बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 32

Abhidnya Abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 32


आधीच्या भागात आपण पाहिले की, रक्षित अभिज्ञाला किडनॅप करून घेऊन गेला, अभिराजने सगळीकडे शोधाशोध केली. त्याला कुठेच काही माहिती मिळाली नाही. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तो कनिकाला जाब विचारायला गेला. कनिकाला पण काहीच माहिती नव्हतं. कनिकाने रक्षितला फोन केला त्याला सांगितलं की ती अभिज्ञाला घेऊन तुझ्याकडे येईल. हो ये असं म्हणून रक्षितने फोन ठेवला.

आता पुढे,

“हो घेऊन ये.” असं म्हणून त्याने फोन बंद केला.

“बघितलं दादा त्याच्याकडे नसेल अभिज्ञा नाहीतर त्याने मला काहीतरी सांगितलं असतं.”

“वेडी आहेस तू, रक्षित शातिर दिमागाचा आहे त्याला कळलं असेल की मी तुझ्याकडे आलो म्हणून त्याने तुला काहीच सांगितलं नाही. त्याने नक्की लपवून ठेवल असेल, आपल्याला शोध घ्यायला हवा.”

“दादा मी पण येते तुमच्यासोबत.”
“हो चल.”

तिघेही गाडीत बसले.
गाडी मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबली. ते उतरून गेट पर्यँत गेले आत जाणारच होते तर वॉचमनने अडवलं.
“अरे तुम्ही सगळे अशे डायरेक्ट आत कसे चाललात? कोण आहात तुम्ही?”

“आम्ही रक्षितचे मित्र आहोत.”
“पण साहेब तर घरी नाही आहेत.”
“कुठे गेलाय तो.”
“आम्हाला ते माहीत नसतं.”

“आम्ही आत वाट बघतो” अस म्हणत
ते सरळ रक्षितच्या घरी आत गेले.
रक्षितचा मोठा बंगला होता, खाली मोठा हॉल होता. मधातून वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या. दोन्ही बाजूने मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. सगळे खाली लिविंग रूममध्ये सोफ्यावर जाऊन बसले. आतून नौकर सगळ्यांसाठी पाणी घेऊन आला.

“सर नाही आहेत घरी आणि ते कधी येणार माहित नाहीये.”

“तुम्ही फोन करून कळवा त्यांना सांगा की त्यांचे मित्र आलेत म्हणून.” अभिराजने नौकरला सांगितले.

“ हो साहेब कळवतो.”

नोकराने रक्षितला फोन केला.

“हॅलो साहेब..”

“हा बोल रामू काय झालं?”

“साहेब कोणीतरी तुमचे मित्र आलेत तुम्हाला भेटायला, विचारत आहेत की तुम्ही कधी याल?”

“कोण आहेत मी नाही विचारलं साहेब. मग नाव नाही विचारता आलं का तुला?”

“साहेब दोन माणसं आहेत आणि एक बाई आहे म्हणजे मुलगी सारखीच आहे.”
“सांग त्यांना मी आज घरी येणार नाहीये.”

“हो साहेब ठीक आहे.” असं म्हणून त्याने फोन ठेवला. तो त्या तिघांकडे लिविंगरूम मध्ये गेला.

“साहेब आज येणार नाही आहेत, त्यांनी सांगितले की वाट बघू नका.”

“बघितलं त्याला कळलं की आपण आहोत म्हणून आज येणार नाही असं सांगतोय, पण आपण इथून जायचं नाही.”

“अभिराज असे इथे बसून राहिलेले बरं वाटेल का? चल आपण इथून बाहेर निघू बाहेर. काय ते विचार करूया.”

“हो दादा स्वानंद बरोबर बोलतोय आपण इथून निघूया.”

सगळे बंगल्याच्या बाहेर गेले, गाडीमध्ये बसले.

“एक काम करूया आपण गाडीत बसून त्याची वाट बघूया, तो येणार नाही असं तर नाही. काही नाही काही गडबड असेल. स्वानंद गाडी समोर कर, त्याच्या नजरेत गाडी दिसायला नको. आपण तिथून लक्ष ठेवूया.”

स्वानंदने गाडी थोडी समोर केली आणि ते तिघे गाडीतच बसून राहिले.

“मला नक्की खात्री आहे रक्षितनेच अभिज्ञाला पळवलं असणार, आपल्याकडे आता पुरावा नाही त्यामुळे आपण पोलिसांना सांगू शकत नाही ज्यावेळी पुरावा मिळाला ना त्यावेळी त्याच काही खरं नाही, काही वेळाने एक मोठी कार गेट पर्यंत आली.

“हे बघ नंदया ते बघ गाडी आली नक्की रक्षित आला असेल चल उत्तर पटकन.”

तिघे गाडीतून उतरले, धावत धावत कारपर्यंत गेले. वॉचमन उजव्या साईडला होता हे कारच्या डाव्या बाजूला लपून लपून आत गेले. गाडी आत गेल्यानंतर गाडीतून रक्षित उतरला की त्याच्या कारच्या मागे तिघेही लपून होते. गाडी पलटून पुन्हा गेटमधून बाहेर गेली हे झाडामागे लपून त्याची आत मध्ये जायची वाट बघत होते त्याने जशी डोरबल वाजवली हे तिघे धावत धावत गेले. रामुने दरवाजा उघडला तसा तो आत शिरला आणि त्याच्या मागे मागे हे तिघेही गेले. रामूच्या लक्षात आलं.

“तुम्ही पुन्हा आला तुम्ही पुन्हा का आलात?” तो असं बोलताच रक्षित पलटला.
“व्हॉट हॅपन?” त्याच लक्ष या तिघांकडे गेलं.

“काय करता इथे तुम्ही? मी विचारतोय तुम्ही इथे काय करताय?”

“रक्षित सांग माझी अभिज्ञा कुठे आहे? माझी अभिज्ञा कुठे आहे?” अभिराजने रक्षितची कॉलर पकडली.

“अभिराज कॉलर सोड, लायकीत रहा आणि तू कुणाशी बोलतोय माहिती आहे का तुला?”

“हो माहित आहे तुझ्यासारख्या नीच माणसाशी मला बोलायची अजिबात इच्छा नाही पण आज तुझ्या तावडीत माझी अभिज्ञा आहे म्हणून मी इथपर्यंत आलोय नाहीतर तुझं तोंड बघायची माझी इच्छा नव्हती.”

“माईंड युअर लँग्वेज.” रक्षित ओरडला.

“बऱ्या बोल्याने सांग माझी अभिज्ञा कुठे आहे नाहीतर..”
“नाहीतर, काय करणार आहेस तू?”

“मी पोलिसात कंप्लेंट करून आलोय आणि मी त्यांना तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय, काही वेळाने ते तुझ्याकडे चौकशीसाठी येतील. सांग माझी अभिज्ञा कुठे आहे?”
“हे बघ, तुझ्या अभिज्ञा बद्दल मला काही माहित नाही आणि मी तिला का पळवू? काय संबंध माझा आणि तिचा?”

“काय संबंध? तू असा बोलणार नाहीस पोलीस स्टेशन मध्येच बरोबर बोलशील.” अभिराज त्याच्या अंगावर धावून गेला.

“वॉचमन वॉचमन..” रक्षित घाबरून जोरजोरात आवाज द्यायला लागला.

वॉचमन आला,

“थक्के मारून बाहेर काढ याला, गेट आउट माय हाऊस.”
वॉचमनने अभिराजचा हात पकडला, अभिराजने त्याचा हात झटकला आणि पुन्हा रक्षितकडे धावत आला त्याची कॉलर पकडली,

“हे बघ रक्षित माझी अभिज्ञा जर सापडली नाही, तिचं काही कमी जास्त झालं ना तर याद राख माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल.” तो बोलतच होता तितक्यात वॉचमनने पुन्हा त्याच्या हात पकडला आणि त्याला खेचत खेचत दाराच्या बाहेर नेलं. स्वानंद आणि कनिकाने अभिराजला सांभाळलं आणि त्याला बाहेर घेऊन गेले. तिघेही गाडीत बसले स्वानंदने गाडी सरळ स्वानंदच्या रूमवर नेली, तिथे अभिराजला शांत केलं, अभिराजने इन्स्पेक्टरला फोन केला.

“हॅलो इन्स्पेक्टर साहेब आम्ही रक्षितच्या घरी गेलो होतो, त्याच्या नोकरांनी त्याला फोन केला तेव्हा तो बोलला की आज घरी येणार नाहीये पण तो घरी आला आम्ही लपून त्याच्या घरी आत मध्ये शिरलो पण तो काही बोलायला तयार नाही. साहेब तुम्ही काहीतरी चौकशी करा तो आता तुम्हाला घरीच सापडेल.”

“हो हो आम्ही करतो काहीतरी.” असं म्हणत इन्स्पेक्टरने फोन ठेवला. अभि डोक्यावर हात ठेवून सोफ्यावर बसला. स्वानंद त्याच्या बाजूला बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला.

“अभिराज सगळ ठीक होईल रे, अभिज्ञा बरी असेल, तिला काही होणार नाही.”


अभिज्ञा जवळ एक बाई ठेवलेली होती, अभिज्ञाला पाणी हवं होतं म्हणून तिने त्या बाईला पाणी मागितलं. अभिज्ञाने त्या बाईला विचारलं.

“अहो ताई तुमच्याकडे मोबाईल आहे का?”

“नाही मोबाईल नाही.”

“खर सांगा ना तुमच्याकडे मोबाईल असेल तर प्लिज मला द्या ना, मला एक नंबर लावायचा आहे.”

“माझ्याकडे मोबाईल असता तर दिला असता तुम्हाला आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना, मी तुमची सगळी काळजी घेईन, तुमची खाण्या-पिण्याची पण काळजी घेईल.”

“ताई मला इथे नाही राहायचं मला माझ्या घरी जायचंय.”

“साहेब आता काही तुम्हाला जाऊ देणार नाही.”

“तुम्ही ओळखता का रक्षितला?”

“नाही, मी नाही ओळखत त्यांना. मी पहिल्यांदाच त्यांना बघितलं.”

“मग तरी तुम्ही हे सगळं काम का करता?”

“त्यांनी काम करण्याचे मला पैसे दिलेत आणि म्हणून हे काम करते.”
“पण हे काम चुकीच आहे माहित आहे ना तुम्हाला?”

“हो पण पोटापाण्यासाठी सगळंच करावं लागतं.

क्रमश:









🎭 Series Post

View all