Login

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 29

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 29

आधीच्या भागात आपण पाहिले की,
उर्वी अभिज्ञाकडे आलेली होती, अभिज्ञाने तिला सगळं सामान दाखवलं, दोघीही गप्पा मारत बसल्या होत्या. दोघींनी पास्ता खाल्ला आणि कॉफी प्यायला. अभिराजला काहीच दिलं नाही म्हणून तो चिडला. दोघी मार्केटमध्ये गेल्या, अभिराज त्यांच्या मागे मागे गेला. दोघींनी पाणीपुरी खाल्ली आणि आईस्क्रीम खाल्ली आणि त्या यायच्या आधी अभिराज घरी येऊन पोहोचला.


आता पुढे,

दोघीही घरी आल्या, दारावरची बेल वाजवली. अभिराजने दरवाजा उघडला. दोघीही आत जाऊन हातातलं सामान ठेवलं आणि सोफ्यावर बसल्या.

“अभि, मला पाणी देतोस प्लीज?” अभिज्ञा

“का ग तुला एकदम आल्या आल्या पाणी का हवंय?”

“काही नाही रे थकले मी, पायी फिरत होतो ना आणि माझा गळाही कोरडा झालाय, प्लीज पाणी देतोस.”

“हो देतो ना.”

अभिराज आत मध्ये जाऊन पाण्याचे ग्लास घेऊन आला, दोघींच्या हातात पाण्याचे ग्लास दिले.

“थँक्यू थँक्यू सो मच.” अभिज्ञा
“काय मग काय काय खरेदी करून आणलीस? काय मेनू आजचा?”

“मेनू तर मस्त आहे आणि खरेदी छान झाली.”

“अच्छा अजून मार्केटमध्ये काय काय घेतलं.”

“नाही अजून काही नाही.”

“अभिज्ञा मी विचार करत होतो की आज मस्तपैकी आपण पाणीपुरी खायला जाऊया, काय विचार आहे? आवडते ना तुला पाणीपुरी. ते बघ तुझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं. सांग जायचं का?”

“नाही अभि आता मला पाणीपुरी खायची इच्छा नाहीये, ऊर्वी तुलाही नाही आहे ना? उर्वी नाहीये ना तुला पाणीपुरी खायची इच्छा?”

उर्वीने तिच्या हो ला हो करत
“हो हो नाही नाही म्हणजे मलाही नाही पाणीपुरी खायची.” अभिज्ञा

‘आपण घरी छान मेनू बनवतोय ना. घरीच काहीतरी छान बनवते ना मी मग बाहेर कशाला जायचं पाणीपुरी खायला.” उर्वी

“तुम्ही दोघी एवढ्या खोटारडे असाल मला वाटलं नव्हतं.”

“अरे काय खोटं बोललो आम्ही असं काय म्हणतोस.”

“अच्छा तुम्ही दोघी पाणीपुरी खाऊन आलात ना, आईस्क्रीम खाऊन आलात आणि माझ्यापासून लपवत आहात, मला सगळं माहित आहे तुम्ही पाणीपुरी खाल्लीत आणि आईस्क्रीम देखील खाल्ल.”

“नाही अरे आम्ही काहीच खाल्लं नाही, तुला असं का वाटतं. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. तुम्ही दोघी पाणीपुरी खात होतात आणि त्यानंतर तुम्ही आईस्क्रीम खाल्ली.”

“पण तुला कसं कळलं? तू कुठे बघितलेस आम्हाला?”

“तुम्ही दोघी मार्केटमध्ये गेले ना त्यानंतर मी तुमच्या मागे मागे आलो होतो. मला माहिती होतं तुम्ही असंच काहीतरी करणार आणि मला खोटं सांगाल मग मी स्वतः तुमच्या मागे मागे आलो होतो आणि काय दोघी गेल्या ना मग मला सांगायला काय हरकत होती मी आलो असतो ना.”


“सॉरी सॉरी अभि, आमचा पाणीपुरी खाण्याचा काही विचार नव्हता पण इच्छा झाली खायची म्हणून मग खाल्लं.”

अभि त्याच्या रूम मध्ये निघून गेला, दोघींनी जेवण बनवलं. जेवणाचा सुगंध अभिच्या नाकापर्यंत पोहोचला तो लगेच किचनमध्ये आला.

“काय? काय बनवलंय? मस्त सुगंध येतोय. तुमच्या दोघींनी बनवलेल्या पदार्थाचा सुगंध मला इथपर्यंत खेचत घेऊन आलाय. काय स्पेशल बनवले आहे.”

“तुझ्या आवडीचं चिली मंचुरियन आहे, देन फिश करी बनवली आहे आणि पुलाव बनवला आणि नान, ताक, दहीकचुंबर, सॅलेड इतकं बनवलं.”

“तुम्हा दोघींचा इतक्या कमी वेळात इतके सगळे पदार्थ बनवुन झाले.”

“हो बनवले, सुगरण आहोत आम्ही.”

“बघू आता खाल्ल्यानंतर कळेल कोण सुगरण आहे ते.”
तो दोघींना चिडवायला लागला. पदार्थाचा सुगंध बघूनच अभिच्या तोंडाला पाणी सुटलं.

“ये चला यार आता मला राहावत नाही, चला पटापट जेवायला घ्या. तिघेही मस्तपैकी जेवले. तिघांनीही जेवणावर ताव मारला. त्यानंतर टेरेसवर गप्पा मारायला निघून गेले. वरती टेरेसवर उर्वीने खाली चटई टाकली, त्यावर गादी टाकली आणि तिघेही तिथे छान गप्पा मारत बसले.
“आपण पत्ते खेळूया?” उर्वी

“मी घेऊन येतो.”
अभिराज खाली जाऊन पत्त्याचा पॅकेट घेऊन आला, तिघेही खेळले बराच वेळ, खेळल्यानंतर अभिज्ञा बोलली.
“आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया.”

“हो चालेल खरंच.” अभिराज बोलला.

“खरंच खेळूया, मज्जा येईल मस्त.” उर्वी

“ठीक आहे चल उर्वी सुरू कर.” अभिज्ञा
“बैठे बैठे क्या करे
करना है कुछ काम
शुरू करो अंताक्षरी
लेके प्रभू का नाम
अभि तुझ्यावर म शब्द आलाय, म शब्दावर आता तू गाणं म्हण.”उर्वी
“मै निकला वो गड्डी लेके
रस्ते पर वो सडक पे
एक मोड आया के
दिल विच छोड आया
एक मोड आया के
दिल विच छोड आया.”
“अभिज्ञा तुझ्यावर य आलंय चल सुरू कर पटकन.” उर्वी

अभिज्ञाला गाणं काही   आठवेना, गाणं आठवण्याचा प्रयत्न करत होती. तर या दोघांचं सुरू झालं.

टिक टिक वन टिक टिक टू टिक टिक थ्री
“ये तुम्ही थांबा ग मला आठवू द्या एक मिनिट आठवलं.”

तेरी याद आ रही है
तेरी याद आ रही है
याद आने से तेरे जाने से
जान जा रही है
याद आ रही है
तेरी याद आ रही है
अभिज्ञाच्या डोळ्यातून अश्रू निघायला लागले. उर्वीच्या सगळं लक्षात आलं की तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळ्यांनी तिला आधार दिला.
“असू द्या आपण ना गाण्याचे भेंड्या नको खेळूया चला आता बरीच रात्र झाली आपण झोपायला जाऊया.” असं म्हणत उर्वी अभिज्ञाला खाली घेऊन गेली. अभिराज मात्र थोड्यावेळ टेरेसवरच बसून होता.

दोघी खाली आल्या, रूममध्ये गेल्या.

“अभिज्ञा काय झालं का टचकन डोळ्यातून पाणी आलं तुझ्या?”

“तुला माहित आहे ना मग का विचारतेस?”

“अग पण झालं ना आता किती दिवस आणि किती वर्ष? तू विसरू नकोस आता अभि तुझ्यासाठी सर्व काही आहे आणि असं नेहमी नेहमी त्याच्यासमोर डोळ्यातून पाणी काढणार त्याला कसं वाटेल गं, त्याला हेच वाटेल की आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपलं प्रेम कमी पडतंय. हे बघ त्याला असं वाटू देऊ नकोस किंवा त्याच्या मनात अश्या भावना यायला नको. तुला माहितीये ना तो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो.”


“माहित आहे ग मला तो माझ्यावर खूप प्रेम करतो पण तुला माहिती आहे ना आर्यन माझं पहिलं प्रेम आहे.”

“आहे नाही होतं. आर्यन तुझं पहिलं प्रेम होतं आता तुझ्यासाठी सर्व काही अभिराज आहे हे विसरू नकोस. काय नाही करत ग तुझ्यासाठी आणि तरी तू...” उर्वी बोलता बोलता गप्प झाली.

“मी या गोष्टीला नाकारतच नाहीये, पण माझं मन, माझ्या भावना कधी कधी यांच्यावर ताबा नसतो, का माझे आपोआप डोळे भरून येतात डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. मी जाणून बुजून नाही करत ग सगळ आपोआप होतं.”

“मला माहिती आहे तू जाणून असं काहीच करणार आहेस आणि तू कधी असं वागणार नाहीस ज्यामुळे अभिराजला त्रास होईल. फक्त एवढेच सांगेल की सावर स्वतःला आता तुझा प्रेझेंट आणि तुझं फ्युचर दोन्ही अभिराज आहे, हो ना आणि तुझ्या मनातला ज्या कप्प्यात आर्यन आहे ना तो कप्पा नेहमीसाठी बंद करून ठेव.” उर्वीच्या बोलल्यावर अभिज्ञा हसली.

“का ग अशी हसलीस का?”

“हसायला आलं मला, असं कधी होतं का ग मनातल्या कप्प्याला जेव्हा वाटलं तेव्हा कुलूप लावायचा आणि जेव्हा वाटलं तेव्हा खोलायचं असं कधी असतं का?”

अच्छा आता जास्त विचार करू नकोस झोप, मी बाहेर आहे.”

“तू कुठे बाहेर चाललीस तू झोप इथे.”

“अभि आता येईलच.”

“अगं नाही तू इथे झोप अभि बाहेर झोपेल चल ये मी त्याला सांगितलं तो येईल आणि झोपेल. आपण दोघी इथे झोपूया तू दार लावून घे. उर्वीने आतून दाराची कडी लावली.