बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 30

Abhidnya abhiraj love bond


बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 30
आधीच्या भागात आपण पाहिले की,

अभिज्ञा आणि उर्वीने छान जेवणाचा बेत तयार केला होता, दोघींनी मस्त जेवण बनवलं आणि सगळे जेवण करून टेरेसवर बसायला गेले. तिथे गाण्याच्या भेंड्या खेळल्या, काही वेळाने खाली आल्या. अभिज्ञा आणि उर्वीच आर्यन बद्दल बोलणं झालं.
अभिज्ञाने तिला खोलीत झोपायला सांगितलं, उर्वी तयार झाली आणि तिने दाराची कडी आतून लावली.

आता पुढे,

अभिराज खाली सोफ्यावर येऊन झोपला, दुसऱ्या दिवशी सकाळी उर्वी ऑफिसला गेली. अभिराजही त्याच्या कामावर गेला. घरी अभिज्ञा एकटीच होती. अभिज्ञाचे काम संपले आणि ती टीव्ही बघत बसलेली होती.


दारावरची बेल वाजली,

‘आता इतक्यात कोण आलं असेल.’ असं म्हणत तिने दार उघडला. तर दारात रक्षित उभा होता.
रक्षितला बघून अभिज्ञा शॉक झाली,

“तू तू इथे काय करतोस?”

“शेवटी भेटलीस मला, किती दिवसाची वाट बघत होतो मी या दिवसाची? कुठे गेला होता तुम्ही दोघे? किती शोधले मी तुम्हाला?”

“रक्षित तू जा इथनं.”

“जाणारच आहे मी, पण ज्या कामासाठी आलोय ते काम तर करू दे.” असं म्हणत तो दाराच्या आत आला.

सोफ्यावर बसला, समोर टीपायवर पाण्याचा ग्लास ठेवलेला होता, त्यावरची प्लेट उचलून त्याने ते पाणी प्यायल. दोन्ही हात बाजूला करत, एक पाय वरती करून तो आरामात टेकून बसला.

“हे बघ रक्षित, अभिराज घरात नाहीये तू असा इथे आत येऊन बसू शकत नाहीस. तू निघून जा.”

“अग थांब तरी, इतकी काय घाई आहे. जाणारच आहे मी पण थोडा निवांत आणि हो मी आता इथून एकटा  जाणार नाही आहे, तुलाही सोबत घेऊन जाणार आहे.”

“तू काय बोलतोस तुला तरी कळतंय का? भानावर आहेस का तू? हे बघ रक्षित उगाच आमच्या वाटयाला जाऊ नकोस, मी तुझी पोलीस कम्प्लेंट करेन, किती खालच्या दर्जाचा माणूस आहेस रे तू, मी तुला चांगलं समजत होते कारण तू माझ्या आर्यनचा मित्र होतास म्हणून पण आता तू तुझी लायकी दाखवलीस. तू इतक्या खालच्या थरावर जाऊन वागशील असा मी कधीच विचार केला नव्हता, लाज वाटते मला माझा आर्यनचा असाही मित्र होता, तुझ्यासारखा मित्र असल्यापेक्षा नसलेला बरा. तू काय करतोस ना तुझं तुला कळत नाहीये रक्षित.”

त्याचं बोलणं ऐकून रक्षित ताडकन उभा झाला.

“शट युवर माऊथ, तोंड बंद ठेव तुझं, जास्त तोंड चालवायचं नाही माझ्यासमोर. मी काय करतोय मला कळतंय आणि मी काय काय करू शकतो याचा तू स्वप्नात देखील विचार केलेला नसशील.” असं म्हणून तो तिच्या जवळ गेला.
तिचा हात पकडला,

“चल माझ्यासोबत.”

“रक्षित हात सोड माझा, मी तुझ्यासोबत कुठे येणार नाहीये.”

“आज तर तुला माझ्यासोबत यावच लागेल.” असं म्हणत त्याने तिला खेचून नेण्याचा प्रयत्न केला.

“रक्षित हात सोड माझा. हे बघ, मी पोलिसांना फोन करील.”

“कर, तुला पोलिसांना फोन करायचा ना हा घे, घे माझा मोबाईल कर पोलिसांना फोन मी कुणालाही घाबरत नाही. आज तुला माझ्यासोबत यावच लागेल आणि चांगल्या रीतीने आली नाहीस ना तर माझ्याकडे दुसरेही मार्ग आहेत.”

अभिज्ञा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, दोघांची खूप झटापटी झाली. आता अभिज्ञाला अस्वस्थ झालं तिच्या पोटात दुखायला लागलं.

“रक्षित हात सोड माझा मला त्रास होतोय.”

आता अभिज्ञाची ताकद कमी पडत होती काही वेळाने तिला अशक्त व्हायला लागलं आणि तिची संपूर्ण शरीरातली ताकद गेली.

रक्षितने तिला खांद्यावर उचललं आणि बाहेर घेऊन गेला, तिला कारमध्ये बसवलं आणि गाडी तिथून निघून गेली.


अभिराज दुपारी घरी आला, दार उघड बघून त्याला आश्चर्य वाटलं कारण अभिज्ञा सहसा दार उघड ठेवत नव्हती. आज कसा काय सुरू आहे असा विचार करतो तो आत गेला. अभिज्ञाला आवाज देऊ लागला.

“अभिज्ञा..अभिज्ञा..कुठे आहेस तू?” त्याने बरेचदा आवाज दिला पण काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. अभिराजला आता चिंता झाली. किचनमध्ये जाऊन बघितलं, बेडरूम मध्ये जाऊन बघितलं, बालकनीतही गेला पण कुठेच दिसली नव्हती.

कुठे गेली असेल म्हणून विचार करू लागला, टेरेसवर गेली असेल का? एकदा टेरेसवर बघतो, नाही.. पण एवढया दुपारी ती टेरेसवर का जाईल तरीपण बघूनच येतो असा विचार करून तो टेरिसवरही गेला. तिथेही अभिज्ञा दिसली नाही.

“अभिज्ञा कुठे आहेस तू? तो पुन्हा अभिज्ञा अभीज्ञा करू लागला.

“फोनच लावून बघतोय.” त्याने अभिज्ञाच्या मोबाईलवर फोन लावला फोन तिथे सोफ्यावर वाजत होता.

‘अरे मोबाईल इथेच आहे मग ही कुठे गेली. उर्वीला फोन लावून बघतो कदाचित तिच्याकडे तर नसेल गेली.’ त्याने उर्वीला फोन केला, उर्वी ऑफिसमध्ये होती, तिने फोन रिसीव केला.

“हा हॅलो बोला अभिराज.”

“उर्वी अभिज्ञा आहे का तुझ्याकडे?”

“नाही, मी तर ऑफिसमध्ये आहे आणि ती माझ्या घरी एकटीच का जाईल, माझं तिच्याशी बोलणही झालं नाही, तिने मला कॉल केला नाही, का काय झालं?”

“मी आत्ता आलो ना घरी तेव्हा घरी अभिज्ञा घरी नव्हती. मी सगळीकडे शोधलं पण ती कुठेच दिसत नाहीये.

“मला वाटलं तुझ्याकडे आली असेल म्हणून तुला फोन केला होता.” मी ऑफिसमध्येच आहे माझा आणि तिचं काहीच बोलणं झालं नाही.”

“कुठे गेली असेल.”

“अभिराज रिलॅक्स हो, मी आत्ता ऑफिस मधून निघते आहे तू घरीच आहेस ना.”

“हो मी घरीच आहे.”

“मी ऑफिसमधून निघते आणि डायरेक्ट तुझ्याकडे येते” ती ऑफिस मधून निघाली, अभिराज कडे आली अभिराज सोप्यावर डोक्यावर हात ठेवून बसलेला होता.

“कुठे आहे अभिज्ञा? कशी आहे”


“मला नाही माहित मी सगळीकळे शोधल कुठेच दिसत नाहीये.”

“तू तिला फोन केलास का?”

“फोन केला पण फोन इथेच ठेवून गेली आहे.”

“नाही ती असं काही नाही करणार.”

“उर्वी तिच्यासोबत काही घडलं तर नसेल ना? मला काहीच कळत नाही.”

“तू शेजाऱ्यांकडे चौकशी केलीस का?”

“शेजारांकडे चौकशी केली पण कुणालाच काय माहिती नाही. दुपार असल्यामुळे सगळ्यांचे दार लावलेले होते. त्यामुळे इथे कोण आलं कोण गेलं काहीच कळत नाहीये. काय करायचं आता.”

“तू चिंता करू नकोस आपण पोलीस स्टेशनला जाऊया.”

“आधी शोधूया ना एकदम कुठे पोलीस स्टेशनला जायचं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊनही चोवीस तासाच्या नंतरच ते शोध सुरू करतात तोपर्यंत आपण शोध घेऊ.”

“उर्वी अजून तुमच्या कोणी मैत्रिणी आहेत का ग? ज्याच्याकडे ती जाऊ शकते किंवा काही इमर्जन्सी आली असेल का तिला ती दवाखान्यात तर गेली नसेल ना, मी फॅमिली डॉक्टर ला फोन करतो.”

“हो हो कर.”

अभिराजने त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला.

“हॅलो डॉक्टर मी अभिराज बोलतोय.”

“हो हो बोला.”
“अभिज्ञा आली आहे का चेकअप साठी?”

“काय झालं? सगळं ठीक आहे ना?”

“हो हो.” अभिराजने फोन ठेवला

“तिकडेही नाही आहे, कुठे गेली असेल माझी अभिज्ञा?”
“हे बघ काळजी करू नकोस, तू गाडी काढ आपल्याला जिथे जिथे शक्यता वाटते ना तिथे तिथे जाऊ आपण.”

“ओके, मार्केटमध्ये जाऊ तिला जी  जागा आवडते ना त्या त्या ठिकाणी सगळीकडे बघून येऊ.”

अभिराजने गाडी काढली, उर्वी बसली. मार्केटकडे गाडी वळवली. मार्केटमध्ये पोचल्यानंतर तिथे गाडी थांबवून त्यांनी शोधाशोध केली. काही जणांना मोबाईल मधून फोटो दाखवणे, विचारपूस करणे सुरू होतं, पण कुणाकडूनच काहीच माहिती मिळत नव्हती. अभिराज हताश झाला. पण उर्वी त्याला धीर देत होती.
क्रमश:

🎭 Series Post

View all