**प्रतिबिंब
**
उर्वशीची बी.एम.डब्लु कार पाहून फोटोग्राफर धावत आले. उर्वशी बाहेर येतात भराभर फोटो क्लिक व्हायला लागले. मागे मागे इतर सेलिब्रिटी ही यायला लागले.

स्टेजवर येतात उर्वशीचे फोटोशूट सुरू झाले , उर्वशी ने लेटेस्ट डिझाईन चा हाफ
शोल्डर ,डीप गळ्याच्या निळ्या रंगाचा गाउन घातला होता गळ्यात नाजूकस नेकपीस ज्याचं पेंडेंट दोन्ही उभारावर हेलकावे घेत होते, केसांची एक बट हायलाईट केलेली. एखाद्या तरुणीला लाजवेल असा जामानिमा.
मॅम एक फोटो अजून म्हणत
दोन तीन स्टाईल चे फोटोकाढले गेले प्रसन्न कुमार बरोबर ही एक फोटो काढत असताना अचानक काही फोटोग्राफर दाराकडे धावले “नर्गिस बानू आयी है”असा हल्ला ऐकून बाकीचे फोटोग्राफर ही तिकडे धावले .
उर्वशी मनातून अपसेट झाली पण चेहऱ्यावर भाव न येऊ देता हसत हसत इतर समवयस्क कलाकारांशी बोलत फिरू लागली.

ही ग्रँड पार्टी आशुतोष मुखर्जीच्या फिल्म च्या प्रोमाची होती. नवे जुने बर्याच कलाकारांना निमंत्रण होते. बरेच कलाकार जोडी ने आले होते.
पार्टी मध्ये डांस सुरू होताच उर्वशी ला एकटीच पाहून काही जणांनी तिला पार्टनर म्हणून हात पुढे केला. त्याच्या सोबत ती नृत्य करू लागली.

त्या पार्टीत सुबोध गांगुलीं च्या नव्या फिल्म ची चर्चा होत होती फार मोठ्या बजेट ची फिल्म बनवणार असे बोलले जात होते. ह्या फिल्म साठी लीड एक्ट्रैस कोण असेल ह्याची चर्चा होत होती.
“.मॅम एक नवीन फिल्म सुबोध गांगुली यांची सुरू होत आहे “सेक्रेटरी निशि ने दुसरे दिवशी बातमी दिली.
“हो काल चर्चा चालली होती पार्टी त.
“हो मॅम जुन्या मदर इंडिया चा रिमेक , ब्लॉकबस्टर फिल्म बनवण्याचा विचार आहे त्यासाठी हीरोइन अजून ठरली नाही, पिक्चर फिल्म फेस्टिवल मध्ये जाईल असे ऐकून आहे. बर्याच जणी प्रयत्न करतात आहे लीड रोल साठी. “
निशी ने बातमी देताच उर्वशी विचारात पडली ही पिक्चर तिला मिळायला हवीच. तिच्याबरोबरच्या सगळ्याच नट्या म्हाताऱ्या दिसायला लागलेल्या त्यात उर्वशी अगदी अजूनही नव्यांना टक्कर देईल इतपत आपले तारुण्य राखून होती.
रात्री आरश्या समोर उभी राहून तिने स्वतःला न्याहाळले. मागच्याच आठवड्यात फॉरेन होऊन परत आली तिथे मेकओव्हर करून आली होती त्यामुळे ती फ्रेश दिसत होती. जशी वीस वर्षांपूर्वी होती. हे तारुण्य, हे सौंदर्य राखण्यासाठी तिने काय काय नाही केलं…?
अगदी लहान असल्यापासूनच ती खूप सुंदर आहे याची तिला जाणीव घरातल्यांच्या बोलण्यातून व्हायला लागली. अम्मा तर रोज तिची दृष्ट काढायची . शाळेत सिंड्रेलाच्या नाटकातही तिलाच रोल मिळाला परी सारखी सुंदर म्हणून.
उर्वशी हे तिचं खरं नाव नव्हतं.सुमुखी अम्माने ठेवलं होतं. नाटकात पहिलं बक्षीस म्हणून एक सुंदर आरसा तिला मिळाला, आपल्या रूममध्ये तिने तो लावला त्यात रोज ती आपले रूप न्याहाळत असे नाटकात ल्या आरशाप्रमाणे तिला तिच्या रूपाची ग्वाही आरशाकडून मिळत होती.
पाहता पाहता सुमुखी कॉलेजला पोहोचली. अनेक तरुण मुले तिच्या वर फिदा होती कालेज ची ती ब्युटी क्विन होती. कॉलेजच्या एका फंक्शनमध्ये तिला एका प्रोड्युसर ने पाहिलं आणि फिल्म साठी ऑफर दिली आणि तिथेच सुमुखी ची ती उर्वशी झाली.
आता ती सौंदर्याबाबत जास्तच काळजी घेऊ लागली एक दोन फिल्म तिला सौंदर्याच्या जोरावर मिळाल्या.एक्टिंग मध्ये मात्र ती जेमतेम होती.
तीस-पस्तीस ची होता होता तिला मनोज कपूर ने मागणी घातली. एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट तिच्या रूपाने मोहित झाला होता.
. एक वर्ष झाले लग्नाला, उर्वशी ची डिमांड कमी होत होती. त्यातच मनोजला एक मूल हवं असं वाटू लागलं उर्वशीने बरेचदा टाळायचा प्रयत्न केला.
या इंडस्ट्रीमध्ये आई झालेल्या हिरोईनची मागणी कमी होत जाते त्यांना साईड रोल किंवा कमी दर्जाचे काम मिळते आपले स्वातंत्र्य, सौंदर्य घालवून बसतात हे तिने पाहिलं होतं.
तिचाचाळीसावा वाढदिवस होता नेहमीप्रमाणे तिने तो थाटात साजरा केला.एका फिल्म ची ऑफर तिला मिळाली, त्याच आनंदात ती होती.दरवर्षीप्रमाणे तिने खूप से फोटो शूट केले.
आपल्या त्या आरशात तिने स्वतःला निरखले,आरस्या ने अजूनही तू तशीच सुंदर आहे अशी ग्वाही दिली.
मनोज तिला सतत मूल हवं म्हणून हट्ट करू लागला पण या नव्या पिक्चरचं काम झालं की च कारण तिने पुढे केले, दोघांमध्ये वाद झाला.
“ तुला मूल नकोच आहे कां ?त्याने स्पष्ट विचारले तेव्हा उर्वशीने सध्या तरी मला ती जबाबदारी नको असे सांगितले.
मनोज ने तिला समजावून पाहिलं तो म्हणाला “मूल म्हणजे आपल्या प्रेमाची निशाणी असेल घराण्याचा वारस वगैरे बरेच “ पण तिने त्याचे बोलणे धुडकावून लावले. दोघात खूप भांडण झाले त्या रागाच्या भरात उर्वशीने वेगळ घर घेतलं .

ती आणि मनोज वेगळे झाले. उर्वशीने
सगळं लक्ष कामावर केंद्रित केलं तिचे दोन तीन सिनेमे हिट झाले तिचा उत्साह ही वाढला…

“मॅडम— सेक्रेटरी निशीच्या आवाजाने ती भानावर आली.” मॅडम ते सुबोध गांगुलींची आपली भेट आठ दिवसांनी फिक्स करूया का?
हो हो तोपर्यंत मी जरा युरोप टूर होऊन येते नव्या पिक्चर साठी फ्रेश लुक हवा.

उर्वशी परत मेकओव्हर करून नव्या फिल्म साठी सज्ज झाली.
बरोबर आठ वाजता गांगुली कडे जायचे म्हणून मेकअप आर्टिस्ट तिला तयार करत होती.
मॅडम कुठल्या पिक्चरची ऑफर?
“अग फार मोठा ऑफर आहे! मला हवा आहे.”
काय स्टोरी आहे?
पता नहीं ,बेफिक्रिपणे तिने उत्तर दिले.
मॅडम कुठल्या पिक्चरची ऑफर?
“अग फार मोठा ऑफर आहे! मला हवा आहे.”
काय स्टोरी आहे?
पता नहीं ,बेफिक्रिपणे तिने उत्तर दिले.
गांगुलींकडून उर्वशी परत आली तिचं डोकं भडकलेलं होतं. सेक्रेटरीने तिचा मूड पाहून काहीही विचारले नाही, तरीही उर्वशी रागाने बडबडत होती “समझता क्या है अपने आपको? “माझ्यासारख्या स्टारला म्हणतो तुम्हाला जमणार नाही? चॅलेंज देत होता. इतकी वर्ष आहे या इंडस्ट्रीमध्ये आणि हा काल आलेला…
सेक्रेटरी चुपचाप निघून गेली.
उर्वशी खोलीत आली आरस्या समोर उभ राहून तिने स्वतःला पाहिलं, तशीच वीस वर्षांपूर्वीची दिसते म्हणून रिजेक्ट? कां तर आईच्या रोलला मी फिट नाही? गेटअप आणि मेकअप ने सर्व करता येत उर्वशीने आरग्यु केलं तरी ही.
नो–?.....
सुबोध चे ते जळजळीत वाक्य तिच्या कानात गरम सीशाप्रमाणे शिरले”.
तुम्ही आई नाही दिसणार !तो भाव ते ममत्व,त्याचा तुम्हाला अनुभव नाही. तुमचा चेहरा कचकड्याच्या बाहुली प्रमाणे आहे.तुमचा चेहरा एक प्रेमळ वयस्कर आईचे फिलिंग नाही दाखवू शकत..
तिच्या मुळा वरच त्याने घाव घातला.
उर्वशीचे डोके फिरले ती रागात निघून आली, समोर आरसा तिचं सौंदर्य दाखवत होता, पण मनाच्या आरशात मुखौट्या च्या मागचा चेहरा तिला हिणवत होता आता तोच चेहरा तिला विदृप भासत होता., खरंच आईपणाचा अनुभव नाही घेतला!ते भाव कसे असतात जेव्हा बाळ कुशीत येत?
मनोज ची तिला आठवण झाली त्या वेळी तिने त्याला धुडकावून लावला पण् कुठे तरी आतुन अताशा कमतरता भासत असते त्या भावना कशा असतात कोण जाणे.
सौंदर्य राखण्याच्या या कल्पनेने तिने स्वतःला त्या सुखापासून वंचित केले नी आता ती वेळ निघून गेली.
“ हे तारुण्य खोट आहे, वय वाढलेल आहे हा नकली चेहरा आहे. तुझी हार झाली आहे असे आरस्यातल प्रतिबिंब तिला म्हणू लागले ती संतापाने बेभान झाली, आणि रागाच्या भरात तिने त्यावर हातातला ब्रश फेकून मारला.
आरस्या ला तडा गेल्या आणि अधिकच विकृत असे तिचे अनेक प्रतिबिंब तिला हसत आहे असे आरशात तिला दिसू लागले.

________&_________________लेखिका … सौ.प्रतिभा परांजपे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा