आधीच्या भागात आपण पाहिले की, उर्वी ऑफिसला गेले, अभिराज बाहेर गेला, घरी अभिज्ञा एकटीच होती, घरी रक्षित आला आणि तिला घेऊन गेला. अभिराज घरी आल्यानंतर त्याने शोधा शोध केली. अभिज्ञा कुठेच दिसली नाही, त्याने उर्वीला फोन केला, उर्वी घरी आली. दोघेही अभिज्ञाला शोधायला बाहेर निघाले. मार्केटमध्ये शोधाशोध केली पण कुठूनच काही माहिती मिळाली नाही.
आता पुढे,
रक्षितची गाडी हायवे वरून सुसाट चालत होती. त्याने अभिज्ञाला सीटवर बसवून तिचे हात बांधून ठेवलेले होते आणि तिच्या तोंडाला पट्टी लावली होती. त्यामुळे अभिज्ञाला हलता येत नव्हतं आणि काही बोलता येत नव्हतं. बरंच अंतर कापून झाल्यानंतर गाडी एका निर्जन ठिकाणी येऊन थांबली. समोर एक घर होतं, आजूबाजूला फक्त शेत होतं.
रक्षितने गाडी थांबवली, तो गाडीतून उतरला. त्याने अभिज्ञालाही गाडीतून खाली उतरवलं. तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तो तिला त्या घराच्या दिशेने घेऊन गेला. अभिज्ञाने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच करता येत नव्हतं. दारापर्यंत पोचल्यानंतर रक्षितने त्या दाराची कडी उघडली.
लाईट सुरु केला आणि अभिज्ञाला आत घेऊन गेला, तिथे खाली एक चटई टाकलेली होती. तिला तिथे बसवलं. बाजूला एक पाण्याचा माठ होता, त्यावर एक ग्लास होता. आजूबाजूला नुसती कणीस ठेवलेली होती. एक छोटी खिडकी होती तिथून थोडा प्रकाश येत होता. बाकी लाईट बंद केला तर त्या खोलीत अंधारच होता. रक्षितने तिला बसवलं आणि तोही तिच्या बाजूला बसला.
“तू चांगल्याने स्व खुशीने आली असतीस ना अभिज्ञा तर मी तुला माझ्या घरी घेऊन घेऊन गेलो असतो पण तू स्वखुशीने आली नाहीस मला तुला इथे पळवून आणावं लागलं आणि पळवून आणलं तर तुला मला माझ्या घरी नेता आलं नाही, तिथे नेलं असतं तर तो तुझा सो कॉल्ड अभिराज तिथे आला असता आणि मला ते नको होतं म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय. आता तुला इथे कोणीही शोधू शकणार नाही. अभिराज पोलिसांकडे जरी गेला ना तरी त्यांना इथचा पत्ता तरी मिळणार नाही, सो तू इथे छान पैकी आरामात रहा. तुझी जेवणाची सोय मी करेल, काही घाबरू नकोस. तुझ्या सेवेसाठी इथे एक बाई पण राहील तुला फक्त आरामात दोन वेळेच जेवण करून आरामात राहायचं. आत मध्ये खोलीत वॉशरूम आहे आणि तिथेच साईडला छोटीशी किचन आहे तुला काहीही त्रास होणार नाही.” असं म्हणत त्याने तिच्या गालाला हात लावला.
अभिज्ञाने मानेने ते झटकलं, अभिज्ञाला आता रडायला येत होतं. तिला कसंही करून अभिराजशी कॉन्टॅक्ट करायचा होता पण तिचा मोबाईल तर घरीच राहिला होता. आता काय करायचं काय नाही याचाच ती विचार करू लागली. याच्याशी जर प्रेमाने वागलं तर याच्या मोबाईलवरून मला कॉल करता येईल पण हा याचा मोबाईल माझ्या हाताला लागू देणार नाही आणि त्याच्यासाठी मला याच्याशी प्रेमाने वागायला हवं ती मनोमन विचार करायला लागली.
तिने रक्षितला इशाऱ्यातून तिचे हात सोडायला सांगितले आणि तोंडावरची पट्टीही काढायला सांगितली. त्याने फक्त तिच्या तोंडावरची पट्टी काढली,
“बोल काय बोलायचे तुला.”
“रक्षित हात सोड ना माझे. माझे हात दुखायला लागलेत. हे बघ असे जर तू माझी मागे हात बांधून ठेवलेस ना तर माझ्या पोटाला त्रास होईल आणि त्यानंतर माझ्या बाळाला त्रास होईल प्लिज माझ्या हात सोडून दे मी रिक्वेस्ट करते तुला प्लिज.” तिने रिक्वेस्ट केली म्हणून रक्षितने तिचे हात सोडले.
इकडे अभिराज अभिज्ञाला शोधण्यासाठी मंदिरात गेला, मार्केटमध्ये गेला. तिच्या काही मैत्रिणींना पण विचारून झालं, पण त्याला अभिज्ञा बद्दल काहीच कळत नव्हतं. तोही आता खूप हताश झाला, काय करू काय नाही विचार करत होता.
अभिराज पोलीस स्टेशनला गेला तिथे अभिज्ञाचा फोटो देऊन कम्प्लेंट लिहिली. पोलिसांनी सांगितलं की चोवीस तास होऊ द्या त्यानंतर आम्ही तपास करू. अभिराज आणि उर्वी दोघेही घरी आले, अभिराज सोफ्यावर बसला डोक्यावर हात ठेवून, तो स्वतःलाच कोसायला लागला.
‘मीच तिला सोडून जायला नको होतं, मी बाहेर गेलो ना म्हणून हे सगळं झालं. मी आज बाहेर गेलो नसतो ना तर हे सगळं घडलंच नसतं. मला तिला एकटीला टाकायला नको होतं. सगळी चूक माझी आहे, माझ्यामुळे आज माझी अभिज्ञा माझ्या जवळ नाही. माझी अभिज्ञा कुठे गेली? कोणी नेलं माझ्या अभिज्ञाला?’ असं बोलताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
उर्वी त्याच्यासाठी पाणी घेऊन आली उर्वीने त्याच्या हातात ग्लास दिला, “हे घर अभिराज पाणी पिऊन घे.” त्याने पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि टीपायवर ठेवला.
“उर्वी, रक्षित तर आला नसेल ना? रक्षितने अभिज्ञाला नेलं असेल. हो रक्षितने आपल्या अभिज्ञाला पळवलं. उर्वी चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया, आपण पोलिसाला सांगूया रक्षितनेच हे सगळं केलं असेल.”
“नाही आधी तू कनिकाला फोन कर.”
“कनिकाला फोन करून काय करणार, काहीच माहित नसेल तिला.”
“अरे पण तो सगळ्या गोष्टी सांगतो ना तिला.”
“गरजेचं नाही आहे की तो तिला हे सांगेलच.”
“तू चल आधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊ.”
दोघे पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये रक्षित बद्दल सगळी माहिती दिली आणि या आधी जे काही घडलं त्याबद्दलही सविस्तर माहिती सांगितली. तिथून निघाल्यानंतर अभिराज डायरेक्ट त्याच्या आईच्या घरी गेला. दार ठोठावला, बराच वेळ दार ठोठावल्यानंतर आईने दार उघडला.
अभिराज तू, ये ना बेटा आत ये.”
“मी बसायला आलो नाहीये, कनिका कुठे आहे?”
“ती तिच्या खोलीत बसली आहे.”
कनिका.. कनिका...बाहेर ये,
अभिराजने तिला दोन-तीनदा आवाज दिला, तेव्हा ती बाहेर आली.
“दादा तू आज इकडे कसा काय? कसा आहेस? अभिज्ञा कशी आहे?”
“अभिज्ञा कुठे आहे?”
“ती तुझ्यासोबत असेल ना,मला कसं माहित राहणार अभिज्ञा कुठे आहे ते, ती तुझ्यासोबत राहते ना “
“हे बघ कनिका अभिज्ञा घरात नाहीये आणि कुठे आहे काहीच कळत नाहीये, तिचा फोन घरीच आहे, सगळीकडे माहिती मिळवली कुठेच तिचा पत्ता लागत नाहीये. मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन आलोय पण तरीही तू मला सांग तुला जर काही माहिती असेल तर मला सांग. तुला माहिती असेल कारण मला डाऊट आहे रक्षितच तिला घेऊन गेला असणार. हे बघ मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवून आलोय आणि तिथे मी रक्षित बद्दल सगळं सांगितले आता तुला जर काही माहिती असेल तर प्लिज तू मला सांग.”
“दादा खरंच मला रक्षितने असं काही नाही सांगितलं रे, पण वन मिनिट मी कॉल करते त्याला, एक मिनिट तुझ्या समोरच करते.”
कनिकाने रक्षितचा नंबर डायल केला,
“हॅलो..”
“हॅलो कसा आहेस? बरेच दिवसापासून आपलं बोलणं झालं नाही.”
“कामात आहे मी.”
“कुठल्या कामात आहेस?”
“हे बघ कनिका तुझ्याशी बोलण्या व्यतिरिक्त मला काम असतात.”
“हो पण रक्षित तू विसरलास का तू जे मला काम दिलेस तेही महत्त्वाचा आहे. हो ना?”
“मग त्याचं काय? तू तर कुठलंच काम करत नाहीस ना माझं.”
“नाही पण आता करणार आहे तुझे काम. तुझी न होणारी प्रेमिका अभिज्ञा तिला.” ती बोलता बोलता थांबली.
“तिचं काय?”
“मी विचार करतीये की दादा नसेल तेव्हा मी तिला तुझ्याकडे घेऊन येईल.”
“हो का, घेऊन ये मग. मी वाट बघतोय.” असं म्हणून रक्षितने फोन ठेवला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा