Login

जन्म

आयुष्य सुंदर आहे....

जन्माचे सत्य अजुन ही कोणाला कळले नाही....

या पृथ्वी वर का आलो या पृथ्वी बाहेर काय आहे....

प्रत्येक दिवस आपण जगत आहोत....

वेळ ही अंतर कापत पुढे जात आहे....

काय शिकायचं होत किंवा काय शिकऊन जायचं आहे...

काय साध्य करायचं होत आणि काय मिळतं आहे...

खरचं विचार करा.. जन्माचे कोडे कळते काय तुम्हाला....

आयुष्य हे सगळेच जगतायत पण त्या आयुष्याला समजुन कोण घेतय...

शरीराची दिसणारी सुंदरता ही पंचमहाभुताने बनली आहे....

या पंचतत्वापासून हे निसर्ग बनलं आहे....

कोणाला ओळखायचे आहे... स्वतः ला की दुसऱ्याला 

कोण आहोत आपण.... नावाने ओळखं कळते पण ते सोडून कोण आहात तुम्हीं.... 

एखादी गोष्ट जेव्हा अचानक होते तेव्हा बिथरून जाता....

तेव्हा स्वतः तावर विश्वास ठेवा सगळं चांगलं होईल....

जन्माच रहस्य लपलय तुमच्या कर्माशी 

भुतकाळ जो कोणाला ही माहित नसतो....

जे आठवतंय ते दुरुस्त करता येत समजुन निर्णय घेऊन पुढे जाता येत....

पण जे माहित नाही त्याच उत्तरं कसं शोधायच.....

कुठे अपूर्ण पडतो आपण की जे ओळखता येत नाही.....

स्वतःची मनाची निवड मजबुत करा आणि त्यावर विश्वास ठेवा...

एकदा चुकाल दुसऱ्यांदा फसले जाल...

पण या अनुभवातून निर्णय घेण्याचा अंत मजबूत घडेल....

स्वतःवरील विश्वास तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं शोधून काढेल....

ते पंचमहाभूताने बनलेले मनच तुम्हाला मार्ग दाखवेल...

जय हो मंगल हो....

0

🎭 Series Post

View all