बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 33,
आधीच्या भागात आपण बघितले की,
रक्षित अभिज्ञाला किडनॅप करून घेऊन गेला, त्याने शेतातील एका घरी अभिज्ञाला ठेवलं होतं, अभिराज तिच्या शोधामध्ये बाहेर निघाला. त्याने पोलीस कम्प्लेंट केली, रक्षितच्या घरी जाऊन आला पण काहीच माहिती मिळाली नव्हती. रक्षितने अभिज्ञाला ज्या खोलीत ठेवलं होतं, तिथे अभिज्ञाची काळजी घ्यायला एक बाई ठेवलेली होती. अभिज्ञाने तिला मोबाईल मागितला पण तिच्याकडे नव्हता का करताय तुम्ही काम विचारल्यानंतर ती बोलली पैशासाठी करते.
आता पुढे,
“काय करणार मॅडम पोटापाण्यासाठी अशी काम करावी लागतात, ते मला पैसे देणार आहेत त्याबद्दल मला तुमची काळजी घ्यायची आहे. अजून काही नाही आणि यात तर काही चुकीचं नाही आहे ना?”
“हो पण त्याने मला इथे किडनॅप करून आणले म्हणजे पोलीस केस आहे तुम्हाला कळतंय का? पोलीस तुम्हालाही पकडून नेतील.”
“नाही मॅडम, पोलीस मला कशाला पकडून नेतील, मी तुम्हाला थोडी आणलय? ते तर सरांनी आणलं ना.”
“हे बघा ताई तुम्ही जर माझी मदत केली ना तर मी तुम्हाला परमनंट एक नोकरी देऊ शकते. हे बघा तुम्ही जर मला इथून सोडवलं ना तर मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईल आता माझी डिलिव्हरी होणार आहे ना समोर तर मला एक बाई हवीच होती आणि तुम्ही आतापासून माझ्या घरी काम केलं ना तर मी तुम्हाला महिना महिन्याचा पगारही देईल दोन वेळचे जेवणही देईल आणि तुमची फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी कपडे, खाण्याचं सामान सगळं देईल, पण तुम्ही मला यातून सोडवा ना प्लिज ताई.”
नाही हो मॅडम असं कसं करेल मी त्यांनी मला पैसे दिलेत.”
“हा मग ठीक आहे ना ते तुम्हाला कुठे शोधायला येणार आहेत, दिले तर दिलेत तेवढं काय त्यात मी पण तुम्हाला पैसे देईल ना, आता तर त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे देईल. प्लिज ताई मला इथून सोडवा.”
“मी विचार करते मी एकदम सोडत नाही थांबा एक-दोन दिवस जाऊ द्या.” दोघींचं बोलणं सुरू असताना दार ठोकण्याचा आवाज आला. दोघींच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव निर्माण झाले. “कोण आलं असेल आत्ता.” बराच वेळ दार टकटक झाला पण दरवाजा उघडला नाही, थोड्यावेळाने त्या बाईने हळूच दरवाजा उघडला तर समोर रक्षित होता.
तो पटकन आत आला.
“दरवाजा उघडायला इतका उशीर का झाला?”
“माफ करा साहेब आम्ही घाबरलो होतो आम्हाला वाटलं दुसरच कुणीतरी आलं की काय म्हणून थोडं घाबरलो होतो आणि उशीर झाला दरवाजा उघडायला.”
“ठीक आहे.”
“अभिज्ञा कशी आहेस?” अभिज्ञाकडे बघून तो बोलला.
“तुला काही त्रास तर होत नाहीये ना व्यवस्थित आहे ना.”
त्या बाईकडे बघून बोलत होता.
“हे बघ ह्यांची नीट काळजी घे.”
“हो साहेब मी काळजी घेते आहे.”
“दोन कॉफी बनव प्लिज पटकन.”
“हो साहेब आत्ता आणते.” असं म्हणत बाई किचनमध्ये गेली.
रक्षित अभिज्ञाच्या बाजूला जाऊन बसला, त्याने तिचा हात हातात घेतला, अभिज्ञाने हात झटकण्याचा प्रयत्न केला पण तिच्या लक्षात आलं की आपण याच्याशी गोडच वागलं पाहिजे म्हणून तिने मग तो हात नाही सोडला.
“कशी आहेस अभिज्ञा?” तिने फक्त होकारार्थी मान हलवली. “रक्षित मला इथे नाही राहावस वाटत, बघ ना किती छोटीशी खोली आहे. तुझ्या घरी घेऊन चल ना मला प्लिज.”
“नाही, मी तुला आता घेऊन नाही जाऊ शकत. काही दिवस थांब मी तुला घरीच घेऊन जाणार आहे.”
“पण काही दिवसांनी का आता घेऊन चल ना, माझा इथे जीव घुसमटल्यासारखा होतो, इथे हवा येत नाही, श्वास वाढायला लागतो माझा.”
“अभिज्ञा फक्त काही दिवस, काही दिवस थोडं सहन कर त्यानंतर मी तुला माझ्याकडेच घेऊन जाईल मग तिकडे तू एकदम आयुष्यभर आरामात राणीसारखी राहशील.”
“तुला माहितीये ना मला त्रास झालेला चालेल पण माझ्या बाळाला माझ्या बाळाला त्रास व्हायला नको. अशा कोंदट खोडीत राहणं म्हणजे बाळाला त्रास देणंच होईल, तुला आवडेल का माझ्या बाळाला त्रास झालेला?” असं म्हणून तिने त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं.
“ओके मी बघतो, विचार करतो. एक दोन दिवसात घेऊन जातो तुला. ठीक आहे तोपर्यंत रहा इथे.” त्यांचं बोलणं सुरू असताना तिथे बाईने कॉफी आणली.
दोघेही कॉफी प्यायले, तोवर बाई बाहेर दारात उभी होती. काही वेळाने रक्षित तिथून निघून गेला. ‘त्याचा मोबाईल हातात लागत नाहीये मोबाईल जर मिळाला तर मला अभिशी कॉन्टॅक्ट करता आला असता. काय करावं काय नाही काही कळेना.’ अभिज्ञा तिच्याच विचारात गुंतलेली होती. विचार करता करता ती झोपली. तिला गाढ झोप लागली, बाईने तिच्या अंगावर पांघरून टाकून दिलं आणि ती स्वतःही झोपली.
स्वानंदच्या घरून अभिराज आणि कनिका निघाले, अभिराजने कनिकाला तिच्या घरी सोडलं, तो तिथून निघणार तोच कनिकाने आवाज दिला.
“दादा आत ये ना प्लिज.” तिने रिक्वेस्ट केली म्हणून अभिराज थांबला आणि आत गेला.
“आई आई बघ कोण आलंय? दादा आलाय.”
“काय रे काय झालं पोलीस स्टेशनला गेला होता ना तुम्ही? काय म्हणाले पोलीस?”
“तपास करतो म्हणाले चोवीस तासाच्या आत काही कळलं नाही तरच ते तपासणी सुरुवात करतील.”
“होईल रे सगळ नीट, काळजी करू नकोस.”
“आई मला अभिज्ञाची खूप काळजी वाटते, तिचं काही कमी जास्त झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. कुठे असेल माझी अभिज्ञा? कशी असेल? कशा अवस्थेत असेल? तिने काही खाल्लं असेल की नाही? ती जास्त वेळ उपाशी राहू शकत नाही, भूक लागली असेल तर काय करेल ती? काय खाईल ती? मला खूप काळजी वाटते आहे.”
“बेटा होईल सगळं नीट, देवावर विश्वास ठेव तो सगळं नीट करेल.”
“कनिका पाणी घेऊन ये.”
कनिका आत जाऊन पाणी घेऊन आली.
“अभि पाणी पी बेटा.”
“नाही आई नको मला.”
“अरे पी पाणी बरं वाटेल तुला.” अभिराज पाणी प्यायला.
“कनिका दादासाठी काहीतरी खायला आण.”
कनिका आत गेली, किचन मधून त्याच्यासाठी ताट बनवून आणल.
“दादा जेवून घे थोड.”
“नाही नको मला, तिकडे माझी अभिज्ञा उपाशी असेल तिने काही खाल्लं असेल की नाही ते मला माहित नाही माझ्या घशाखाली खास कसा उतरणार आहे.”
“हे बघ दोन घास खा, तुलाही बरं वाटेल. तुझ्यात ताकतच नाही राहणार तर तू तिचा शोध कसा लावशील हे बघ तुला आता जी काही धावपळ करायची आहे ना त्याच्यासाठी तुझ्या अंगात त्राण असायला हवं आणि त्याच्यासाठी तुला काही तरी थोडंस खावस लागेल.”
“आई नको मला”
“तू ऐकणार नाही असं, थांब मी भरवते तुला.”
अभिराजच्या आईने त्याला घास भरवला, तस त्याच्या डोळ्यातून टपकन पाणी बाहेर आलं.
“काय रे काय झालं?”
“आई हे जर तू त्यावेळी केलं असतं ग तर मी त्यावेळी घराबाहेर पडलोच नसतो, तुमच्या सगळ्यांच्या त्रासामुळे मी त्यावेळी बाहेर पडलो होतो.”
“मला माफ कर पोरा त्यावेळी माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती असं समज पण आता मी भानावर आले, त्यावेळी मी तुझ्याशी आणि अभिज्ञाशी जे काही वागले ते सर्वस्वी चुकीचं होतं हे त्यावेळी मला लक्षात नाही आलं पण आता लक्षात येतय. माझा मुलगा, माझी सून माझी मुलगी कनिका तुम्ही सगळे माझेच आहात, तरी मी तुमच्यासोबत दुर्व्यवहार केला. मला माफ करा पोरांनो मला माफ करा, तिने त्याला जेवण भरवलं, आणि ती आतल्या खोलीत निघून गेली.
क्रमश:

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा