भूत बंगला भाग एक

विनोदी भयपट..
लग्नाला आठ वर्ष झाली म्हणून अशोक खुशिला घेऊन दोन दिवस बाहेर जायचं प्लॅनिंग करत असतो. संध्याकाळी आठला ऑफिसमधून आल्यावर अशोक खुशी समोर गरमा गरम चहाचा कप धरतो..
समोर आयता चहाचा कप बघून..

"तब्बेत ठीक आहे ना तुझी?" खुशी विचारते.

"हो हो! एकदम ठीक आहे. तु थकून येतेस एवढी.. तू पण दमत असतेस म्हणून विचार केला आज तुझ्यासाठी चहा ठेवावा." अशोकने स्पष्टीकरण दिलं.

"अच्छा! बरं अशोक एक काम कर ना..मला ना आज जेवण बनवायचा पण खूप कंटाळा आलाय तर.."खुशीच बोलून पूर्ण होण्याआधीच..

"अग हो हो..मी बाहेरूनच ऑर्डर करतो..ते पण तुझ्या आवडीच. तु आराम कर आज." जेवणाची ऑर्डर देण्यासाठी मोबाईल हातात घेत अशोक बोलला.

'बापरे..आज काय झालंय याला..अचानक एवढं प्रेम..याला काही हवय का माझ्याकडून..' खुशी मनातच विचार करत असते. खुशिला विचारात गढलेल पाहून अशोक बोलतो.

"नाही नाही..मला तुझ्याकडून काही नकोय.. मी खरच हे सगळं मनापासून करतोय." अशोक बोलला.

"देवा..याला आता मनातलं पण ऐकू जात की काय..त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मधल्या इंद्रायणी सारखं..हा इंद्रायणीचा भाऊ इंद्रा तर नाही ना?" अशोक कडे डोळे फाडून फाडून बघत खुशी पुन्हा मनातच बोलते.

"मी काय म्हणत होतो..आता आपली आठवी अनिवर्सरी येतेय तर आपण दोन दिवस गोव्याला जाऊन यायचं का? नाही म्हणजे तुझे क्लास असतात त्याला खाडे केलेले तुला चालत नाही म्हणून विचारलं!" एकदम हळू आवाजात खाली मान घालून अशोक बोलतो.

उत्साही खुशी खुश होत बोलते..

"अरे त्यात काय एवढं..असही दोन दिवस सुट्टीच आहे मला..म्हणजे काही स्टुडंट्स गावी आहेत आणि फक्त चार मुलांसाठी दिवसभर बसून कंटाळा आला होता म्हणून मी परवा पासून पुढे दोन दिवस मुलांना ऑफ दिले आहेत.त्या दोबमन दिवसांमध्ये जाऊया की आपण..छान पैकी हॉटेल बुक कर." खुशी बोलते.

अशोक पण सगळ्यात आधी झोमॅटो मधून जेवणाची ऑर्डर देतो आणि लगेच हॉटेल शोधायची सुरुवात करतो. फायनली एक हॉटेल दोघांनाही आवडत नाव थोडं युनिक असत..पण हॉटेलच्या आतले फोटो खूप छान असतात. शिवाय हॉटेल एका महालासारख असत म्हणून दोघेही तेच हॉटेल फायनल करतात.
क्रमशः..
©®श्रावणी लोखंडे..
थोडी गमतीदार कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे..कथा आवडली का ते नक्की सांगा.