Login

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 36

Abhidnya Abhiraj love bond


बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 36


आधीच्या भागात आपण पाहिले की,

त्या बाईच्या मोबाईल वरून अभिज्ञाने अभिराजला फोन केला पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता. मोबाईल स्विच ऑन केल्यानंतर अभिराजनेही फोन लावले पण कोणी उचलत नव्हतं. त्यानंतर सकाळी फ्रेश होऊन तो पोलीस स्टेशनला गेला. त्याने सगळ्यांना फोन करून विचारलं की काहीतरी माहिती मिळाली का पण कोणालाच काही माहिती मिळालेली नव्हती.

आता पुढे,

अभिराज पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचला, तिथून स्वानंदला फोन केला.
“स्वानंद यार मी पोहोचलो तू कुठे आहेस?”

“मी रस्त्यात आहे पाच मिनिटात पोहोचतोच आहे. तू कनिकाला आणि उर्मिला फोन केलास का ते कुठवर आलेत?”

“नाही, नाही म्हणजे मी त्यांना फोन केला होता पण मी त्यांना इकडे बोलावलं नाही फक्त काय माहिती मिळाली का याच्यासाठीच फोन केला होता, कनिकाला केला आणि उर्वी केला. आपण दोघे आधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊ मग बघू.”

“हो हो तू फोन ठेव येतोच आहे मी, अभि वाट बघत बसला होता, काही वेळाने स्वानंद आला. दोघेही आत गेले.

“नमस्कार साहेब काल आम्ही मिसिंग कम्प्लीट केली त्याची काय माहिती मिळाली का? तुम्हाला एक फोटोही दिला होता काही कळलं का₹”

“नाही आम्ही तपास सुरू केला आहे पण अजून काही माहिती मिळाली नाही. माहिती मिळाली की आम्ही तुम्हाला सांगू. तुम्ही एक काम करा तिथे मोबाईल नंबर लिहून ठेवा काही कळलं की आम्ही फोन करतो तुम्हाला.”

“साहेब.. साहेब लवकर तपास करा ह माझी बायको प्रेग्नेंट आहे तिला काही त्रास होता कामा नये ज्यांनी कोणी पळवून नेलं त्यांनी जर तिला त्रास दिला तर मी माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला दोघांनी गमावून बसेल, मला त्या दोघांना गमवायचं नाहीये. साहेब मदत करा, साहेब मदत करा. अभिराज रडवेला चेहऱ्याने पोलीस इन्स्पेक्टर समोर विनवण्या करत होता.”

“अभिराज शांत हो.” स्वानंदने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला.

“हे बघा आम्ही आमचे प्रयत्न करतोच आहोत काही कळलं तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू, तुम्ही आता जाऊ शकता.”

अभिराज आणि स्वानंद तिथून उठून बाहेर आले, बाहेर त्याने अभिराजला बाकावर बसवलं.

“अभि सांभाळ स्वतःला. होईल, सगळं नीट होईल. अभिज्ञा नक्की मिळेल तू काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल.”


“यार नंद्या काहीच बरोबर होणार नाहीये, माझी अभिज्ञा कुठे असेल? काय करत असेल?” तो बोलता बोलता थांबला.त्याच्या लक्षात आलं की,
“एक मिनिट काल आपण इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला होता रक्षितच्या घरी जाण्यासाठी त्याचा काय झालं? चल आपण आता विचारू.”

ते दोघे पुन्हा आत गेले,

“इन्स्पेक्टर साहेब काल तुम्ही त्या माणसाच्या घरी गेला होतात ना, काल आम्ही तुम्हाला फोन केला होता.”
“हो गेलो होतो आम्ही त्या घरी.”

“मग काय झालं?”

“नाही पण तिथे आम्हाला फारशी काही माहिती मिळाली नाही. आम्ही आज पुन्हा तिथे जाणार आहोत चौकशीसाठी. बघू काही माहिती मिळते का? मिळाली की आम्ही तुम्हाला कळवू.”

दोघे पुन्हा बाहेर येऊन बसले,

“काय चाललय स्वानंद माझ्या आयुष्यात? आता कुठे सुखाचे दिवस आले होते आणि हे असं काय काय होतंय कुणास ठाऊक? इन्स्पेक्टर रक्षितला का पकडत नाहीये मी सांगितलं ना त्यांना त्यानेच केलं असेल तरी.”

“हो अभि पण काही पुराव्याशिवाय ते त्याच्यावर आरोप कसा काय करू शकतात, आधी त्यांना पुरावे गोळा करावे लागतील.”

“मला काही कळतच नाहीये.”

दोघेही हताश होऊन तिथुन निघाले, स्वानंद ऑफिसला गेला आणि अभि पुन्हा घरी आला.

घरात आल्या आल्या त्याला असं निरव शांतता वाटत होती. घर खायला उठल्यासारख वाटत होतं.

…........................
“मॅडम बघा मोबाईल वर इतके मिस कॉल दिसत आहेत या नंबर वरून,) मॅडम तुमच्या यांचा फोन असेल बघा बघा.” बाईने अभिज्ञाच्या हातात फोन दिला. अभिज्ञाने बघितलं अभिराजचे मिस कॉल होते, तिने लगेच नंबर डायल केला. अभिराज मोबाईल टीपायवर ठेवून सोफ्यावर बसला होता. मोबाईल वाजला पण त्याच्या लक्षात आल नव्हतं. अभिज्ञाने वारंवार त्याला फोन केले, अभिराजच्या लक्षात आलं त्याने फोन रिसीव केला.

“हॅलो..”

“हॅलो अभि.”
तिचा आवाज ऐकताच
“अभिज्ञा अभिज्ञा कुठे आहेस तू? कशी आहेस?”

“हे बघ अभि मी बरी आहे, मी एका निर्जन ठिकाणी आहे पण मला कुठलाही त्रास नाहीये, माझ्या देखरेखीसाठी एक बाई ठेवलेली आहे. मी बाकी डिटेल्स तुला नंतर पाठवते आता इतकं सांगते की मी बरी आहे तू जास्त माझी काळजी करू नकोस आणि पोलीस कम्प्लेंट वगैरे केली असशील ना तर ते जाऊ दे मी तुला इथचा पत्ता पाठवते पण आत्ता नाही उद्या वगैरे पाठवेल.” असं म्हणून अभिज्ञाने फोन ठेवला.

“हॅलो हॅलो अभिज्ञा अभिज्ञा.”

आता अभिज्ञाने त्या बाईचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि पुन्हा तिच्याजवळ लपवून ठेवण्यासाठी दिला. अभिराजने लगेच नंद्याला फोन केला,

“हॅलो नंद्या.”

“हा अभि बोल.”

“अभिज्ञाचा फोन आला होता.”

“काय अभिज्ञाचा?”

“हो.”

“काय म्हणाली?”

“ती एका निर्जन ठिकाणी आहे पण ती ठीक आहे म्हणजे तिला खूप काही त्रास नाही आणि तिच्या देखरेखी साठी एक बाई ठेवलेली आहे म्हणे ती तिथल लोकेशन आपल्याला उद्या पाठवणार आहे, ती म्हणाली पोलीस कम्प्लेंट केली असेल तर आता जाऊ नका मी ऍड्रेस पाठवते पण ती सुखरूप आहे एवढे सांगून तिने फोन ठेवला. नंद्या आता मी सांगू शकत नाहीये मला किती बरं वाटतंय. नंद्या आय एम सो हॅपी, अभिज्ञा बरी आहे आता फक्त मी उद्याची वाट बघतोय. ती उद्या ऍड्रेस पाठवेल ना आपण त्या ड्रेसवर जाऊ आणि तिला घेऊन येऊ.”

“हो नक्की ठीक आहे मी ठेवतो आपण बोलू नंतर.”

“हो ठीक आहे.”

अभिने त्या दोघींनाही आनंदाची बातमी सांगितली. आता अभिला बरं वाटायला लागलं. तो छान फ्रेश झाला शॉवर मध्ये मनसोक्त आंघोळ केली आणि तयार होऊन कॉफी बनवली, कॉफी प्यायला आणि बाहेर कामानिमित्त निघून गेला.

“मॅडम काय बोलले साहेब.”

“माझा आवाज ऐकून त्याला खूप आनंद झाला आता तो थोडा रिलॅक्स झाला असेल, मला माहिती आहे त्याने खूप धावपळ केली असेल, खूप काळजी करत होता तो. आता माझा आवाज ऐकला ना त्याची काळजी थोडी कमी होईल, आणि एक दोन दिवस झाले की मी इथचा पत्ता सांगते त्यानंतर तो मला इथे घ्यायला येईल.”

“पण मॅडम जे काही कराल ते सावधगिरीने करा साहेबांचं डोकं खूप चालतं.”

“हो गं माहितीये मला आणि मी काय म्हणते तुम्हाला माहिती आहे का हा पत्ता.”

“नाही मला नाही माहित पण माझ्या नवऱ्याला माहिती आहे मी त्यांना विचारेल आणि मग तुम्हाला सांगेन मॅडम मग तुम्ही फोन करा तुमच्या साहेबांना एकदा का तुम्ही तुमच्या साहेबांपर्यंत पोहोचलात ना की माझी पण काळजी मिटेल.”

“पण मी इथून गेल्यानंतर तुमचं काय? रक्षित तर तुम्हाला ओरडेल ना.”

“ओरडू द्या, साहेबांना मी सांगेन की तुम्ही पळून गेलात. पण मॅडम त्यांचा आवाज ऐकल्या बरोबर तुमचा चेहरा फुलला बघा, तुमच्या चेहऱ्यावर तेज आलंय, अगदी आनंद झळकत आहे तुमच्या चेहऱ्यावर.”

“हो गं खरंच आहे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की मला किती आनंद झालाय आणि मला माहिती आहे इतकाच आनंद किंवा याहीपेक्षा जास्त आनंद अभिला झाला असेल.

“खूप प्रेम आहे ना मॅडम तुमचं तुमच्या साहेबांवर?”

अभीज्ञाने लाजून होकारार्थी मान हलवली.

क्रमश:

🎭 Series Post

View all