बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 39

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 39

आधीच्या भागात आपण पाहिले की,

रक्षित अभिज्ञाला आणि त्या बाईला घेऊन दूरवर त्याच्या फार्म हाऊस वर घेऊन गेला. ते शहरापासून खूप लांब होतं. फार्म हाऊसच्या आजूबाजूला काहीच नव्हतं. सगळी सुनसान जागा होती. फ्रेश होऊन अभिज्ञा रूममध्ये निघून गेली.

अभिज्ञाला आता खूप रडायला येत होतं आणि ती ढसाढसा रडली.

आता पुढे,

अभिज्ञा खूप रडली. ती रडत असताना तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि तिच्या कानात आवाज आला.

“अभिज्ञा असं रडायचं नसतं. अशा अवस्थेत अशी रडणार आहेस का तू? बाळाला त्रास होईल माहिती आहे ना तुला, बाळाला त्रास द्यायचा आहे का? हे बघ असं बाळाला त्रास द्यायचा नाहीये. बाळ कट्टी घेईल तुझ्यासोबत.” अभिज्ञा लगेच पलटली. बघितलं तर आजूबाजूला कोणीच नव्हतं.


‘अभि ये रे मला न्यायला, आता मला सगळीकडे तूच दिसतोयस आणि तुझाच आवाज येतोय. आताही मला तुझाच भास झाला असं वाटलं तू माझ्या अवतीभवती उभा आहेस. माझ्याशी बोलतोयस आता तरी मला न्यायला ये लवकर.’ ती तिच्याच विचारात गुंतली असताना तिथे बाई आली.

“मॅडम आत येऊ का?”

“हो हो, या ना.”

“मॅडम तुमच्यासाठी शरबत आणलय.” तिने शरबतचा ग्लास ठेवला.

“मॅडम काय झालं?”

“काय करू काही कळत नाही आहे, रक्षित इतक्या लांब घेऊन आलाय. इथून आता फोनही करणे जमणार नाही. इथला ऍड्रेस कसा देणार? इथला लोकेशन कसं सांगू? फोन कसा करू? रक्षित इथेच राहणार आहे तो कुठेही जाणार नाहीये. तो चोवीस तास आपल्यावर नजर ठेवून असेल. आता तुम्हीच सांगा काय करायचं आपण.”

“मी माझ्या नवऱ्याला फोन लावून बघते. माझ्या नवऱ्याची काही मदत होईल तर.”

“नाही नाही आता तुम्ही काही करू नका आता रक्षित आपल्यावर नजर ठेवून आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना रक्षीतला संशयाला ते खरच आहे. आता आपल्याला सावध राहायला हव. आता तुम्ही मोबाईल बाहेर काढू नका आणि काढायचा असेल तर लपून कुठेतरी बाहेर जाऊन करा. रक्षित समोर नाही. ज्या रक्षित रूममध्ये राहील ना त्यावेळी करा आता तुम्ही बाहेर जा.”
त्या बोलत असताना तिथे रक्षित येताना दिसला.

“मॅडम तुम्ही शरबत पिऊन घ्या.”

“हो हो मी सरबत पिते, तुम्ही जा, निघा. बाई बाहेर जातच होती तितक्यात रक्षित आत आला.

“काय बोलणं चाललं होतं दोघींचं?”

“काही नाही साहेब मॅडम साठी शरबत आणलं होतं, तेच द्यायला आले होते.”

“ठीक आहे निघा मग तुम्ही.”

“हो साहेब.” बाई रूमच्या बाहेर गेली.

रक्षित अभिज्ञाच्या बाजूला जाऊन बसला.

“काय ग चेहरा का असा दिसतोय? आणि डोळे का असे झाले तुझे?”

“मला बरं वाटत नाहीये.”

“का काय झालं? काय बरं वाटत नाहीये.”

“माहिती नाही अशक्तपणा वाटतोय. अभिज्ञा तू स्वतःची काळजी घेत नाही आहेस का? अग असा अशक्तपणा नकोय, तुला स्ट्रॉंग असायला हवं, स्ट्रॉंग आई बनायचं तुला. तू अशी अशक्त राहशील तर बाळाची काळजी कशी घेशील तू. ते काही नाही उद्यापासून तुला जे जे हवंय ते ते दोन दोन तासाने तू खायचं. मी फ्रुट आणून देतो, सकाळी दूध प्यायचं.”
रक्षित बोलत होता, अभिज्ञा मात्र काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचे डोळे पाण्याने भरून आलेले होते. रक्षित बोलला आणि बोलता बोलता त्याचं लक्ष अभिज्ञाकडे गेलं, त्याने बघितलं की अभिज्ञाचे डोळे पाण्याने भरलेत.

“काय झालं अभिज्ञा? मी काही चुकीचं बोलतोय का?”

तिने फक्त नकारार्थी मान हलवली.
“मग काय झालं तू रडतेस का?” अभिनयाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते तिला खूप आणि खूप जास्त रडायला आलं, ती ढसाढसा रडली.

“का? का करतोस रक्षित असं? काय मिळतंय तुला हे सगळं करून? तू का त्रास देतोस आम्हाला? आमच्या दोघांची ताटातूट करून तुला काय मिळाल, तू आनंदी राहू शकणार आहेस आणि मी तुझ्याजवळ येऊ शकणार आहे हे कधीच शक्य नाहीये. मी तुझी कधीच होऊ शकणार नाही. तुला का कळत नाहीये. आमच्या दोघांची ताटातून करून तू खूप मोठी चूक करतोयस. माझं फक्त अभिराजवर प्रेम आहे आणि अभिराज माझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये रक्षित मग का मला त्रास देतोयस? का मला मिळवण्याचा प्रयत्न करतोस? तू माझ्यावर खरच प्रेम करतोस की फक्त तुला मला मिळवायचे. काय तुझ्या मनात सांग. आज सगळं बोलच तू. काय आहे तुझ्या मनात? कंटाळले मी या सगळ्या गोष्टीला मी कंटाळले, त्रासले. छान आयुष्य चाललं होतं माझं तू आलास आमच्या आयुष्यात आणि सगळं विस्कटलं. आमच्या संसाराची घडी विस्कटली. फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळे. का आलास तू परत? गेला होतास ना सोडून मग का आलास परत. आमच्या आयुष्याची नासाडी करायला का आलास? माझा आर्यन गेला तेव्हा माझ आयुष्य विखरल होत, ते अभिराजने सावरलं. अभिराजने माझं आयुष्य सावरलं. आता कुठे सुखाचे दिवस आले होते त्यात तू दुःखाचे विर्जन का घालतोस? का? का करतोस तु हे सगळं? कंटाळा आला मला या सगळ्याचा. तुला काय वाटतं तू मला इथे किडनॅप करून माझ्यासोबत वेळ घालवशील आणि मला आपलस करशील, असं कधीच होऊ शकणार नाही असा विचारही मनात आणू नको. मी फक्त अभिची आहे आणि अभिचीच असेल तुला काय वाटलं तू तिथून मला इथे घेऊन आलास म्हणून अभिराज मला शोधू शकणार नाही. तो मला नक्की शोधेल तो पोलिसांना घेऊन येईल ना तेव्हा पोलीस तुलाही पकडून घेऊन जातील तुला काय वाटलं तुझ्यापर्यंत कोणीच पोहोचणार नाही. पोहोचतील तुझ्यापर्यंत माझा अभिराज नक्की पोहोचेल. आणि पोलीसही पोहचतील.” अभिज्ञा बोलण्या बोलण्यात सगळं काही बोलून गेली आणि पुन्हा ढसाढसा रडायला लागली. रडता रडता त्याच्या खांद्यावर तिचं डोकं टेकल, काही क्षणात तिच्या लक्षात आलं की तिने किती मोठी चूक केली आहे.

रक्षितने तिचं डोकं सरळ केलं आणि तो तिथून निघून गेला.

क्रमशः


🎭 Series Post

View all