बींदणी भाग 1

कौमुदी बायको? रघुवीर हे काय बोलतोय? कॉलेजचे मित्र ना फक्त तुम्ही?

"मी आणि तुझी बायको? काय डोकं बिकं फिरलंय का तुझं?? काय गोंधळ घालून ठेवलाय हा? मला आत्ताच्या आत्ता इथून जायचं आहे, सरक..."

कौंमुदी रघुवीरला बाजूला करत म्हणाली..रघुवीरने तिचा हात पकडत तिला थांबवलं आणि म्हणाला,

"बींद समज रहे है म्हारो अन तुंहें हमरी बींदणी.."

कौमुदी सूर लावून..."कायsssss?"

"हे आपलं...सॉरी, ते मला तुझा नवरा समजताय आणि तुला माझी बायको.."

"समजताय काय समजताय... तूच मोठ्या तोऱ्यात बाहेर म्हणत होतास...ही माझी बायको आहे म्हणून.. काय संबंध काय आपला?"

"ए असं बोलू नको...आपण एकाच कॉलेजचे मित्र ना.."

"कसला मित्र?? शेवटच्या वर्षाच्या एका प्रोजेक्टसाठी इथे आलोय आपण.. आपल्या ग्रुपला पिटाळून लावलंस, उरले मी..हे सगळं करण्यासाठी आलोय आपण? आणि एक मिनिट....मला kidnap तर केलं नाहीस ना तू? तसं असेल तर..."

कौमुदी शेजारी ठेवलेला फ्लॉवरपॉट हातात धरून त्याच्या डोक्यावर मारण्याच्या बेतात असते...

"ओ मेरी माँ... शांत बाई शांत...मी तुला सगळं सविस्तर सांगतो.."

"काही एक ऐकायचं नाही मला..सोड माझा रस्ता.."

कौमुदी बॅग उचलून बाहेर निघायला बघते, तिची अखंड बडबड चालूच असते..

"कॉलेजमध्ये प्रोजेक्टसाठी यालाच द्यायचं होतं सरांनी मला, दुसरं कुणी नाही भेटलं का..पाय तोडत इथे राजस्थान मध्ये येऊन पोचलो, ते पण याच्या गावात.. अकस्मात याच्या नातेवाईक दिसले आणि केलं मला नवरी...वा, हे असलं..." दार उघडण्याच्या बेतात असतानाच रघुवीर तिला आत खेचतो आणि तिच्या तोंडावर हात दाबून धरतो.. तिची बडबड बंद होते आणि डोळे मात्र मोठे होतात.. ती ओरडू बघते पण रघुवीरचा आवेश बघून ती अजूनच घाबरते..

"हे बघ, हे सगळं होईल याची कल्पना मलाही नव्हती...आमच्या गावात एक नियम घालून दिलेला आहे...बावीस वर्षाचा असताना मुलांचं लग्न व्हायलाच हवं, नाहीतर त्याला वाळीत टाकलं जातं.. यामागे एक खूप मोठी कथा आहे...सगळं सांगतो, आता फक्त माझ्यावर विश्वास ठेव.."

कौमुदी त्याला पहिल्यांदाच इतक्या जवळून बघत होती, त्याच्या डोळ्यात खरेपणा होता..काही क्षण ती त्यात हरवून गेली होती, एक आपलेपणाचा स्पर्श तिला जाणवत होता..

(नमस्कार मंडळी, घेऊन येत आहे एक भन्नाट कथा..आता तुम्ही म्हणाल एवढूसा भाग?? हीच तर खरी मजा आहे, सुरू करत आहोत ईरावर एक नवीन प्रयोग... डेली सोप प्रमाणे तुम्हाला हमखास रोज एक लहानसा भाग वाचायला मिळणार म्हणजे मिळणार, तेही सबस्क्रिप्शन शिवाय..!!! म्हणजे आपली भेट रोज होणार.. रोज नवीन रहस्य, नवीन प्रसंग आणि नवीन पात्र...
अगदी तारक मेहता सारखं रोजच्या रोज मनोरंजन...
तयार का या रोजच्या एपिसोड साठी? आणि हो, लाईक कमेंट्स केली तर असा काही हुरूप येतो की काय सांगू !! मग बघताय काय, करा...)

🎭 Series Post

View all