बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 38

Abhidnya abhiraj love bond


बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 38

आधीच्या भागात आपण पाहिले की,

अभिराजने रक्षितला फोन केला आणि त्याला सांगितलं की मला सगळं कळलं मी लवकरच काय ते करायचं करेल. रक्षित घाबरला तो लगेच अभिज्ञाकडे गेला. अभिज्ञाला त्या ठिकाणी बघून त्याच्या जीवात जीव आला. अभिज्ञा आणि त्या बाईच बोलणं झालं की आता आपल्याला सावध राहावं लागेल रक्षितला बहुतेक संशय आला, आता या समोर आपण सावध राहूया.
आता पुढे,

दुसऱ्या दिवशी सकाळी रक्षित आला.

“रक्षित अगदी सकाळी सकाळी आलास?”

“हो ग तुझ्या हाताने बनवलेली कॉफी प्यावी म्हणत होतो म्हणून मी इकडे आलोय. आज घरी काय कॉफी प्यायलो नाही आहे मी, तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे माझ्यासाठी कॉफी बनवशील प्लिज?”

“हो बनवते ना.” अभिज्ञाने कॉफी बनवली. तोवर त्याने बाईला सगळं सामान पॅक करायला सांगितलं. अभिज्ञा आतून कॉफीचे मग घेऊन आली, तेव्हा बाई सामान भरताना दिसली.

“रक्षित हे सगळं काय चाललंय?”
“बाई तुम्ही सामान का भरताय?” ती बाईकडे बघून बोलली.

“आपल्याला इथून जायचंय.”

“कुठे.”

“सांगतो मी, माझ्याकडे एक सरप्राईज आहे. चल ये कॉफी घेऊया त्यानंतर आपण बोलू.”

“अरे पण मला सांग ना काय सरप्राईज आहे तुझ्याकडे.”

“माझ्याकडे तुझ्यासाठी स्पेशल सरप्राईज आहे. सो आधी आपण छान पैकी कॉफी पिऊया आणि मग यावर डिस्कस करूया.” अभिज्ञाची काळजी वाढली तिला टेन्शन आलं ‘आता काय करणार रक्षित काय करणार असेल मी तर अभिराजला येथील पत्ता देणार होते. हा मला कुठे घेऊन जाणार आहे. हे देवा भगवंता आता काय होईल.’ ती तिच्याच विचारात गुंतली.


“काय झालं अभिज्ञा? कॉफी पितेच ना.”

“हो हो.”

“अग मग घे ना थंड होईल ती.”
हो हो घेते.” ती तिच्या विचारातच असताना तिने कॉफी प्यायली. बाईला सगळं सामान पॅक करायला सांगितलं बाईने सामान पॅक केलं. त्यानंतर दोघीही रेडी झाल्या. त्याने दोघींना आपल्या गाडीत बसवलं आणि तिघेही तिथून निघाले.
“रक्षित आपण कुठे चाललोत.”

“अभिज्ञा तू फक्त शांत बस, तुझ्यासाठी सरप्राईज आहे ना ते दाखवायला चाललो.”

अभिज्ञाला खूप टेन्शन आलं होतं.
“अभिज्ञा तू टेन्शन का घेतेस?”

“नाही नाही मी टेन्शन का घेऊ? मी तर तुझ्यासोबत आहे ना, सो मला टेन्शन नाहीच आहे.”

“अग पण ते चेहऱ्यावर दिसते तुझ्या. काय टेन्शन घेत नाही.”
“नाही खरच मी टेन्शनमध्ये नाहीये.” अभिज्ञा खोटी स्माईल दाखवत होती. पण खरच तिला आतून खूप टेन्शन आलेलं होतं. गाडी भरधाव सुटत होती, बराच अंतर कापून झाला होता.

“रक्षित आपण बऱ्याच लांब आलो ना? आपण कुठे चाललोय नक्की? एक तास झाला अजून पर्यंत आपण आपल्या ठिकाणी पोचलेलो नाही आहोत का? अजून किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला.”

“थांब आता जास्त वेळ नाहीये थोड्याच वेळात आपण पोहोचू.”

अर्धा एक तासाने गाडी एका मोठ्या फार्म हाऊस समोर येऊन थांबली. आजूबाजूला एकही घरी नव्हती फक्त तो एक मोठा फार्म हाऊस होता आणि बाकी सगळीकडे रिकामी जागा होती. रक्षित गाडीतून उतरला, अभिनय उतरली आणि मागोमाग ती बाई पण उतरली. बाईने सगळ्या बॅग काढून घेतल्या.

“रक्षित आपण कुठे आलो आहोत?”

“हे माझं फार्म हाऊस आहे, छान आहे ना.”

अभिज्ञाने सगळीकडे नजर फिरवली.

“हो छान आहे पण आपण इथे का आलोत?”

“कारण आपल्याला इथेच राहायचं आता, आपण तिघे इथेच राहणार आहोत.”

“काय इथे पण का?” आपण इथे का आलोत नाही म्हणजे मी तिथे व्यवस्थित होते ना, आरामात होते मी. तिथे मला काहीच त्रास नव्हता मग आपण इकडे का आलोत?”


“काळजी करू नकोस ग, तू त्या दिवशी म्हणालीस ना मला, तिथे तुला कोंदट वाटतंय, तुला श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय. आता ह्या हवेशीर फार्म हाऊस मध्ये तुला कुठलाही त्रास होणार नाही.”

“पण रक्षित इथे आजूबाजूला तर काहीच नाहीये म्हणजे काही सामान लागलं तर कुठून आणायचं. बघ ना सगळीकडे शांतताच आहे, सुनसान जागा आहे.”

“काहीही बाहेरून आणायची गरज पडणार नाही तुला, आपला शेफ आहे ना तो सगळं सामान भरून ठेवतो बाहेरून काही तुला आणावं लागणार नाही सगळं सामान अगदी रेडी आहे. तू इथे फक्त आरामात राहा. चल आत चल आता इथूनच बोलणार आहेस का.” असं म्हणत रक्षितने अभिज्ञाचा हात पकडला.

त्याचा स्पर्श तिला किळसवाणा वाटत होता, तिला वाटलं स्वतःचा हात सोडवून घ्यावा आणि इथून धावत धावत निघावं पण ते शक्य नव्हतं म्हणून ती गप्प राहिली. तिला त्याचा स्पर्श नकोसा होत होता. अभिज्ञाला आता खरच रडायला येत होतं, तिचे डोळे पाणावले पण ती आता काहीही करू शकत नव्हती. ती त्याच्याबरोबर आत गेली.
आतही खूप मोठी जागा होती. हवेशीर खोल्या होत्या, गार्डन होतं. मागच्या भागाला स्विमिंग पूल होतं. छान फुलांची बाग होती. सगळं छान होते तिथे पण अभिज्ञाला तिथे नव्हतं राहायचं पण सांगायचं कसं म्हणून ती गप्प होती.


“अभिज्ञा तू थकून आलीस ना आता काय खायचे तुला सांग मी शेफला सांगतो. तो पटापट तुझ्यासाठी काहीतरी बनवून देईल.”

“नाही नको मला आता काही खायची इच्छा नाही.”


“अग असं कसं सकाळच्या कॉफी वर आहेस तू आणि अशा याच्यात उपाशी राहणं बरं नाहीये. तुला भूक लागली नसेल पण बाळाला तर लागली असेल ना सांग लवकर काय खाणार की डायरेक्ट जेवणच करणार आहेस? मी शेफला विचारून येतो जेवण तयार असेल तर मग तू जेवणच करून घे.” अस म्हणत रक्षित आत मध्ये गेला. ही मात्र तिथेच स्तब्ध उभी राहिली. रक्षितला आत मध्ये जाता बघून बाई पटकन अभिज्ञा जवळ आली.

“मॅडम आता काय करायचं सर तर आपल्याला खूप लांब घेऊन आले, आता इतक्या लांब आपल्याला कोण शोधायला येईल.”

“सगळेजण इथपर्यंत पण येतील काळजी करू नका. आपण इथून जर फोन लावला ना तरी ते इथे येतील. आपण तसं डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन लावू शकतो, बघूया.”

रक्षित येताना दिसला आणि दोघी पटकन दूर झाल्या.

“तू फ्रेश हो पटकन जेवण तयार आहे तू जेवण करून आराम कर.”

“हो ठीक आहे. असं म्हणत ती व्ह्यायला गेली, फ्रेश होऊन बाहेर आली. तोवर जेवणाचं ताट वाढलेलं होतं. अभिज्ञाने आणि रक्षितने दोघांनी जेवण केलं. बाई किचनमध्ये जाऊन जेवण करून बाहेर आली. अभिज्ञाच्या रूममध्ये गेली, मागे रक्षितही गेला.
“रक्षित तू इथे काय करतोस? नाही म्हणजे मला आराम करायचा आहे तर तू तुझ्या खोलीत गेलास तरी चालेल.”

“अग नाही मी याच खोलीत राहणार आहे. का काही प्रॉब्लेम आहे का? मी याच खोलीत राहणार आहे. तसही आता काही दिवसानंतर आपण सोबतच राहणार आहोत ना. सो आता राहिले तरी काही प्रॉब्लेम नाहीये.”
“रक्षित असं काय करतोयस मला आराम करायचा आहे ना प्लिज बाहेर जातोस.”

“ठीक आहे मी आता थोड्या वेळासाठी बाहेर हॉलमध्ये बसतो पण त्यानंतर नाही.”

“ओके.” वेळ टळावी म्हणून अभिज्ञाने त्याच्या हो ला हो केलं. रक्षित रूमच्या बाहेर गेला तसा अभीज्ञाने दार लावला. आता अभिज्ञा खूप घाबरली तिला खूप रडायला येत होतं आणि आता तिला स्वतःला सावरता आलं नाही. स्वतःला ती आवरू शकली नाही आणि ती ढसाढसा रडायला लागली.


क्रमश:

🎭 Series Post

View all