बिनधास्त...!!
आज happy women's day, आहे ना...!!
म्हणजे.....?
अग,बायांचा म्हणजे बाईमाणसांचा दिवस ग....!!
म्हणजे....?
अग , जसं स्वातंत्र्यदीन, बालदीन,कामगार दीन, असतो ना,तसच स्त्रियांचा दिवस...!
असं का,मग जाऊद्या...
का ग,काय झालं....??
आपल्याला काय त्याचे....??
असं कसं,तू पण महिला,स्त्री आहेस की....!
म्हणजे,तुम्ही पण साजरा करणार....??
हो मग,हे काय . सगळ्या व्हॉट्स अप ग्रूपवर कोटस् टाकणार, मैत्रिणींना शुभेच्छा पाठवणार, एफबी वर पोस्ट लिहिणार,सगळ्यांना रिप्लाय देणार,स्टेटस ठेवणार.....
एवढंच होय....?
म्हणजे....??
मला वाटले मला सुट्टी देतात की काय...!!
आं...सुट्टी तर मला पण नाहीये ग...
तू मला happy women's day , आणि मी तुला ,happy women's day. म्हणुया," बिनधास्त."
....
दिवसाची सुरवात.अशी काही होते की,झोपेतून उठल्या उठल्या हात सगळ्यात आधी फोन उचलते.आणि एखाद्या दिवशी मनात येते की,आज सगळी कामे आटोपल्या शिवाय फोनला हातच लावायचा नाही.
त्यादिवशी असेच झाले होते जरा उशिरा फोन हातात घेतला आणि बघते तर एफबी वर वुमन्स डे चा जोरात उत्सव चालू होता.तेव्हा लक्षात आले की,' अरे आज आठ मार्च वुमन्स डे नाही का ?' नेहमी प्रमाणे स्त्रियांच्या उत्सवाला उधाण तर येणारच.
पण मनातील सामाजिक बांधीलकी शांत बसू देईना.काहीतरी केले पाहिजे.म्हणजे काहितरी लिहिलेच पाहिजे.
मग जसे सुचत गेले तसे एफबी वरच डायरेक्ट टायपायला सुरू केले.सकाळचा नाष्टा करता करता दुसरीकडे काही वाक्ये टायपून झाली.जागेवरच पोस्टून पण टाकली.
म्हणतात ना,लिहिणारा भावना लिहितात तर वाचणारे फक्त वाक्यच वाचतात.त्या वाक्यांमागचा उद्देश किंवा भावना वाचणारे शंभरात एखादे असेल तर त्या आनंदाला शब्दात सांगता येत नाही.तो फक्त अनुभवायचा असतो.अगदी गुप्तपणे ,मनातल्या मनात.असो.
ही मागच्या वर्षीची गोष्ट होती.पण पोस्ट आठवणीतली आहे म्हणून या वर्षी पोस्ट केली.आणि यावर्षी जरा अजून छान काहीतरी लिहावे असे ठरवले.नक्की वाचा. या वर्षीचा पुढचा ब्लॉग.©® Sush.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा