आधीच्या भागात आपण पाहिले की,
अभिज्ञा रक्षित जवळ सगळ बोलली, रक्षितला राग आला आणि तो तिथून निघून गेला. अभिज्ञाने शेफला मोबाईल मागितला पण त्याच्याकडे असून सुद्धा तो देऊ शकला नाही. माळी काकाला मागितला पण माळीकाका जवळ मोबाइल नव्हताच. अभिज्ञाने माळी काकाला सगळं खरं खरं सांगितलं.
आता पुढे,
उर्वी ऑफिसमध्ये गेलेली होती, उर्वीला भेटायला अभिज्ञाचे मावशी आणि काका आले.
तिच्या डेस्क जवळ गेले आणि तिच्याशी बोलायला लागले,
“उर्वी..”
“मावशी तुम्ही इकडे.” त्यांना बघून उर्वीला खूप आश्चर्य वाटलं.
“आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, बाहेर येतेस का?”
“तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे.”
“अग थोडं महत्त्वाचं आहे.”
“मावशी एक मिनिट मी ही फाईल आत सरांना देऊन येते आणि तुमच्या सोबत बाहेर येते, तुम्ही थांबा इथे एक मिनिट मी आलेच.”
उर्वीने त्यांना थांबायला सांगितलं आणि ती आतमध्ये फाईल द्यायला गेली, फाईल देऊन आली आणि त्यांच्याकडे बघून
“या ना आपण बोलू इकडे.” असं म्हणून त्यांना बाहेर घेऊन गेली.
“बोला, काय झालं मावशी?”
“काय झालं काय विचारतेस? तुला तर सगळं माहीत आहे, आता आम्हाला खरं खर सांग.”
“मावशी तुम्ही काय बोलताय? जरा स्पष्ट सांगा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते.”
“अभिज्ञा कुठे आहे? ती त्या मुलासोबत नाही आहे ना? कुठे आहे ती? कुणी पळवून नेलंय तिला? मला ना त्या मुलावर डाऊट होताच. त्यानेच काही केलं असेल आणि आता चांगलं बनण्याचा प्रयत्न करत असेल.” मावशी
“मावशी, तुम्ही जरा शांत व्हा. अभिराजने काहीही केलेलं नाही आहे, तिला कुणीतरी कीडनॅप केलंय. अभिराजने पोलीस कम्प्लेंट केलेली आहे, पोलीस तपास करत आहेत. लवकरच अभिज्ञा आपल्या सगळ्यांच्या सोबत असेल. पण मावशी तुम्हाला सगळं कसं कळलं?”
“कसं कळलं हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही हे महत्त्वाचं आहे.”
“मावशी असं तर कधी तुम्ही तिची विचारपूस करत नाही आज अचानक तिची विचारपूस करायला कसे काय आलात?”
“ए अभिज्ञाची चमची तुला काय करायचं? आम्ही तिचे नातेवाईक आहोत.”
“हो हे तुम्हाला कामाच्या वेळेसच आठवतं जेव्हा तिला गरज असते तेव्हा आठवण येत नाही तुम्हाला तिची. तसंही ती आहे नाही आहे तुम्हाला त्याच्याशी काय लेन देन आज तुम्ही तिची विचारपूस कसे काय करायला आलात? त्याचाच मला विचार येतोय, बरं असो मला काम आहे मी जाते.” असं म्हणून उर्वी आतमध्ये तिच्या केबिनमध्ये गेली.
मावशी आणि काका त्यांच्या घरी परत गेले.
........................
अभिज्ञाला मोबाईल मिळाला नाही म्हणून ती तिच्या खोलीत जाऊन बसली, ती उदास बसलेली होती. तेवढ्यात दारावर कुणीतरी नॉक केलं, अभिज्ञाने बघितलं तर शेफ उभा होता, त्याच्या हातात ट्रे होता.
“आत येऊ का मॅडम?”
“हो या ना.” शेफ आत आला. त्याने टीपायवर ट्रे ठेवला.
“मॅडम मी तुम्हाला मोबाईल देऊ शकत नाही पण मी तुमची एक मदत करू शकतो.”
“काय काय मदत करू शकता तुम्ही माझी.”
“मगाशी माळी काकाशी बोलत होतात ना तेव्हा तुम्ही बोललात ना की तुमच्याकडे मोबाईल आहे पण तो स्विच ऑफ झाला आहे आणि तुमच्याकडे चार्जर नाहीये तर मी तुम्हाला चार्जर देऊ शकतो. साहेब घरी नाही येत तोवर तुम्ही मोबाईल चार्जिंग करून घ्या आणि मला चार्जर परत देऊ शकता.”
“खरंच असं होऊ शकतं?”
“हो मॅडम मी लगेच जातो आणि चार्जर घेऊन येतो.”
“हो हो घेऊन या.”
शेफ गेला आणि काही वेळाने तो चार्जर घेऊन आला.
“हा घ्या मॅडम चार्जेर.”
“थँक्यू थँक्यू सो मच, तुम्ही बाहेर जा आणि बाईला आत पाठवा.”
“हो मॅडम पाठवतो.” अभिज्ञाने त्या बाईला आज बोलवलं.
“मॅडम आत येऊ का?”
“हो या लवकर या आणि हो तुमचा मोबाईल द्या आपण चार्जिंग वर लावूया. दादांनी चार्जर दिलाय. काढा पटकन.”
“हो मॅडम आता काढते.”
बाईने मोबाईल बाहेर काढला, चार्जिंग वर लावला. काही वेळाने थोडी चार्जिंग झाल्यामुळे मोबाईल सुरू झाला त्यानंतर थोड्यावेळातच रक्षित गाडी पार्क करताना दिसला म्हणून अभिज्ञाने पटकन मोबाईल स्विच ऑफ केला आणि चार्जर बाईच्या हाताने शेफ कडे पाठवला. त्यांच हे सगळं होत आलं असताना रक्षित खोलीत आला, त्याच्याकडे बघून अभिज्ञा थोडी घाबरली. तो खोलीत आला, हातातला मोबाईल पलंगावर टाकला. गळ्यातली टाय ढिली केली, त्यानंतर कोट काढला हे सगळं करत असताना त्याची तिरकस नजर अभिज्ञावरच होती. त्याच्या डोळ्यात अभिज्ञाला खूप राग दिसत होता, तिनेही थोडी नजरा नजर करून नजर झुकवली. त्याने शर्टाच्या बटना उघडल्या आणि तो शर्ट काढणार तितक्यात अभिज्ञा ओरडली.
“रक्षित थांब.”
तसा रक्षित वळला,
“काय झालं?”
“तुला लाज वाटत नाहीये का एका परक्या स्त्री समोर तू कपडे काढतोयस.”
“अभिज्ञा तू परकी नाहीयेस माझ्यासाठी आणि मी फक्त शर्ट काढतोय पूर्ण कपडे काढलेले नाहीयेत.” त्याच्या बोलण्यावर अभीज्ञाला काही सुचलं नाही ती खोलीतून बाहेर गेली. रक्षितने चेंज केलं तो फ्रेश झाला आणि हॉलमध्ये जाऊन बसला, अभिज्ञा बाहेर गार्डन मध्ये झुल्यावर बसलेली होती. रक्षित थोडा वेळ हॉलमध्ये बसून तो ही बाहेर निघाला त्याने इकडे तिकडे बघितलं तर त्याला अभिज्ञा झुल्यावर बसलेली दिसली, तोही झुल्या जवळ गेला. तिच्या बाजूला जाऊन बसला. अभिज्ञाला आता रक्षीतची खूप भीती वाटायला लागली होती, त्याच्या डोळ्यातील तिला रागच दिसत होता. रक्षितने अभिज्ञाचा हातात हात घेतला आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली,
“हे बघ अभिज्ञा तू जर माझ्याबरोबर आलीस ना, तू माझ्याशी लग्न केलंस ना तर मी तुला खूप आनंदात ठेवेल. अग राणी सारखी राहशील, तुला कुठल्याच गोष्टीची काहीच कमी नसणार आहे. तुला घर कामे करावा लागणार नाही. पैशाची टंचाई असणार नाही. हे बाळ या बाळाला ऐशोआरामाचं जीवन मिळेल त्याचंही भविष्य सुधरेल, थोडा शांत डोक्याने विचार कर. प्रेम सर्व काही नसतं जीवन जगण्यासाठी पैसाही लागतो प्रेमाने फक्त मन भरतं पोट भरू शकत नाही. पैशाचं काम पैसाच करतो तू जर चांगल्या मनाने तयार झालीस तर ठीकच आहे नाहीतर मी मला ज्या गोष्टी हव्या असतात त्या मी मिळवतोच कधीही कुठेही आणि कशाही त्यामुळे पुढील दोन महिने तू माझ्याजवळच असणार आहे. आता तुला माझ्याजवळ चांगल्या पद्धतीने यायचा आहे की वाईट पद्धतीने यायचं हे तू तुझं ठरव. पण एक गोष्ट डोक्यात फिट कर दोन ते तीन महिन्याच्या नंतर तू माझ्याजवळ असणार आहेस माझी पत्नी म्हणून माझी जीवनसंगिनी म्हणून आता या दोन-तीन महिन्यात काय काय घडतं वेट अँड वॉच.” इतकं बोलून रक्षित तिथून निघून गेला. त्याच्या बोलण्यात जो काही कॉन्फिडन्स होता जो काही पावर होता त्यावरून आता अभिज्ञाला खरंच भीती वाटायला लागली आता रक्षित आपल्याला सोडणार नाही याची तिला भीती वाटायला लागली, तिला कसंही करून अभिराजशी कॉन्टॅक्ट करायचा होता. झोपाळ्यावर बसल्यानंतर ती आत गेली, सगळ्यांचे जेवण झाले सगळे आपल्या खोलीत गेले, अभिज्ञाने विचार केला होता की रात्री कुणीच नसेल तेव्हा अभिराजशी कोन्टॅक्ट करायचा पण जेवण झाल्यानंतर रक्षित सरळ तिच्या खोलीत आला, सोफ्यावर त्याची उशी घेतली आणि तिथे झोपला.
“रक्षित तू इथे झोपणार आहेस का?”
“हो.”
“पण तू तुझ्या खोलीत जा ना मी आहे ना इथे आणि माझ्यासोबत बाई येईल झोपायला.”
“नाही नको मला तुम्हा दोघांना एकटं ठेवायचं नाहीये, मी इथे याच खोलीत झोपेल. तुला काही त्रास होणार नाही शब्द आहे माझा.” असं म्हणून तो झोपला.
अभिज्ञा मात्र तशीच विचार करत बसलेली होती.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा