा.. आणि त्यावर होकार म्हणून सरोज सरांची सही होती. तोच कागद त्यांनी जाळला म्हणजे 'ना रहेगा बास ना बजेगी बासुरी ' समजल..

"ओहहह असं आहे होय..मग तर तू येच जाऊन नाशिकला..आपण या नवऱ्या लोकांचे पैसे नक्कीच उडवूया.." चल बाय..निघते मी आणि तुम्ही पोचलात की एक मॅसेज कर मला..
समाप्त..
©®श्रावणी लोखंडे..
गमतीच्या मॅसेज मधून गमतीदार सुचलेली भयकथा..कशी वाटली नक्की कळवा..काही चुकल्यास किंवा जास्त काही लिहिलं गेल्यास क्षमस्व..संजना मॅडम आणि सरोज सरांनसोबत इतर जे लेखक कथेत घेतले आहेत काही ठिकाणी तुमचा नावाचा एकेरी उल्लेख केला आहे त्याबद्दल माफी असावी..
धन्यवाद..