Login

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 40

Abhidnya abhiraj love bond
बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 40
आधीच्या भागात आपण पाहिले की,

रक्षित अभिज्ञाला घेऊन फार्म हाऊस वर गेला, अभिज्ञा फोन करून शेतावरच्या घराचा पत्ता देणार होती. पण आता फार्म हाऊसवर आल्यानंतर काय करायचं ती विचार करत होती. तिला रक्षितचा खूप राग आला आणि रागामध्ये ती रक्षितला सगळं काही बोलून गेली. आणि नंतर तिच्या चूक लक्षात आली. रक्षित चिडून बाहेर गेला.

आता पुढे,

रक्षितला बाहेर जाताना बघून ती बाई आत आली.

“मॅडम तुम्ही असं काय बोललात? साहेब असे बाहेर का गेलेत? खूप चिडले दिसलेत साहेब. काय बोलला तुम्ही?”

“जे बोलायला नको होतं तेच बोलले. आता सगळी गडबड होणार आता अभिराज माझ्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही.”

“मॅडम असा का विचार करताय? मी टीव्ही मध्ये बघितले ना ज्यांचे एकमेकांवर प्रेम राहत ना त्यांना कुणीच वेगळं करू शकत नाही.”

.............................

पोलीस, अभिराज, स्वानंद शेतावरच्या घरावर गेले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कोणीच दिसलं नाही.

“इथे तर कुणीच नाही आहे.” इन्स्पेक्टर

“पण लास्ट लोकेशन इथचाच होता सर.” हवालदार पाटील पोलीस इन्स्पेक्टरला बोलला.

“नक्की नक्की ते इथून पळून गेले, त्यांना काहीतरी माहित झाले असेल काहीतरी सुगावा लागला असेल म्हणून ते इथून पळाले.” अभिराज

“म्हणजे किडनॅपर शातीर आहे आपल्यालाही त्याला सावधगिरीनेच पकडाव लागेल, ट्रॅप रचावा लागेल. पाटील त्या नंबर वर फोन लावून बघा अजून.” इन्स्पेक्टरने त्या पाटीलला सांगितलं.

“हो साहेब लावतो.”

पाटीलने त्याचा मोबाईल वरून नंबर डायल केला, नंबर स्विच ऑफ दाखवत होता.

“साहेब मोबाईल स्विच ऑफ दाखवतोय.”

“होईल कधीतरी सुरू करतील मोबाईल, पण आपल्याला वाट बघावी लागेल.”

“मिस्टर अभिराज आता आपल्याला काहीच करता येणार नाही. फक्त मोबाईल सुरू होण्याची वाट बघावी लागेल, एकदा का तो मोबाईल सुरू झाला तर आपल्याला तेथील लोकेशन मिळेल, मग आपण आरामात तिथंपर्यंत पोहोचू शकू.”
त्या सगळ्यांचं बोलणं सुरू असताना तिथे एक माणूस आला.
तो तिथे आला आणि इकडे तिकडे भिरभिर भिरभिर बघायला लागला, पोलिसांनी त्याला विचारलं.

“काय रे कोण आहेस तू इथे काय करतोस?”

“नाही साहेब काही नाही, मी तर असा चाललो होतो.”

“ए खरं खरं सांग कशाला आला होतास इथे?”

“नाही साहेब खरंच काही नाही.”

“सांगतोयस की दंडे लावू.” पाटीलने त्याला दम दिला.

“सांगतो साहेब सांगतो इथे माझी बायको होती, मी माझ्या बायकोला मोबाईल आणून दिला होता. तिचा मोबाईल लागत नव्हता म्हणून इथे बघायला आलो होतो. पण इथे तर कोणीच दिसत नाहीये.”

“तुझी बायको कोण तुझी बायको?”

“साहेब इथे ना एक मॅडम होत्या त्या मॅडम सोबत माझी बायको होती, एका साहेबांनी माझ्या बायकोला त्या मॅडमची काळजी घ्यायला ठेवलं होतं. माझं आणि तिचं बोलणं होत नव्हतं म्हणून मी माझ्या बायकोला मोबाईल दिला होता. पण आता तो मोबाईल लागतच नाही आहे बंद दाखवतोय म्हणून मी इकडे माझ्या बायकोला भेटायला आलो होतो तर इथे तर कोणीच नाहीये.”

“तू ओळखतोस काय मॅडमला?”

“नाही साहेब.”

“आणि त्या सरांना.”

“नाही साहेब मी तर त्यांना बघितल पण नाही आहे, मी रात्री लपून छपून आलो होतो फक्त एकदा. त्यावेळी कोणीच नव्हतं इथे पण साहेब हे सगळे कुठे गेले?”

“त्याचाचं शोध घ्यायला आम्ही आलोय, बघूया जोपर्यंत मोबाईल सुरू होणार नाही आपल्याला काहीच कळणार नाही. मला वाटते अभिराज तुमच्या मिसेसने यांनी दिलेल्या मोबाईल वरून फोन केला असावा आणि भीती पोटी आता त्यांनी तो मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला.”

“सर तुम्ही रक्षितचा मोबाईल नंबरवर लक्ष ठेवा त्याचा मोबाईल स्ट्रेस करा. तो आता अभिज्ञाच्या जवळच असेल आपल्याला काहीतरी माहिती नक्की मिळेल.”

अभिराजने रक्षितचा नंबर दिला, त्यांनी त्या नंबर वर कॉल केला, मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता.

“मोबाईल बंद दाखवतोय.”

“काय मोबाईल बंद ठेवला नक्कीच त्यांनी वेगळं काहीतरी प्लॅन केलं असेल.”

…..….....................

“मॅडम तुमच्यासाठी जेवण आणलंय.”

“रक्षित कुठे आहे?”

“साहेब तर नाही आहेत, कुठे गेले काय सांगून गेले नाहीत. कुणालाच काय माहित नाहीये. तुम्ही जेवून घ्या मॅडम सरांना कळलं तर ते रागावतील.”

“तुम्ही पूर्ण घर बघितलं खरंच रक्षित नाहीये.”

“नाही शेफने सांगितले की सर बाहेर गेलेत आणि रात्रीपर्यंत येणार आहेत.”

“तुम्ही खरं सांगताय?”

“हो मॅडम, मी खरं सांगते.”

“इथे ताट ठेवा मी एक मिनिटात आले.”

“मॅडम कुठे चाललात?”

“एका मिनिटात आली.”

अभिज्ञा किचनमध्ये गेली, शेफ त्याचं काम करत होता.

“दादा तुमच्याकडे मोबाईल आहे का हो?”

“आहे ना मॅडम.”

“प्लिज मला तुमचा मोबाईल द्या ना, मला एका नंबर वर फोन करायचा आहे प्लिज.”

“नाही मॅडम मी असं नाही करू शकत, मी तुम्हाला मोबाईल नाही देऊ शकत.”

“असं काय करता दादा प्लिज माझी मदत करा ना.”

“केली असती पण खरंच माझा नाईलाज आहे मी जर तुम्हाला मोबाईल दिला तर सर मला कामावरून काढून टाकतील आणि सध्या मला पैशाची गरज आहे. मी खरच तुमची मदत नाही करू शकत. इच्छा असून सुद्धा मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही मी खरंच सांगतो.”

अभिज्ञाने शेफला खूप रिक्वेस्ट केली, खूप विनवण्या केल्या पण तो तयार झाला नाही. त्याने मोबाईल नाही दिला.

अभिज्ञा गार्डनमध्ये झुल्यावर जाऊन बसली. तिथे माळीकाका झाडांना पाणी देत होते.

“नमस्ते काका कसे आहात?”

“छान बेटा.”

“तुम्ही झाडे खूप सुंदर लावली किती छान गार्डन ठेवलेत ना तुम्ही, तुम्ही रोज झाडांना पाणी घालता?”

“हो म्हणून तर झाडे आणि फुले टवटवीत दिसतात.”

“अगदी तुमच्यासारखे हो ना काका.”

“काय ग पोरी.” असं म्हणून काका हसले.

“काका तुमच्याकडे फोन आहे का?”

“आमच्याजवळ कुठून फोन? आम्ही गरीब माणसं आम्हाला एक दोन वेळचे खायचे वांदे असतात फोन कुठून ठेवणार आम्ही?” तुम्हाला फोन हवा होता?”

“हो काका मला फोन लावायचा होता.”

“माझ्याकडे फोन नाही आहे नाहीतर दिला असता मी तुला. तु जा तो आपला स्वयंपाक वाला आहे ना त्याच्याकडे फोन आहे मला लावायचा असला की मी त्यालाच मागतो तो देतो मला फोन लावून. जा बेटा तुलाही देईल.”

“मी गेले होते त्यांच्याकडे पण नाही दिला त्यांनी.”

“का?”

“साहेबांना घाबरतात ना म्हणून. साहेबांनी त्यांना ताकीद देऊन ठेवली आहे मोबाईल द्यायचा नाही.”

“अरे बापरे मग तर कठीण आहे.”

“काका मला कसही करून एका नंबर वर फोन लावायचा आहे.”

“पण का मॅडम तुम्हाला असं कोणाला फोन लावायचा आहे, तुमच्याकडे मोबाईल नाही तर तुम्ही साहेबांच्या मोबाईलवरून लावा.”

“त्यांच्या मोबाईल वरून नाही लावू शकत, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे.”

“काय हो मॅडम नवऱ्याच्या मोबाईल वरून फोन लावायला काय होतंय.”

“काका तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी त्यांची पत्नी नाहीये.”

“काय तुमचं साहेबांशी लग्न झालेले नाही, माफ करा मला वाटले तुम्ही साहेबांकडच्या मॅडम असाल पण तुम्ही साहेबांच्या कोण?”

“खरं तर कोणीच नाही, तुमच्या साहेबांनी मला इथे पळवून आणलं.”

“काय सांगता मॅडम.”

“तुमच्या साहेबांनी मला पळवून आणलं आणि मला माझ्या नवऱ्याला फोन करायचा आहे त्याला इथचा पत्ता द्यायचा आहे म्हणून मी सगळ्यांना मोबाईल मागत होते पण कोणीच मोबाईल देत नाहीये. माझ्यासोबत जी बाई आली आहे ना तिच्याजवळ मोबाईल आहे पण तो बंद झाला आणि चार्जरही नाहीये चार्जिंगला लावायला, तुमच्या साहेबांना दिसेल म्हणून तो मोबाईल बाहेर काढला नाही.

क्रमश:

🎭 Series Post

View all