बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 34

Abhidnya Abhiraj Love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 34


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिराज कनिकाला सोडायला गेला, त्याच्या आईने त्याला थांबवलं. त्याला जेवायला सांगितलं, अभिराजला घास भरवला आणि त्याची माफी मागितली, मी तुमच्या दोघांशी खूप वाईट वागले हे त्यावेळी मला नाही कळलं पण आता मला माझी चूक जाणवते मला माफ करा पोरांनो असं म्हणत तिने अभिराजची माफी मागितली आणि उठून आत निघून गेली.

आता पुढे,

अभिराज घरी आला, त्याने दार उघडला घरात एकदम सन्नाटा होता. निरव शांतता पसरली होती. त्याने लाईट ऑन केला, चाबी ठेवली, शूज काढले, खुर्चीवर जाऊन बसला. आज पहिल्यांदा घरी इतकं शांत वाटत होतं. रोज घरी आल्या आल्या अभिज्ञाचा आवाज कानावर पडायचा. तिथे त्याला बसावंस देखील वाटलं नाही. अभिज्ञाच्या आठवणी जागा झाल्या. त्याला तिची खूप आठवण येत होती. त्याचे डोळे पाणावले आणि तो तिथून लगेच उठला, बालकनीत जाऊन बसला. मागेहुन त्याला आवाज आला.

“अभि आलास तू बस तुझ्यासाठी कॉफी आणते, छान दोघेजण मिळून कॉफी बनवूया.” अभिराज लगेच उठून धावत पळत किचनमध्ये गेला. किचनमध्ये अंधार होता, आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो पुन्हा बाल्कनीत जाऊन बसला. बराच वेळ असा शांत बसलेला होता. सगळीकडे शांतता पसरली होती, पक्षांचा तो फक्त आवाज येत होता, थंड वारा सुटलेला होता, रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर वाढला तस अभिराजला अभिज्ञाची ओढ लागली.

तो आत बेडरूममध्ये गेला, रूममध्ये भिंतीवर अभिज्ञाचा मोठा पोस्टर लावलेला होता. तो त्या पोस्टर जवळ गेला, त्या फोटोवरून हात फिरवायला लागला. तिच्या गालावरून हात फिरवले. डोळ्यात डोळे टाकून बघितलं.

“अभिज्ञा कुठे आहेस ग तू, मला तुझी खुप आठवण येत आहे, कशी आहेस ग? आपलं बाळ कस आहे? मला माहितीये तुझ्यासाठी एक एक क्षण किती जड जात असेल. पण मी काहीच करू शकत नाही आहे, अगं मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच माहिती मिळाली नाही, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आहे, अभिज्ञा कुठे आहेस तू?” तो बोलता बोलता त्या फोटोकडे बघतच राहिला.
“बोल ना गं कुठे आहेस तू? कशी आहेस? तुझ्याशिवाय एक क्षण म्हणजे एकेका वर्षा सारखा वाटायला लागलाय, हे क्षणही जात नाहीयेत, खूप एकट वाटतय. घरात आलो ना हे घर घरासारखं नाही वाटलं मला. सगळीकडे शांतता पसरली आहे, सगळीकडे तुझ्या आठवणी आहेत. तुझ्याशिवाय घर मला खायला उठतय. कुठे आहेस तू अभिज्ञा? कुठे शोधू मी तुला? ये ग ये परत आता तुझ्याविना नाही राहवत मला, बघ ना जेव्हा तू एकटी होतीस ना तेव्हा पाऊस तुझ्याच सोबतीला होता, आज मी एकटा आहे ना आज तो माझ्या सोबतीला आलाय. देव तुझा रक्षण करो आणि माझी अभिज्ञा मला लवकर मिळो.” असं म्हणून तो त्या फोटोला बिलगला.


अभिराजने कपाटातून अल्बम काढला, त्या एकेका फोटो वरून हात फिरवत तो भावुक झाला. काय करावं त्याला कळत नव्हतं. एक एका फोटो वरून हात फिरवत वेड्यासारखा आठवणी जागा करत होता. रात्रभर तो तसाच त्या फोटोला घेऊन झोपला.

.........................
इकडे सकाळी अभिज्ञाला जाग आली, तिने डोळे उघडले आजूबाजूला पाहिलं आणि ताडकन उठून बसली. नंतर लक्षात आलं की ती रक्षितच्या तावडीत आहे.

“मॅडम अश्या ताडकन का उठलात? असं ताडकन उठायचं नाही या दिवसात, तुम्हाला त्रास होईल आणि तुमच्या बाळाला त्रास होईल.”

“हो ना तुम्हाला कळते ना? कळते ना तुम्हाला मला त्रास होईल मग सोडा ना मला इथून प्लिज. सोडवा ना मला.”

“मॅडम मी तुम्हाला कालच सांगितलं आजही सांगते एक-दोन दिवस जाऊ द्या आणि मी आहे ना तुमच्या सोबत. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, खरं सांगते. जा तुम्ही फ्रेश व्हा तुम्हाला कॉफी बनवून देते.

‘माझा अभि कसा असेल? माझा अभि कसा असेल? त्याने काही खाल्लं असेल का? तो रात्री झोपला असेल का? आता काय करत असेल? नक्की मला शोधायला बाहेर पडला असेल, कुठे कुठे शोधलं असेल, माझ्यासाठी जीव जळत असेल त्याचा. रक्षितने मला इथे असं आणून ठेवलं त्याला कळलं ना तर तो काय करेल कुणास ठाऊक, पोलीस स्टेशनला गेला असेल का? रक्षितच्या घरी गेला असेल का? मला माहित आहे स्वानंदला घेऊन तो नक्की गेला असेल. हे भगवान त्याला माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचव आणि आमची भेट घडू दे.’ ती मनातल्या मनात बोलू लागली.

“मॅडम फ्रेश होताय ना?” त्या बाईने अभिज्ञाला आवाज दिला आणि ती तिच्या विचारातून बाहेर आली. अभिज्ञा फ्रेश झाली आणि कॉफी प्यायली.

“तुमच्याकडे काही कपडे आहेत का? माझ्याकडे कपडे नाहीयेत.”

“मॅडम चिंता करू नका, साहेब सकाळीच कपडे देऊन गेलेत. तुम्ही झोपला होता म्हणून तुम्हाला उठवलं नाही. हे बघा त्यांनी तुमच्यासाठी ड्रेसेस आणले, गाऊन आणले, हे बघा तुम्हाला जे वाटते ते घाला.”

“बापरे एवढे कपडे.”

“हो साहेब बोलले मॅडमला जे आवडेल ते घालू द्या, उगाच एकच ड्रेस आणून त्यांना आवडल नाही तर म्हणून एवढे ड्रेस आणून ठेवले आणि म्हणाले छान फ्रेश व्हा तुमचा फ्रेश चेहरा बघायला ते थोड्यावेळाने येणार आहेत.”

अभिज्ञाला खूप राग येत होता, पण राग राग करून चालणार नाही तिला माहिती होतं म्हणून ती शांत झाली, फ्रेश झाली आणि रक्षितने आणलेला ड्रेस तिने घातला. बाईने तिच्यासाठी नाश्ता बनवला, ती नाश्ता करत होती तितक्यात रक्षित तिथे आला. बाईने दरवाजा उघडला आणि ती बाहेर उभी राहिली रक्षित आत आला.

“कशी आहेस अभिज्ञा?”

अभिज्ञाने त्याला हसून उत्तर दिलं,

“मी मस्त आहे, छान आहे. नाश्ता घे ना.”

“हो हो मी घेतो तू तोपर्यंत सुरू ठेव तुझा नास्ता.” रक्षित आत जाऊन त्याची प्लेट घेऊन आला. तिच्या बाजूला बसला.

“मी काय म्हणते रक्षित.”

“हा बोल ना.”

“थँक्यू सो मच तू माझ्यासाठी कपडे आणलेस म्हणजे मी सकाळी विचारच करत होती की काय घालायचं तेव्हा बाईने दिले मला हे कपडे सो थँक्यू थँक्यू सो मच.”

“अग त्यात काय एवढं? एवढं मी करू शकतो तुझ्यासाठी.”

“मी काय म्हणते मला ना तुझा फोन हवा होता.”

“फोन? फोन कशाला हवाय तुला?”

“नाही म्हणजे मी विचार करत होते की तू पहिल्यांदा माझ्यासाठी काहीतरी आणलंस म्हणजे ड्रेस आणलास आणि मी तो छान घातलाय तर आपण फोटो काढू शकतो ना, आपण दोघांची सेल्फी काढुया.”

“हो हो काढू, एक मिनिट मीच काढतो थांब.” असं म्हणून रक्षितने मोबाईल काढला आणि दोघांची सेल्फी घेतली आणि पुन्हा खिशात ठेवला.

अभिज्ञाला वाटलं तिच्या हातात जर मोबाईल आला तर ती अभिराजचा नंबर डायल करेल पण असं काही झालं नाही. अभिज्ञा नर्व्हस झाली.

“काय ग काय झालं? फोटो काढायची होती ना तुला? फोटो तर झाली काढून मग आता काय हवं.”

“नाही, काही नाही.” तिने पुन्हा चेहऱ्यावर खोटी स्माईल दिली.

“काही हवय का तुला अजून?”

“नाही नको.” तिने आत मध्ये जाऊन आपली प्लेट ठेवली. तिथे विचार करत राहिली

“काय करू? अभिला कसं कॉन्टॅक्ट करू? त्याला कॉन्टॅक्ट केलं नाही तर त्याला कसं कळेल मी इथे आहे. हे देवा काहीतरी मदत कर माझी. माझी आणि अभिची भेट घडवून दे.” ती मनोमन देवाला प्रार्थना करू लागली.


क्रमश:

🎭 Series Post

View all