Login

बिल्वची आजी #देवी ब्रह्मचारिणी

Woman Empowerment Day 2
"आजी काय गं तुझं सारखं देवपूजा करत असते. तुला बोलले ना मी आज माझ्या शाळेत grandparents day आहे. तू अजुनही तयार झाली नाहीस. तू घरात तर बोअर वागतेस atleast शाळेत तरी माझ्या बाकी friends च्या आजीसारखी तयार होऊन ये." आपल्या अवघ्या आठ वर्षांच्या नातवाचे बोलणे ऐकून तिला थोडेसे गलबलून आले पण ती हसतच नातवाला बोलली, "हो रे माझ्या सोन्या.. रेडी होते आहे मी आपण अर्ध्या तासात निघूया." आणि ती तयारी करायला खोलीत गेली. न राहवून त्या चिमुकल्याची आई त्याच्याजवळ आली आणि बोलली,"काय रे बिल्व आजीला देवपूजेवरून बोलत असतोस? आजी आहे ना तुझी ती ? तुझे किती लाड करते. तुला कोणत्या गोष्टीला नकार दिला का तिने..?"
"अगं हो.. पण बघ ना ती सारखी... नुसती जपमाळ का घेऊन असते ? मला आवडतो बाप्पा... पण इतका.." तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याची आई त्याला थांबवते, "बिल्व थांब जरा.. मला कळले तुला काय म्हणायचे आहे. की आजी देव देव खूप करते. पण तुला माहीत आहे तिच्यामुळे आपण किती stable आहोत. मागल्या वर्षी तुझी छोटी बहीण आलेली तेव्हा किती आजारी होती? मीच काय तू आणि तुझा बाबा किती घाबरलो होतो ? पण आजीने रात्री भांडण करून डाॅक्टरांना तिला चेक करायला लावले. तिला ही strength, संयम त्या पूजेतून येतो. आता पुन्हा आजीला असे बोलायचे नाही. ओके..? "

"हो ममा कळले मला मी आजीला आता असे बोलणार नाही. हे बघ आजी आली. आजी थांब ती ममाची sandal नको घालू. ही घे तुझीच चप्पल घाल." तो आजीला बोलला. "अरे पण तुला माझ्या चपलीचा आवाज आवडत नाही म्हणून हीच घाल बोलला होता ना??" आजीने प्रश्न विचारला.

"तसा आवडत नाही मला तो आवाज पण तू मला रस्त्यात गोष्ट सांग ना..! तुझ्या गोड आवाजात कोणताही आवाज मिसळला की गोडच होतो." असे बोलून दोघेही त्याच्या शाळेत गेले.

आणि दोघांना जाताना दूरवर पाहणारी बिल्वची आई स्वतःच्या सासूचे ब्रह्मचारिणी रूपाचे स्वरूप मुलाला सहजरीत्या उमगलेले पाहून मनातून सुखावली.

🎭 Series Post

View all