आधीच्या भागात आपण पाहिले की, अभिज्ञा आणि अभिराज मावशीकडून परत आले. घरी आल्यानंतर अभिराजने गरम गरम खिचडी बनवली आणि दोघेही जेवले. इकडे मावशी आणि नातूच छान सुरू होतं, तो बोलता बोलता आजीला बिलगली.
आता पुढे,
आज बऱ्याच दिवसानंतर अभिज्ञाचे डोळे भरून आले, तिला मनोमन रडायला येत होतं. अशा दिवसात फिलिंग चेंज होत असतात हे अभिराजला माहिती होतं म्हणून तो तिच्या हळूच जवळ गेला.
“काय झालं अभिज्ञा? तुझे डोळे पाणावले आहेत, काय होतंय तुला? काही बोलायचंय का तुला? काही सांगायचं का?”
नकारार्थी मान हलवून अभिज्ञाने तिच्या डोळ्यातले अश्रू लपवले. अभिराजच्या लक्षात आलं सगळं.
“आर्यनची आठवण येत आहे ना तुला?”
तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
“मग बोल ना काय झालं? जे काही तुझ्या मनात असेल ना ते सगळं सांगून टाक. असं मनात काही ठेवू नकोस. हे बघ तुला खरंच जर आर्यनची आठवण येत असेल ना इट्स ओके नॅचरल गोष्टी आहे. आपल्या जवळचा माणूस आपल्याला असा सोडून गेला तर आठवण येतेच नॅचरल आहे ते तू वाईट वाटून मला कळल तर मला काय वाटेल असा विचार करून वाईट वाटून घेऊ नकोस. आर्यन लकी आहे त्याच्यावर प्रेम करणारी तू होतीस आणि मी आर्यन पेक्षा जास्त लकी आहे की माझ्यावर प्रेम करणारी तू मला मिळालीस. आय एम सो लकी अँड आय लव्ह यु सो मच.” असं म्हणत त्याने तिला जवळ घेतलं.
अभिज्ञा बोलू शकली नाही पण आज खरच तिला आर्यनची खूप आठवण येत होती. का कुणास ठाऊक आज तिने तिच्या कपाटातून आर्यनचा फोटो बाहेर काढून ठेवला आणि खूप वेळपर्यंत त्या फोटोला बघत बसली होती. पण तिला हे सगळं सांगून अभिराजला दुखवायचं नव्हतं म्हणून ती गप्प राहिली.
“अभि आपल्याला उद्या मार्केटमध्ये जावं लागेल.”
“काय ग काय घ्यायचं?”
“बाळासाठी काही सामान आणून ठेवायचे आहेत आणि मला माझ्यासाठी पण घ्यायचंय. उगाच वेळेवर धावपळ नको. आपण दोघेच आहोत मग काही लागलं तर कोण आणायला जाईल आणि उगाच तुला नंतर त्रास नको म्हणून मी लिस्ट बनवून ठेवली आहे. आपण उद्या जाऊया आणि घेऊन येऊया.”
“ठीक आहे चालेल. चल आता आराम कर.” असं म्हणत दोघे आत गेले.
“दुसऱ्या दिवशी अभिज्ञा आणि अभिराज दोघेही शॉपिंगला गेले. आज बाळासाठी खूप काय काय सामान आणायचं होतं. दोघे तयार होऊन घरून बाहेर निघाले. दोघेही मॉलमध्ये गेले, बराच वेळ सामान बघितल्यानंतर काही सामान घेऊन झालं. दोघांची एक-दोन तासाची भटकंती झाली त्यानंतर ते शॉपिंग मॉल मधून बाहेर निघाले. त्यानंतर अभिज्ञाला दवाखान्यात जायचं होतं.
दोघेही दवाखान्यात गेले, डॉक्टरने चेकअप केलं आणि गर्भातलं पाणी कमी झाले त्यासाठी काही मेडिसिन्स लिहून दिल्या, बाकी सगळं ठीक आहे काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. दवाखान्यात जाऊन आल्यानंतर त्यांनी मेडिसिन घेतली आणि ते जेवण करायला बाहेर हॉटेलमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर अभिराजने ऑर्डर दिली.
अभिराज आणि अभिज्ञाला एकमेकांच्या सगळ्या आवडीनिवडी माहित होत्या. कुणाला काय पदार्थ आवडतो हे माहित होतं. दोघांनी ऑर्डर दिल्या आणि त्यानंतर दोघे गप्पा मारत बसले.
“तुला आठवते आपली पहिली भेट कशी झाली ते.”
“आठवते ना सगळं आठवतंय खरंच त्यावेळी तू माझी खूप मदत केलीस रे. त्यावेळी कदाचित तू नसतास तर मी आज इथे तुझ्यासमोर नसते.”
“ए वेडाबाई काही बोलू नकोस मला त्यावेळी जे वाटलं जे सुचलं ते मी केलं आणि खरंच ग त्यावेळी तुझी अवस्था बघवली नव्हती मला, कशी पाण्यात भिजत बसली होतीस, तुझी अवस्था बघवली नाही आणि म्हणून मी तुझ्या जवळ येऊन तुझ्याशी बोललो. तुझी मदत केली.”
“हो त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती रे.” असं म्हणत अभिज्ञा भावुक झाली, तिचे डोळे पाणावले.
“अभिज्ञा जाऊ दे ग आता तो विचार करायचा नाही. ते दुःखाचे दिवस आठवण्यापेक्षा आपण सुखाचे दिवस आठवायचे. आपल्या लाईफ मध्ये काही कमी उतार-चढाव आलेली नाहीये पण सगळ्यांना सामोरे जात आपण इथपर्यंत आलोय. जीवनात अशी सुखदुःख येतच राहतात आपण हिमतीने सगळ्यांचा सामना करायचा आणि लढत राहायचं आणि आनंदाने जगत राहायचं. आता आपल्या लाईफ मध्ये काही टेन्शन येणार नाही बघ तू. एकदा का माझी मुलगी या जगात आली ना की तिच्या पायगुणाने सगळं व्यवस्थितच होणार.”
“मुलगी होणार आहे तुला कसं माहित?”
“मुलगी येणार आहे की नाही मला माहीत नाही पण मला मुलगीच हवी आहे अगदी तुझ्यासारखी गोड आणि सुंदर.”
“आणि मला मुलगा हवाय अगदी तुझ्यासारख्या हँडसम.”
“बघू काय होईल ते.”
त्यांचं बोलणं सुरू असतानाच जेवण आलं, दोघं गप्पा मारता मारता जेवण केले आणि त्यानंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर अभिज्ञाने सगळं सामान काढलं.
“बापरे अभिज्ञा हे काय आहे सगळ? खोली तर खेळण्यांनी भरून जाईल.”
“मग काय भरू दे नंतर तू जाणार आहेस का आणायला आणि वारंवार तुला त्रास नको म्हणून मी वर्षभराचं सगळं सामान घेऊन आली आहे, उगाच नंतर तुला कटकट नको रे. हे बघ अभि बाळाचे कपडे बाळाचे खेळणी, बाळाचे दूध पावडर सगळं घेऊन आली आहे मी. जे सामान एक्सपायरीचे असतात ना ते थोडे थोडे आणले आहेत ते नंतर तू पुन्हा आणू शकतोस आणि जे परमनंट लागणार आहे ना ते मी जास्त आणून ठेवलंय. उगाच काय रे तुला तीन तीनदा सांगायचं आणि आता बाळ आलं की आपली कामे वाढणार आहे. तुला मला घरातल्या कामात पण मदत करावी लागेल. कधी कधी बाळाला पण बघावं लागेल. मग करशील ना एवढं माझ्यासाठी?”
“हो करेल तू चिंता करू नकोस.”
“नाही रे तू असल्यावर मला टेन्शन नाही, तसंही मी टेन्शन फ्री आहे आणि हो उर्वीला मी बोलवणार आहे काही दिवसांसाठी, तिला सांगेल की इकडेच राहा इथूनच ऑफिस कर कमीत कमी रात्री तर मला तिची मदत होईल. कारण बाळ रात्रभर जागवेल मग मला रात्रभर जागाव लागेल. सकाळी उठल्यावर सगळी कामे.”
“ अग पण बाई येईल ना.”
“ती येईल रे पण तरी सकाळचा चहा वगैरे ऊर्वी करून देईल तुला.”
“अग चिंता नको करू मी करेल चहा वगैरे.”
“पण तुला येतो का चहा? नाही येत ना.”
“तर मी शिकून घेईन, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. तुझा फोन वाजतोय घे फोन.”
अभिज्ञाचा फोन वाजत होता, ऊर्वीचा कॉल होता.
“हाय अभिज्ञा कशी आहेस ग?”
“मी मस्त, आत्ता शॉपिंग करून आली आहे आणि हो ऊर्वी तू संध्याकाळी घरी ये, मी काय काय घेतलंय तुला दाखवेल, खूप खूप शॉपिंग करून आली आहे मी.”
“अग थांब थांब जरा दम धर किती बोलतेस, मला बोलू दे.. काय हे किती बोलणार आहेस तू श्वास घे आणि शांत रहा. मी येते संध्याकाळी आपण बोलू.”
“ठीक आहे.”
“आणि हो आता एवढं सांगत बसू नकोस तू फोनवर, कशी आहेस तेवढ सांग आणि कधी आलीस ते सांग कारण तू मला फोन केलाच नव्हता.”
“सॉरी ग दोन दिवस झाले आले.”
“तुला माझी आठवण येत नाही आता मी नंतर तुझ्याशी बोलणारही नाही आणि तुला फोनही करणार नाहीये.”
“ये रागवू नको ना असं काय करतेस? तू एकच माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना आणि आता तुही रागवणार आहेस?”
“मग मी काय करू तुला माझी आठवण येत नाही मीच तुला कॉल करत असते.”
“सॉरी..”
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा