भुतकाळातील घाव भाग - १

Bhutkalt ekhadya Kadun Manavar evade hotat the visarne Shakya nasthe Ghav zale
"भुतकाळातील घाव" भाग - १

'She is a no more' डॉ. सांगितले आणि संध्यानी जोरात हंबरडा फोडला.

"डॉक्टर खोटे ठरवा असे शक्य नाही.मी घेऊन जायला आले आहे आईला!संध्या हमसाहमशी रडू लागली."

शेवटी एका नात्यानी Exit घेतली. संध्या पूर्ण हलून गेली. बाबांकडे तिरका कटाक्ष टाकत बोलली, "आता गाजवा तूमचा हक्क, कोणावर गाजणार?" आईला संपवलत तुम्ही.ती रागात बरळत होती.

शेखरने तिला थोपटले थोडं पाणी पाजून बाजूला घेऊन गेला.तिला समजावणीच्या सुरात म्हणाला,"संध्या शेवटी व्हायचे ते झाले.तुझ्या त्रागा करण्याने आई परत येणार आहे का? उगाच तमाशा नको हे हॉस्पिटल आहे.बाकीचे पण पेशंट असतात.शांत हो दगडावर डोके आपटून आपलं डोके रक्तबंबाळ होणार. दगड आबादी आबादच राहणार तेव्हा शांत रहा."

" शेखर कशी शांत राहू ह्या बाप माणसानं गिळलं रे माझ्या आईला!"सतत दबावाखाली जगली ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.श्वास घ्यायला पण तिला बाबांची परवानगी लागायची रे तिला!" अजून काय सांगू तुला?

संध्याचा आईसाठीचा टाहो ह्रदयाला चिरून टाकत होता.थोड्यावेळाने ती शांत झाली. कारण पुढील सोपस्कार करायच होते.तिने सगळे सोपस्कार पुर्ण केले आणि बॉडी ताब्यात घेतली.

पुढे सगळे क्रियाकर्म तिनेच केले. बाबा अलिप्तच होता.आज आईला जाऊन एक महिना झाला. तिने तिन्हीसांजेला देवासमोर निरंजन लावली. या कातरवेळी तिचे डोळे पुन्हा भरून आले आणि या आसवात आईच्या आठवणी ओल्या झाल्या.

निघताना टेलिफोन वाल्या भाऊंनी संध्याला एक पत्र गुपचूप आणून दिले होते व सांगितले होते "ताई आईची आठवण आहे जाताना तुझी आई माझ्याकडे देऊन गेली."तुझ्याकडे सुपूर्द करायला सांगितले.जपून ठेवली आज माझया बहिणीच्या आत्म्याला शांती लाभेल. मी तिच्या काहितरी कामाला आलो. तो देखील हमसाहमशी रडत होता.

ते पत्र पर्समधे ठेवले या देवमाणसाचे मनापासून आभार मानले.आज परत तेच पत्र पुन्हा काढून मी वाचत होते.पण निर्णय मात्र होत नव्हता.

हो माझी आई,नकळत्या वयापासून माझी नाळ फक्त आईशीच जोडली होती.बाबा सतत कडक शिस्तीचा तो म्हणेल तीच पूर्वदिशा घरात बाबा असला कि, घरात स्मशान शांतता, आईच्या नावातील शेवटचे अक्षर उच्चारायच्या आत आई समोर हावी हा दंडक.

घरातल्या वस्तूची जागा पण तोच ठरवणार.घरात येणारी प्रत्येक वस्तू देखील त्यांच्याच आवडीप्रमाणे, लहानपणापासून घरात फक्त बाबांचे वर्चस्व ती पाहत होती एक पुरषी अहंकार!

एकत्र कुटुंब आईचा सगळा वेळ फक्त स्वयंपाकघरात.घरात फक्त सासरचा राबता.मामा, मावशी हे नात कधी संध्याला तिच्या अंगणात दिसलेच नाही.आई तशी मला लहानपणी नेहमी सांगायची तिच्याबाबतीत.

काय असेल आईचं गुपित तुमची उत्सुकता ना पाहूया पुढील भागात
क्रमशः

©️®️सौ ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all