बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 42 अंतिम

Abhidnya abhiraj love bond


बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 42 अंतिम

आधीच्या भागात आपण पाहिले की, रक्षित अभिज्ञाला फार्महाउस वर घेऊन गेलेला, अभिज्ञाला आता अभिराजशी काहीच कॉन्टॅक्ट करता येत नव्हता, रक्षित स्वतः तिच्या अवतीभवती असायचा.

आता पुढे,

रक्षित वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला आणि याचाच फायदा अभिज्ञाने घेतला. अभिज्ञाने लगेच बाईचा मोबाईल बाहेर काढला, लगेच अभिराजला फोन केला त्याला सगळं सांगितलं तिथला पत्ताही सांगितला आणि लगेच फोन ठेवून दिला. फोन स्विच ऑफ करून बाईच्या बॅगमध्ये ठेवला. थोड्या वेळाने रक्षित बाहेर आला. तो दिवस तसाच गेला,

आता रक्षितला वाटलं आता सगळं मनासारखं होणार आहे, तो खूप आनंदात होता, आता अभिराज आपल्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही अशा आशेवर तो टीव्ही बघत बसलेला होता. संध्याकाळी रक्षित बाहेर फिरायला म्हणून निघाला आणि त्याला अचानक पोलिसांची गाडी येताना दिसली. तो घाबरला आणि आत आला.

“अभिज्ञा तू हे बरोबर केलं नाहीस, तू पोलिसांना इकडे बोलवलस?”

“नाही रक्षित मी असं का करेन आणि मी त्यांना इकडे कसं काय बोलवेल? माझ्याजवळ तर मोबाईल पण नाही.”

“हे बघ खोटं बोलू नकोस. खोटं बोललीस ना तू तुझ्या बाळाला गमावशील.”
“खरं खरं सांग.”

“हे बघ रक्षित मी खरं सांगते मी कुणालाही काही सांगितलेलं नाही.”

रक्षितने लगेच दरवाज्याची कडी लावली.

“हे बघ दरवाजा खोलायचं नाही, या खोलीत कोणीही आत मध्ये येता कामा नये.” असं म्हणून तो दरवाजा लावून आत बसला.

पोलिसांची गाडी आली त्यांनी कोणाला काही न विचारता ते सरळ आत गेले, बाईला अभिज्ञा बद्दल विचारलं बाईने ती खोलीत आहे अस सांगितलं.

पोलिसांनी दरवाजावर थाप मारली दरवाजा आतून उघडत नव्हता. पोलिसांनी आवाज दिला, अभिराजही सोबत होता. अभिराजनेही आवाज दिला.

“अभिज्ञा दरवाजा खोल आता घाबरू नको आम्ही सगळे आलो आहोत, हे बघ तुला घाबरायची काही गरज नाहीये आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत दार उघड.” रक्षितने अभिज्ञाचे हात बांधून ठेवलेले होते त्यामुळे अभिज्ञा दार उघडू शकत नव्हती, तिने बोलण्याचा प्रयत्न केला तर रक्षितने तिचं तोंडही दाबून ठेवलेलं होतं, बराच वेळ दार ठोकूनही दार उघडलेला नव्हता. शेवटी पोलिसांनी दार तोडलं आणि अभिज्ञाला बाहेर काढलं आणि रक्षितला अटक केली.

अभिराजला पाहून अभिज्ञा त्याला बिलगली, पोलिसांनी त्या बाईला पण आपल्या सोबत नेलं. तिला तिच्या घरी पोहोचवलं आणि अभिज्ञा अभिराजला त्यांच्या घरी सोडून पोलीस रक्षितला पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

अभिराज आणि अभिज्ञा एकमेकांना बिलगले. अभिज्ञा त्याच्याजवळ खूप रडली, अभिराजला खूप अपराधी वाटत होतं.

“आय एम सॉरी अभिज्ञा माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, मला तुझ्यापर्यंत पोहोचायला खूप उशीर झाला.”

“नाही अभि ही वाईट वेळ होती,निघून गेली. तू स्वतःला दोष देऊ नकोस.”

दोघांचं बोलणं सुरू होतं आणि अचानक अभिज्ञाच्या पोटात दुखायला लागलं. वेळ न घालवता तिला हॉस्पिटलला नेलं, डॉक्टरांनी सिजर करावा लागेल असं सांगून तिला ओटीमध्ये घेऊन गेले. काही वेळातच अभिज्ञाने गोंडस मुलीला जन्म दिला. सगळ्यांना खूप आनंद झाला. हॉस्पिटलमध्ये सगळे जमले, सगळ्यांनी आनंद साजरा केला. अभिज्ञाने बाळाकडे बघून
“हे बघ पिल्लू आता उर्वी मावशीला सांग की लवकर स्वानंद काकाशी लग्न कर म्हणावं.” असं म्हणून ती हसली.
उर्वी लाजून हसली आणि अभिराज बोलला,

“हसली तर फसली..”
आणि सगळे हसायला लागले.

समाप्त:

🎭 Series Post

View all