बंगल्याच्या मधोमध असलेल्या मोठ्या झुंबरखाली राखी हवन करायला बसली होती. समोर वंदना काकु बसल्या होत्या. वंदना काकू उजव्या बाजूला बघत नुसत्याच हसत होत्या.. नजर वळवून पाहिलं तर..संजना ताई...
देवा...हे काय सुरू आहे..म्हणत खुशी तिथेच डोक्याला हात लावून धपकन खाली बसली.
"अग खुशी..हे काय आहे? आणि या तर तुझ्या संजना ताई आहेत ना!" अशोक भीतीने आलेला कपाळावरचा घाम टिपत बोलला.
"हो..पण त्यांनी सरांच्या मानेवर चाकू का ठेवला आहे?आता स्नेहसंमेलनला गेल्यावर माझ्या साईवर लक्ष कोण ठेवणार?
संजना ताई...थांबा.. अलका कुबल सारखी पायऱ्यांवरून धावतच जात खुशी बोलली..
संजना ताई...थांबा.. अलका कुबल सारखी पायऱ्यांवरून धावतच जात खुशी बोलली..
"संजना ताई..हे काय करताय..अहो त्यांच्या मानेवरून चाकू काढा. अहो गरीबाला सोडा.."खुशी बोलली
"मी यांना मगापासून विचारते प्रशांत कुठेय..कारण यांनी.. प्रशांतना लपवून ठेवलं आहे. काय बोलले आहेत प्रशांत की सरोज भांडत नाही..म्हणजे मी भांडते का? जोवर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही..मी चाकू काढणार नाही. वकील....कागदपत्र तयार झाली का? ऍडव्होकेट. महेशना आवाज देत संजना विचारते.
"हो झाली आहेत मॅडम."खाली मान टाकून ऍडव्होकेट. महेश उत्तरतात.
"पुन्हा मोर्चा सरोज सरांकडे वळवून संजना विचारते.मग सांगा..कोण भांडण करत? मानेवर सुरा असलेले सरोज मोठ्याने ओरडतात...मी मी मी भांडण करतो..पण प्लीज हा चाकू काढ.
" अग ते फक्त गंमत म्हणून बोलत होते..तू खरच नाही भांडत..खूप गुणाची बायको आहे माझी..प्लीज तो चाकू काढ..मी पाया पडतो तुझ्या.. ओ सासूबाई..अहो तुम्ही तरी सांगा.." सरोज सर विनवणी करत बोलले..पण वंदना काकू पुन्हा जोरात हसू लागल्या..आणि बोलल्या..हे ग्रहण तेंव्हाच सुटेल जेंव्हा तिच्या मनासारखं होईल.
"ग्रहण? कुठलं ग्रहण.."सरोज सरांनी विचारलं
"श्रावणीने ग्रहण लावलं आहे ते..आठवून बघ.."एवढं बोलून त्या पुन्हा जोराने हसायला लागल्या.
समोर साक्षात मृत्यू देवता रूप धारण करून बसली होती आणि सरोज सर... डोळे बंद करून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होते.
सरोज सर..अहो डोळे कसले बंद करताय डोळे उघडा..उघडा डोळे बघा नीट.."खुशी बोलत होती.इतक्यात सर डोळे उघडतात.
"ए.बी.पी माझा..."अशोक मधेच बोल्यात्या.
"तु काय मधेच न्युज लागल्या सारखं करतोयस..इथे प्रसंग काय तू वागतोस काय?" अशोक कडे बघून खुशी रागाने बोलली.
"आठवल आठवल..मला मान्य आहे. मान्य आहे मला..
मी पाच किलो कांदे कापायला तयार आहे. दे तो चाकू इकडे...मी पाच किलो कांदे कापून त्याची भजी बनवून देतो आणि सोबत गरम गरम आल्याचा चहा तुला आवडतो तसा..तो पण कपभर नाही..अख्खी बादलीभर देतो. पण प्लीज मला सोड..मी पुन्हा अस काही बोलणार नाही. मला सोड.." सरोज विनवणी करत बोलले.

हे सगळं वरून नाईक आणि प्रशांत बघत होते.
एवढं महाभारत आपल्यामुळे सुरू आहे समजल्यावर प्रशांत तिथून कल्टी मारण्याच्या बेतात होते पण आधीच संजना ताईंना वश झालेले नाईक प्रशांतना निसटण्याची संधी देत नाहीत. तेवढ्यात त्यांची नजर पडते डॉ सुनिता वर..हातात आरतीच ताट आणि त्यात लावलेली मेणबत्ती घेऊन ती बंगला भर फिरत होती.
"आगया.. देखो.. देखो वो आगया..."डॉ.सुनीता बोलल्या..
नाही नाही हे गाणं चुकीचं आहे... गुमनाम..हे कोई..बदनाम हे कोई..हे गाणं चांगल बसेल यावर..नाही म्हणजे ती ताटात मेणबत्ती आहे ना म्हणून म्हंटल..बाकी ते प्रेमाचं गाणं हवं असेल तर हे चांगल वाटेल..
'आ गया..आ गया..दिलं चुराने में आ गया..'

अशोक...अरे काय सुरू आहे तुझ...ती डॉ आहे..आणि बॉयफ्रेंड शोधतेय स्वतःसाठी म्हणून अशी गाणी बोलतेय आणि तू कसली भुताची गाणी सांगतोय तिला..
ए डॉ ताई..तू त्याच काय ऐकू नको बर ..तो असाच आहे.. तू तुझ कंटिन्यु कर ग..
ए डॉ ताई..तू त्याच काय ऐकू नको बर ..तो असाच आहे.. तू तुझ कंटिन्यु कर ग..
"इकडे सगळ्यांना भूत बाधा झाली आहे आणि तुला अंताक्षरी सुचतेय? काहीतरी उपाय सांग." अशोकच्या पाठीत एक रट्टा घालत खुशी बोलते.
अग मी तर सहज सुचलं म्हणून गाणं बोललो.
"ए राखी ताई..अग या आगीत पाणी ओत आणि विझव ती आग..वंदना काकू..नाहीतर एक काम करा..याच आगी भोवती तीन दगड मांडून चूल रचते आणि मोठी कढई चढवते मी..म्हणजे सरोज सरांना भजी बनवायला सोप्पं जाईल आणि मोठ्या कढईत पटापट काम होऊन जाईल..
वंदना काकू नी मानेने होकार दर्शवला. ऍडव्होकेट. महेश पण त्यांच्या हातातली कागदपत्र संजना ताईंकडे देतात. अशोक गपचूप ती कागदपत्र वाचतो आणि जळणाऱ्या आगीत टाकतो. ते बघून सरोज सर अशोक प्रति कृतज्ञता व्यक्त करतात.

अशोक त्या कागदपत्रांवर काय लिहिलं होत? खुशी विचारते.
अशोक खुशीला सगळ सांगतो..
तुम्ही पुरुष सगळे सारखेच असता..थांब मी श्रावणी ताईला फोन करून सांगते..इकडून आल्यावर बंजाराला जाऊन यांचे पैसेच संपवूया."
अस बोलून खुशी रूम नंबर ७/१२ मधे जायला निघते. नाईकांच्या वश मधे झालेला प्रशांत स्नेसंमेलनात सगळ्या मुलांना सांभाळायची शिक्षा कबूल करतात ते बघून खुशीचा आनंद गगनात मावेनासा होतो.
अस बोलून खुशी रूम नंबर ७/१२ मधे जायला निघते. नाईकांच्या वश मधे झालेला प्रशांत स्नेसंमेलनात सगळ्या मुलांना सांभाळायची शिक्षा कबूल करतात ते बघून खुशीचा आनंद गगनात मावेनासा होतो.
खुशी गडबडीत रूम मधे जाते. रुमच दार खोलते तोच रूम मधला फोन वाजू लागतो. खुशी पटकन जाऊन फोन उचलते.
क्रमशः..
©®श्रावणी लोखंडे..
क्रमशः..
©®श्रावणी लोखंडे..