बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 28

Abhidnya Abhira Love bond


बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 28
आधीच्या भागात आपण पाहिले की,

अभिज्ञा आणि अभिराजने भरपूर खरेदी केली, बाळाचे सगळे साहित्य घेऊन आणले. अभिज्ञा डॉक्टर कडून चेकअपही करून आली. सगळं व्यवस्थित होतं. गर्भातलं पाणी थोडं कमी झालेलं होतं. डॉक्टरने त्यासाठी मेडिसिन दिलेल्या होत्या.
ऊर्वीचा फोन आला आणि अभिज्ञाने तिला घरी बोलवलं खेळणी बघायला. ऊर्वी तिच्यावर रागावली तू आठवणच करत नाही मीच फोन करते असं म्हणून दोघींचं बोलणं झालं.

आता पुढे,


संध्याकाळी ऊर्वी घरी आली, ऊर्वी आल्या आल्या साक्षी तिला बिलगली.

“ऊर्वी हाय अग मी तुझीच वाट बघत होती.”
अगं हळू... हळू किती तो तुझा उतावळेपणा, जरा हळू घे, अग मी आले आहे ना आता आणि लगेच जाणार नाही आहे आपण बोलू आरामात. मला आता आत येऊ देशील?”

“तुला नाही माहित मला खूप आनंद होतोय. बाळाची अशी खेळणी आणि हे सगळं सामान बघितलं की मला खूप खूप प्रसन्न वाटते. अभिला विचार कालपासून मी किती आनंदात आहे, हो ना अभि.”

“हो खरच आहे तिचा आनंद गगनात मावेना झालाय. कालपासून इकडून तिकडे तिकडून इकडे करतीये.”

“हो पण या सगळ्यांमध्ये तू तब्येतीकडे लक्ष देतेस ना? डॉक्टरने काय सांगितले?” उर्वी

“हो ग मी मेडिसिन वेळेवर घेते आहे त्याची काळजी तू करू नकोस. मी सगळं व्यवस्थित करत आहे. तू ये ना, तू ये चल आत खोलीत चल मी तुला खोलीत दाखवते सगळं.”

ती ऊर्वीला आतल्या खोलीत घेऊन गेली. ऊर्वीने दारात पाय ठेवत नाही तर तोंडावर हात ठेवला.

“बापरे अभिज्ञा हे सगळं काय आहे, किती सामान घेतलेस तू आणि काय ग एवढा खर्च करायची काय गरज होती तुला? अग खाज सामान नंतर घेतलं असतं तरी चाललं असतं. एकदम पैसे इन्व्हेस्ट का केलेस तू एवढे?”

“असू दे ग, माझ्याकडे काही सेविंग होती ना त्यातलेच पैसे वापरलेत मी. अभिच्या पैशाला हात नाही लावला आहे आणि काय ग तू आता मला पैशावरून बोलणार आहेस का?”

“तसं नाही ग, समोर आता पैशाची गरज भासेल ना म्हणून म्हटलं तुला.”

“तू माझी मैत्रीण कमी आणि सासू जास्त आहे. काय ग मी तुला कशाला बोलावलं आणि तू इथे येऊन काय करतेस.”


“सॉरी सॉरी आता नाही बोलणार पण मूड खराब करू नकोस. चल चल मी तुझ्यासाठी काहीतरी चमचमीत नाश्ता बनवते.” ऊर्वी

“अग तू कशाला मी बनवते.” अभिज्ञा

“अभिज्ञा मॅडम तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काहीतरी छान बनवते.”

“ओके.. अग पण तू माझ्या घरी आली आहेस ना मग मला बनवायला हवं.”

“आज मी बनवते तुझ्या आवडीचं तू बस आणि अभिसाठी पण बनवते.”

“अग पण आधी खेळणी तर बघ.” असं म्हणत अभिज्ञाने तिला खोलीच्या आत नेलं, दोघींनी सगळी खेळणी खोलून बघितली, बाळाचे कपडे, टॉवेल, ब्लॅंकेट, स्वेटर अजून भरपूर असं सगळं सामान उघडून बघितलं, त्यानंतर ते पॅक केलं. आणि दोघी हॉलमध्ये येऊन बसल्या.

आज अभिज्ञाला पास्ता खायची इच्छा होत होती. ऊर्वीने तिच्यासाठी पास्ता बनवला. दोघींनी मस्त पास्ता खाल्ला, गरमागरम कॉफी घेतली आणि मस्त टीव्ही बघत बसल्या.

“आता जाऊ नकोस आपण इकडेच डिनर प्लॅन करूया, तसही तू घरी एकटीसाठी काय बनवणार आहेस आपण इथे छान डिनर बनवूया चालेल ना तुला.”

“हो चालेल.”
“अग हो तुला सांगायचं राहिलं हे बघ माझ्या डिलिव्हरी नंतर तुला इथेच राहायचं, काही दिवस तुला इथे राहून इथूनच अपडाऊन करायचंय ऑफिस साठी. चालेल तुला हे बघ आई येऊ शकणार नाहीत तसं अभि बोलला होता त्यांना घेऊन येईल पण नाही ग त्यांच्याने तेवढे काम नाही होत, तू सोबत असशील तर थोडीफार मदत होईल मला, आणि तुला माझ्याजवळ राहावं लागेल.”
“हो ग त्याची काळजी तू करू नकोस मीही राहील आणि अभि आहेच ना काही लागलं तर तो आहेच आपल्या सोबत. सो डोन्ट वरी आणि काय ग कनिकाचं सगळं झालं ना व्यवस्थित? काय चाललंय तिचं?”

“काही माहित नाही काय काय तिच्या डोक्यात शिजतंय कोणास ठाऊक? आधी अभिच्या मागे लागली होती तिच्या ऑफिसमध्ये नोकरी करण्यासाठी. मी तर चक्क अभिला सांगितलं तिच्या नादाला लागू नको. माहित नाही का अशी वागतीय ती, भावा बहिणीचं नातं विसरली की काय काही समजतच नाही. तिने रक्षित सोबत काय काय प्लॅन बनवले होते.”

“पण कनिका तर आधी अशी नव्हती ना ग.”

“तेच तर, तुला आठवतय जेव्हा अभि घर सोडून गेला होता, त्यावेळी घरात तीच एक व्यक्ती होती जी माझ्या सोबत होती. अभि नव्हता तेव्हा तिने मला आधार दिला होता, तीच माझ्या सोबत असायची. मला मानसिक धक्का बसलेला होता त्यातून तिने मला सावरलं. पण आता काय झालं कुणास ठाऊक ती विचित्र वागायला लागली आहे. रक्षित सोबत मिळून काय काय प्लान बनवते कुणास ठाऊक? रक्षितचा काहीतरी बंदोबस्त करावंच लागेल. आता तो गप्प आहे, शांत आहे पण समोर जर काही वाटलं तर आम्ही पोलीस कम्प्लेंट करणारच आहोत. दोघींचं बोलणं सुरू असताना तिथे अभिराज आला.

“काय सुरू आहे तुमच्या दोघींचं?”

“काही नाही गप्पा चालल्या आहेत.” अभिज्ञा

“उर्वी अग तू पास्ता बनवणार होतीस ना? कधीचा मी वाट बघतोय आवाज देण्याचा. मी आत बसलो होतो मला वाटलं उशीर असेल मी तसाच बसून राहिलो. बघ ना किती उशीर झालाय पास्ता बनवणार होतीस ना?”

त्याचं बोलणं ऐकून दोघी एकमेकांकडे बघत राहिल्या,

“अगं काय झालं पास्ता बनवणार होतीस ना उर्वी”

“पास्ता बनवला होता आणि संपला ही.” ऊर्वी अडखळत बोलली.”

“काय? अभिराज जोरात किंचाळला.
“पास्ता बनला देखील आणि तुम्ही दोघींनी खाल्ला देखील, मला आवाज दिला नाही. अग मी आत बसलो होतो म्हटलं तुमच्या मैत्रिणींच्या मध्ये मी बसून काय करू म्हणून मी आतल्या रूम मध्ये बसून मोबाईल बघत होतो. आणि तुमचं काय तुम्ही दोघींनी पास्ता बनवून खाऊन घेतला. धिस इज नॉट फेअर उर्वी अभिज्ञा, तुम्ही दोघींनी हे बरोबर केलेले नाहीये. कॉफी तरी बनवलीस का? की तीही तुम्ही दोघीच प्यायलात?”


“ती ही आम्ही दोघीच प्यायलो.” अभिज्ञा अडखळत बोलली.

“तुम्हा दोघींना बघून घेईल मी, मी चाललो किचनमध्ये मी माझ्यासाठी पास्ता बनवतो आणि खातो आणि कॉफी आता मीच बनवणार. तुम्ही मारा तुमच्या गप्पा.” असं म्हणत तो चिडून किचनमध्ये गेला.

त्याला किचनमध्ये जाताना बघून ह्या दोघी खूप जोरात हसल्या. अभिराजने मस्तपैकी पास्ता बनवला त्याच्या रूममध्ये गेला आणि फस्त केलं. त्यानंतर पुन्हा किचनमध्ये जाऊन त्याने गरमागरम कॉफी बनवली आणि तोही मस्त मोबाईलवर गेम खेळत खेळत कॉफी प्यायला. या दोघी त्याच्याकडे लक्ष ठेवून होत्या. तो काय काय करतो आणि काय काय खातो हे बघत होत्या आणि दोघी एकमेकींकडे बघून खुदुखुदु हसत होत्या. संध्याकाळी छान पैकी जेवणाची तयारी केली, जेवणाचा छान मेनू तयार केला आणि दोघीही मार्केटमध्ये सामान आणायला गेल्या. मार्केटमध्ये दोघी गेल्या म्हणजे या काहीतरी खाऊन येणार हे अभिराजला माहिती होतं. म्हणून तो ही त्यांच्या मागे मागे गेला. दोघींना माहिती नव्हतं की अभिराज मागे आहे. या दोघींनी मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर घरी यायला निघाल्या. अभी त्यांच्या आधी घरी येऊन पोहोचलेला होता.

क्रमशः


🎭 Series Post

View all