भुतकाळातील घाव भाग - २

Potachya gol yasathi aila Kiti divya Par karave lagatat. tayat mulgi asel tar far kathin.
"भुतकाळातील घाव" भाग - २

' आई 'हो तिनेच सगळे आपले आत्मकथन या पत्रात केले होते. जणू काही तिच माझ्याशी बोलत होती. इतक भाऊक होतं ते सगळं वाटत होते समोरासमोर बसून आम्ही बोलत आहोत. ती पत्राद्वारे माझ्याशी बोलत होती. ती म्हणाली, खुप कोडकौतुकात वाढले.

मी घरातलं पहिलावहिलं अपत्य. मग खुप कौतूक होतं. नंतर माझ्या पाठीवर दोघे आले. पण माझी जागा कायम तीच राहिली. त्या काळात मला शिकवले बाबांनी.अगदी इंटरपर्यंत लग्नाचे वय झाले. खुप सोयरिकी येत होत्या.

अगदी पण नात्यातील पण बाबांना नात्यातला मुलगा नको म्हणून दुरचे हे स्थळ सांगून आले. मुलगा होतकरू घर भरलेले लगेच बाबांनी होकार कळवला आणि लक्ष्मीच्या पावलाने मी या घरात आले.

नव्याचे नऊ दिवस लगेचच सरले ग आणि सासुरवासाचे गारूड मानगुटीवर बसले. मोकळ्या वातावरणात वाढलेलली मी बंदिस्त झाले.

फक्त रांधा वाढा उष्टी काढा. घरात सतत पाहूण्यांचा राबता. तश्यात मला दिवसही गेले.सतत दडपण, मुलगाच हवा बरका असा घरात स्वर दुमदुमला.

"तो काळ खुपच कठीण गेला ग!" मनात सतत धाकधुक. पहिले बाळंतपण,मग बाबा येऊन मला घेऊन गेले माहेरी.

डिलेव्हरी झाली आणि तु झालीस.सासरचे कोणीही पाह्यला आलेच नाही.तुझ्या बाबानी तर नावच टाकले.

मला मुलगा दिला नाहीस तुम्ही आता तिकडेच रहाआसे पत्र धाडले.खुप वाईट वाटायचे..

आई म्हणायची, ओली बाळंतीण आहेस तु रडू नकोस. बाबा तर म्हणायचं, "रडूच नकोस अग कोणासाठी रडतेस!" "म्हशीचे शिंग म्हशीला जड नसतात."तुझा बाबा समर्थ आहे तुला पोसायला.

नाहीच पाठवणार जा म्हणावं त्यांना ! मग खुप धीर वाटायचा, पण शेवटी माहेर ते माहेरच. मामा, मावशी मागे होते. मी अशी माहेरी राह्यले तर, त्यांची लग्न कशी होणार?

शेवटी तो पण विचार करायला हवाच होता. मग जे होईल ते होईल, शेवटी सटवाई ने जे विधिलिखित तुझ्या बाबतीत लिहिले तेच होईल.

ते तर कोणी बदलू नाही शकणार.हा सारासार विचार करून मी तुला घेऊन सासरी आले ते हि न कळवता!

खरचं तुझे माहेरी खुप कौतुक होते ग! सव्वा महिना झाला.आईबाबा नको म्हणत असताना पण तुला घेऊन मी सासरी आले. मग सुरूवात झाली ती वेगळी.!

कसे झाले संध्याच्या आईचे स्वागत सासरी पाहूया पुढील भागात!...
क्रमशः
©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all