बिचारी आई ???
आमच हम दो। हमारे दो। वाले अतिशय सुखी अस चौकोनी कुठूंब. आई - बाबा मी रेवा आणि अमर दादा .वडील बेंकेत नोकरीला अमर दादाही आता ग्रेजूएशन संपऊन एका नामवंत कंपनीत मोठ्या पदावर लागला होता.माझ सध्या बारावीचे वर्ष चालु होत.आई घरकाम करायची. थोडक्यात घरात आणि बाहेर आमच सगळं व्यवस्थित चालले होते.....
अमरदादा चे लग्न झाले नवीन वहिनी घरात आली..सुरवातीला सगळं ठिक चालले होते ..पण साधरण पाच-सहा महिन्यात घरात
भांडणे होऊ लागले ..आई बाबा आणि वहिनीशी नाहीँ किंवा माझे आणि वहिनी चे ही नाहीँ ..नाहीँ हो ! दादा आणि वहिनी चे देखील नाहीँ ... लगना नंतर पाच-सहा महिन्यातच भांडण सुरु झाले ते दादा आणि आईचे तसा आईचा काहीच दोष नव्हता .सगळा दोष दादाचाच होता तो नेहमीच आईला बरोबर वहिनी समोर टोचुन बोलत असे ...त्या मुळे वाहिनी च्या मनात किती गुदगुल्या होत आहे ते तिच्या चेहऱ्यावर दिसे ...
आता तर तीन वर्ष झाली दादाच्या लग्नाला .मुलगाही झाला दिड वर्षाचा ..दादा चे वहिनी समोर आईचा अपमान करण्याचे प्रमाण वाढतच होते ..आई तु भाजी करू नको ! तुझ्या हाताला चव नाहीँ , कपड़े इस्त्री करू नको तुला समजत नाहीँ ...आज तर जेवणावरच सगळ्या समोर बोलला ...आई तू खरंच काही काम करू नकोस ..सगळं काम बिघडून टाकतेस ..प्लीज! .प्लीज!! पहिजे तर पाया पडतो तुझ्या.. फार तर तु छोट्याला सांभाळ ....पण प्लीज दुसर काम करून कामाची वाट लाऊ नकोस .
अमरदादाच्या या बोलण्याने वहिनीच्या चेहऱ्यावर आसूरी आनंद दिसत होता .. मला ही फार वाईट वाटल ..बिचारी आई... ती तर गरीब गाय ती काय बोलणार? ..यांत सगळ्यात जास्त वाईट वाटले ते बाबांचे.आईचा इतका सगळ्यासमोर अपमान होत असताना ते काहीच बोलत नव्हते...
दोनतीन दिवसा नंतर एका रविवारी आई छोट्याला घेऊन मंदिरात आणि वहिनी शेजारीन सोबत मार्केट ला गेली होती.दादा आणि बाबा हॉल मधे टीवी पहात होते ..मी वेळ साधून रिमोट हातात घेतला व टीवी चा आवाज बंद केला व दादाला बोलले ...वा ! दादा वा !! लहान पासून आई फार चांगली वाटायची वहिनी आल्या पासून काय झाले ? ..आईने बनवलेले जेवण आवडत नाहीँ , आईने केलेले कोणतेही काम आवडत नाहीँ ...हो ना ! असेल कदाचित? .. ..पण प्रत्येक वेळेस हे वाहिनीच्या समोर सांगून सारखा आईचा अपमान करायची काय गरज ? माझ्या या प्रश्नवर .......
बाबा आणि अमरदादा ...एकमेकांच्या हातावर टाळी देऊन जोर जोरात हसायला लागले ....त्याचं अस हसणे माझ्या साठी धक्का दायक होते ..मी रागाउन विचारले ..त्यात हसणेसारख काय ? आणि बाबा तुम्ही पण ? ....
यावर बाबाच म्हणाले ..अंग हसू नाहीँ तर काय करू ? अग तूझा दादा मुद्दाम हुंन तूझ्या वहिनी समोर आई चा अपमान करतो ..त्या मुळे तूझ्या वहिनीला आनंद मिळतो. ..आणि तीला वाटते सगळं काम तीच व्यवस्थित करू शकते. त्यामुळे तीच्या अहंकार जागृत होतो. आणि या अहंकारामुळे ती तूझ्या आईला काहीच काम करू देत नाहीँ .म्हणुन तीला आयता आराम मिळतो. त्यामुळे तुझी आई छोट्या बरोबर ..सकाळी मंदिरात जाते .दुपारी आराम करते संध्याकळी छोट्याला घेऊन बागेत फिरायला जाते ...समजल का रेवा बेटा ? ......बाप रे ! हे सगळं एकून तर मला सुखद धक्काच बसला.म्हणजे दादा सगळं नाटक करत होता आणि बाबा त्याला सामील होते तर..खरंच अमरदादा किती ग्रेट आहे आणि आईवर प्रेम करायची त्याची पद्दत किती अफलातून आहे ! ..
आता तर मला आमच्या त्या वहिनीची किव येत होती ..बीचारी वहिनी !
लेखन: चंद्रकांत घाटाळ
७३५०१३१४८०
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा