बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 35
आधीच्या भागात आपण पाहिले की,
अभिराज अभिज्ञाच्या आठवणीत बेडरूम मध्ये जाऊन बसला. तिच्या फोटोकडे बघून त्याने रात्र काढली. रक्षितने अभिज्ञासाठी ड्रेस आणले होते, त्यातला एक तिने घातला, तिला अभिची खूप काळजी वाटत होती, त्याची आठवण येत होती. त्याच्याशी कसही करून कॉन्टॅक्ट करायचा होता पण तेही करता येत नव्हतं तिने रक्षितला फोन मागितला पण त्याने सेल्फी काढली तिच्या हातात दिलाच नाही. अभिज्ञा अभिराजच्या विचारात गुंतली.
आता पुढे,
“अभिज्ञा येतेस ना बाहेर.” रक्षितने अभिज्ञाला आवाज दिला.
“हो हो आले.” असं म्हणत ती बाहेर आली.
“काय ग काय करत होतीस तिथे?”
“नाही, काही नाही प्लेट ठेवली आणि पाणी प्यायली.”
“काय म्हणते अजून कॉफी घेणार मी बनवतो.”
“नाही नको बाईने मला आत्ताच कॉफी बनवून दिली.”
“तर काय झालं? आता मी बनवलेली घे.”
“नाही कॉफी नको, गरम होते खूप.”
“ठीक आहे मग काय घेणार? तुझ्यासाठी काय बनवायचं?”
“नाही नको, आता मला काही खायची प्यायची इच्छा नाहीये. मला थोडा आराम करायचा आहे. पोटात दुखल्यासारखं होतंय.”
“काय बरी आहेस ना तू.”
“नाही, म्हणजे बरी आहे पण या दिवसात होतं असं आणि एका ठिकाणी स्थिर राहवत नाही, तू जर निघालास तर मी थोडा आराम करू शकेल.”
“असं काय करतेस माझ्यासमोर आराम करू शकत नाहीस का?”
“नाही तसं नव्हतं म्हणायचं मला पण तुलाही ऑफिस असेल ना तुझी काम असतील तू निघाला की मी आराम करते आणि हो जाताना बाईला आत पाठव.”
“ठीक आहे.” मग मी येतो संध्याकाळी असं म्हणत रक्षित उठला आणि तिथून निघून गेला. बाई आत आली.
“काय होतंय मॅडम बरं वाटत नाही का तुम्हाला?”
“माझे पाय चोळून देता का?”
“हो मॅडम थांबा मी तेल आणते.” बाई तेल घेऊन आली आतून आणि तिने अभिज्ञाचे पाय चोळून दिले. थोड्यावेळाने अभिज्ञाला झोप लागली. त्यानंतर दारावरची कडी वाजण्याचा आवाज आला म्हणून बाईने हळूच दार उघडला तर त्या बाई नवरा बाहेर उभा होता.
“अहो तुम्ही.. अहो तुम्ही इकडे का आलात? तुम्हाला कोणी बघितले तर नाही ना? अहो यायच्या आधी मला सांगायला तर हवं होतं.”
“तुला सांगणार कसं तुझ्याकडे मोबाईल आहे का?”
“बोला ना काय काम होतं? हे बघा जे काही काम आहे ना ते लवकर सांगा आणि निघा. नाहीतर कुणी पाहिलं, मग सगळी गडबड होईल साहेबांना कळलं ना की तुम्ही इकडे आलेत तर साहेब खूप रागावतील.”
“मोबाईल द्यायला आलो तुझ्याकडे, मला बोलायचं असलं तर मला बोलता तर येईल.”
असं म्हणून त्याने त्या बाईच्या हातात मोबाईल दिला आणि तो निघून गेला. त्यांच्या आवाजाने अभिज्ञाला जाग आली तिने त्या बाईला हळूच दार लावताना बघितलं आणि विचारलं.
“कोण होतं बाहेर? रक्षित तर आत्ताच गेला ना? कोण आलं होतं?”
“माझा घरवाला होता, मोबाईल द्यायला आला होता. म्हणाला तुझ्याशी मला बोलता येत नाही हा मोबाईल देऊन गेला.”
“काय? खरं सांगता तुम्ही? तुम्हाला मोबाईल देऊन गेलाय तुमचा नवरा.” अभिज्ञाला खूप आनंद झाला.
“हो हा बघा हा बघा आहे ना मोबाईल. तुम्हाला फोन करायचा होता ना मॅडम? घ्या फोन लावा आता.”
“हो.” अभिज्ञाने त्या बाईचा मोबाईल घेतला आणि अभिराजचा नंबर डायल केला. पण त्याचा नंबर लागतच नव्हता. मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता. अभिज्ञाने बरेच प्रयत्न केले पण मोबाईल स्विच ऑफच दाखवत होता.
‘अभि काय झालं कुठे आहेस तू? का तुझा मोबाईल स्विच ऑफ आहे फोन लागत नाहीये अरे संधी मिळाली मला तुला फोन करण्यासाठी कुठे आहेस तू अभि प्लिज फोन सुरू कर तुझा. मला तुझ्याशी बोलायचंय माझं मन आता आतुर झालंय, मन अधीर झालंय तुझ्याशी भेटण्याची ओढ वाढतेय. तुझ्याशिवाय राहवत नाही रे प्लिज फोन सुरू कर तुझा.’ ती स्वतःशीच बोलायला लागली.
“काय झालं मॅडम फोन लागत नाही आहे का?”
“नाही स्विच ऑफ दाखवतोय, पण हे बघा तुम्ही तुमचा मोबाईल सायलेंट वर करून ठेवा जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही फोन करा. रक्षित समोर जर मोबाईलची रिंग वाजली तर उगाच प्रॉब्लेम होईल. थांबा मी करून देते.” असं म्हणत तिने त्या बाईचा मोबाईल सायलेंटवर करून दिला आणि लपवून ठेवून दिला.
“मॅडम तुम्ही थोड्यावेळाने पुन्हा लावून बघा कदाचित फोन लागेल.”
“हो करते मी प्रयत्न पण आता सध्या हा बाहेर ठेवू नको आता असू दे.”
मॅडम एक विचारू का?”
“हा विचार ना.
“साहेबांनी तुम्हाला असं बंद का करून ठेवलं? काय हवय त्यांना तुमच्याकडून?”
“त्याला फक्त मी हवी आहे.”
“म्हणजे. पण तुमचा तर लग्न झालंय ना.”
“हो माझं लग्न झालंय पण तो आधीपासून माझ्यावर प्रेम करायचा. माझं लग्न दुसऱ्याची झालं तेव्हा तो तिथून निघून गेला. पण आता आलाय परत तर त्याला मी हवी आहे खरंतर आता त्याच माझ्यावर प्रेम नाहीये.”
“म्हणजे.?”
“म्हणजे त्याला फक्त मला मिळवायचे प्रेम करत नाही तो माझ्यावर. जाऊ द्या तुम्ही या विषयात पडू नका जा तुम्ही थोड्यावेळ आराम करा.”
…...…...…................
अभिराज सकाळ पर्यंत रूममध्ये तसाच बसून होता, तो उठला नव्हता काही वेळाने त्याला दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला आणि त्या आवाजाने तो उठला, मोबाईल बघितल तर मोबाईल स्विच ऑफ झालेला होता. समोरच्या दाराची बेल वाजत होती म्हणून त्याने दार उघडला तर समोर दूधवाला माणूस होता. त्याने दुधाचा पॅकेट हातात दिला आणि तो निघून गेला. अभिराजाने पुन्हा दार लावला आणि तो पॅकेट किचनमध्ये नेऊन ठेवला आणि पुन्हा रूम मध्ये जाऊन झोपला. काही वेळाने त्याच्या अचानक लक्षात आलं की मोबाईल स्विच ऑफ आहे अभिज्ञाने जर फोन केला असेल तर तो पटकन उठला आणि त्याने मोबाईल चार्जिंग वर लावला. काही वेळाने मोबाईल ऑन करून ठेवला. मोबाईल ऑन केल्यानंतर त्याला मेसेजेस आले अननोन नंबर वरून कॉल येऊन गेले त्याला कळलं आणि त्याने त्या नंबर वर फोन केला, फोनची रिंग जात होती पण कोणी उचलत नव्हतं. बराच वेळ त्याने प्रयत्न केला पण कोणी उचलला नाही मग त्याने सोडून दिलं आणि तो फ्रेश व्हायला गेला फ्रेश होऊन आल्यानंतर त्याने स्वानंदला फोन केला.
“हॅलो..”
“हा बोल अभि मी पोलीस स्टेशनला चाललोय तू येतोस का माझ्यासोबत?”
“हो हो तू तिकडून निघ, मी इकडून येतो झालच आहे माझं, मी तयार झालोच आहे. पोलीस स्टेशनमध्ये तुझ्यासोबत येतो त्यानंतर मी ऑफिसला निघून जाईल.”
“हो ठीक आहे चालेल मी निघतोच आहे निघाल्यानंतर तुला कॉल करतो.”
असं म्हणून त्याने फोन ठेवला. अभिराज तयार झाला आणि पोलीस स्टेशनला जायला निघाला. तिकडून स्वानंदही तयार होऊन पोलीस स्टेशनला जायला निघाला. वाटेत अभिराजने कनिकाला फोन केला.
“हॅलो, कनिका.”
“हा दादा बोल काही फोन वगैरे आला होता तुला रक्षितचा.”
“नाही दादा रक्षितचा फोन आलेला नाही आणि मी त्याला कॉल केला तर तो माझा एकही कॉल उचलत नाहीये.”
“ओके ठीक आहे मी पोलीस स्टेशनला जाऊन येतोय बघतो काही कळलं तर तुला फोन करतो.”
“हो हो ठीक आहे दादा.” दोघांचे बोलणं झालं, त्यानंतर त्याने उर्वीला फोन केला,
“हा अभि बोल”
“उर्वी काही फोन वगैरे आला तुला कुणाचा? काही कळलं का? माहिती मिळाली का?”
“नाही अभि काहीच कळलं नाही.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा