बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 37

Abhidnya abhiraj love bond


बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 37

आधीच्या भागात आपण पाहिले की, अभिज्ञाने त्या बाईच्या मोबाईल वरून अभिराजला फोन केला, त्याच्याशी बोलली. त्याला सांगितलं की मी बरी आहे काळजी करू नकोस मी लवकरच पत्ता तुला पाठवते. एकमेकांशी बोलून दोघांनाही खूप आनंद झाला. अभिराजने लगेच सगळ्यांना फोन करून सांगितलं. स्वानंद, उर्वी आणि कनिकाला तिघांनाही ऐकून बरं वाटलं, आता वाट होती ती अभिज्ञाच्या येण्याची.

आता पुढे,

रक्षित त्याच्या खोलीत बसलेला होता. त्याच्या मोबाईलवर अभिराजचा फोन आला नंबर पाहिल्यावर देखील त्याचा फोन रिसीव केला.

“हॅलो..”

“हॅलो तुला काय वाटलं मी माझ्या बायकोला शोधू शकणार नाही, चुकीचा विचार करत होतास तू. मी माझ्या बायकोला शोधले देखील आणि माझ्याजवळ आणलं देखील आता बघ मी काय करतो. तुला काय वाटलं मी घाबरत आहे मी असा सोडून देईल माझी बायकोला. नाही, माझं प्रेम खर आहे म्हणून माझं प्रेम जिंकलं आणि तू हरलास. रक्षित तू हरलास.” असं म्हणत अभि जोरजोरात हसायला लागला. खूप राग येत होता त्याने रागाच्या भरात मोबाईल फेकून दिला.

‘हा काय बोलत होता? हा सगळा काय प्रकार आहे? खरंच अभिज्ञा पळुन तर गेली नसेल ना? नाही नाही अशी कशी पळून जाईल ती. असं होऊ शकत नाही.’ त्याने मनातल्या मनात विचार केला आणि तो घराच्या बाहेर निघाला.

त्याने गाडी काढली आणि थेट तो शेतातल्या घरावर गेला. जाता बरोबर त्याने दाराची कडी वाजवली. दोघीही झोपल्या होत्या, बाईने दार उघडला.

“काय झालं साहेब? या वेळेवर तुम्ही इथे?”

रक्षितने त्या बाईला बाजूला ढकललं आणि आत गेला, बघितलं तर अभिज्ञा झोपलेली होती. तो हळूच तिच्या बाजूला जाऊन बसला तिच्या केसावरून हात फिरवला. अभिज्ञा दचकून उठली आणि उठून बसली.
“तू इथे यावेळी.”

“काही नाही तुझी काळजी वाटली म्हणून बघायला आलो. बरी आहेस ना तू?”

“हो मी बरी आहे मला काय झालं?”

“नाही, काही नाही मी सहजच आलो होतो. तुमचं दोघींचं ठीक चाललंय ना?”

“हो पण तू वारंवार असं का विचारतोस? अरे आम्ही दोघी ठीक आहोत आणि बाई आहे माझ्याजवळ म्हणून मला काही काळजी नाही आहे. टीव काळजी घेतात माझी, पण तू असा अस्वस्थ का वाटतोस?”

“नाही, काही नाही मला काळजी वाटत होती ना म्हणूनच मी आलो बघायला, तू आहेस की नाही बरी म्हणून.”

“हो का, ठीक आहे मग तू गेलास तरी चालेल.”

“नाही मी आज विचार करत होतो की मी आज रात्री इथेच थांबतो.”

“का तू इथे थांबून काय करणार आहेस आणि इतक्या छोट्या जागेची तुला सवय नसेल ना. तुझा एवढा मोठा बंगला, त्या तेवढया मोठ्या मोठ्या खोल्या तू इथे असा एवढया अडचणीत का राहतोयस?”

“तुझ्या काळजीपोटी.”


“पण बाई आहे ना इथे आणि आम्ही काय कुठे जाणार थोडेच आहोत, इथेच आहोत.” असं म्हणून ती हसली.

रक्षित विचार करत करत बाहेर गेला, बाहेर थोडावेळ थांबला. ‘अभिराजने मला फोन करून असं का सांगितलं काय चाललंय त्याच्या डोक्यात? काय प्लान करतोय तो? नक्कीच काहीतरी शिजत आहे जे मला कळत नाहीये. त्याच्यावर वॉच ठेवावाच लागेल, स्वानंदला नाहीतर कनिकाला हाताशी धराव लागेल. स्वानंद काही कामाचा नाही कनिकाला हाताशी धरूनच काहीतरी करावे लागेल. आता मी तिचा फोन उचलला नाही ती ही माझा फोन उचलणार नाही, तिच्याशी मला प्रेमानेच वागाव लागेल. काय या बायांची किटकिट असते, सगळ्यांशी प्रेमाने बोला प्रेमाने वागा तरच नरमतात काय डोक्याला ताप आहे.’ असं म्हणून तू पुन्हा आत गेला.


थोडावेळ आत मध्ये जाऊन बसला, बाईला कॉफी बनवायला सांगितली दोघेही कॉफी प्यायले. त्यानंतर रक्षित तिथून निघून गेला. काही वेळाने घरी पोहोचल्यानंतर त्याने अभिराजला फोन केला.

“बोल रक्षित, काय मग धक्का बसला ना तुला? हा तर पहिला धक्का आहे यानंतर तुला असे धक्के धक्के खावे लागणार आहेत.”

“हे बघ अभिराज..” तो समोर काही बोलणार अभिराज बोलला.

“थांब थांब रक्षित माझा अजून बोलून व्हायचंय. तुला काय वाटलं तू काही लपून करशील आणि आम्हाला काहीच कळणार नाही. तु काय काय करतोयस ना ते सगळं मला कळतंय मी फक्त संधीची वाट बघतोय, एक संधी मिळाली ना की माझी अभिज्ञा बाहेर असेल आणि तू लॉकअप मध्ये असशील. एवढी गोष्ट डोक्यात फिट करून ठेव आणि हो मला कमकुवत समजू नकोस आणि हो मी एकटा नाही आहे माझ्यासोबत माझे मित्र, माझी फॅमिली आहे. त्याच्यामुळे असा विचार करू नकोस की अभिराज एकटाच आहे तो काहीच करू शकत नाही. जर तू असा विचार करत असेल तर तू चुकीचा विचार करतोस.”

“अभिराज तू तुझ्या लायकीत रहा.”

“मी तर माझ्या लायकीतच आहे पण आता तुझी लायकी कळणार आहे, ठेव फोन.” असं म्हणून अभिराजने फोन ठेवला.

अभिराज अभिज्ञाच्या फोनची वाट बघत होता, त्याने त्या नंबर वर फोन लावला पण कोणी उचलला नाही.

‘अभिज्ञा फोन कर ग फोन कर प्लिज, मी तुझ्या फोनची वाट बघतोय. एक मिनिट नंद्याला फोन करतो.’

“हॅलो नंद्या.”
“हा बोल अभि, अभिज्ञाचा फोन अजून आलेला नाहीये, मी काय विचार करतो आपण पोलिसांना तो नंबर देऊया, पोलीस स्ट्रेस करतील आणि ते लोकेशन आपल्याला सांगतील मग आपण डायरेक्ट पोलिसांना घेऊन त्या लोकेशन वर जाऊया.”
“चालेल तसं करूयात.”

“अरे पण एक प्रॉब्लेम आहे.”

“काय?”
“मोबाईल स्विच ऑफ आहे, जोपर्यंत मोबाईल ऑन होणार नाही तोपर्यंत आपल्याला तेथील लोकेशन कळणार नाही.”

“ठीक आहे ना मोबाईल कधी ना कधी सुरू होईलच पण आता तर आपण जाऊन नंबर देऊ शकतो ना. तू ये मी इकडून निघतो.”

दोघे पोलीस स्टेशनला गेले, तिथे अभिज्ञाने या या नंबर वरून फोन केला होता म्हणून सांगितले आणि त्यांना तो नंबर दिला.

“ठीक आहे आम्ही स्ट्रेस करतो नंबर आणि तुम्हाला कळवतो. आता आपल्याला लवकरच अभिज्ञा सापडेल, काळजी करू नका.”

दोघेही घरी आले.
......................
“मॅडम साहेबांचा फोन येऊन गेला, करता फोन?”

“नाही नाही आता नको, तुम्ही मोबाईल सुरू करू नका. स्वीच ऑफ करून ठेवा. रक्षितला संशय आला बहुतेक, त्याला जर कळलं ना आपण असं काही करतोय तर तो आपल्याला जिवेनिशी मारायला मागेपुढे बघणार नाही. आपल्याला सावध राहावं लागेल आता. हा मोबाईल तुम्ही काढूच नका, कारण रक्षित इकडे कधीही येऊ शकतो, पाहिलंत ना आज कसा आला होता.”

“हो बघितले मी मॅडम.”
“म्हणून सांगते आपल्याला सावध राहावं लागेल आता, यानंतर एक एक पाऊल सावधगिरीने टाकावा लागेल. तसं मी अभिराजला फोन केला तो काही नाही काही नक्कीच करेल. आता आपल्याला काळजी करण्यासारखा नाहीये. अभिराज यातून आपली सुटका नक्की करेल एवढा विश्वास आहे मला.”

‘अभि तुला माझी आठवण येते ना मला पण तुझी आठवण येत आहे पण आता आपली लवकरच भेट होईल मला विश्वास आहे तू नक्की येशील मला न्यायला.’ अभिज्ञाने तिच्या पोटाला हात लावला.
“बाळा आता काळजी करू नकोस बाबा आपल्याला लवकरच न्यायला येईल, इथून घेऊन जाईल आपल्याला. मग तुझ्या आईला त्रास नाही आणि तुलाही त्रास नाही.” तिला बाळाची हालचाल जाणवली. “अरे वा बाळाला सगळं कळलं वाटतं.” असं मला तिने पोटावरून हात फिरवला.

क्रमश:

🎭 Series Post

View all