बोल तिचे जिद्द माझी भाग १

आत्मसन्मान जपताना कोणीतरी त्याची जाणीव करुन दिल्यावर जिद्दीने जग जिंकता येते.
" मीना अग ती माझी फाईल कुठे ठेवलीस तू. टेबलावर इथेच ठेवली होती मी. तू पसारा आवरायला आली असणार आणि डाव्या-उजव्या हाताने कुठे तरी ठेवली असशील ना." मोहन मीनाला आवाज देत बोलत होता.

" मी तर ती फाईल महत्वाची म्हणून कपाटात ठेवली होती." मीना मोहनला सांगत होती.

वेंधळी कुठची. घरातलं काम तर असतं तुला. त्यात देखील कुठे काय ठेवते हे तुला मला सांगायला विसरुन जाते की काय? फाईल घेवून मोहन निघून गेला होता.

" आई माझं स्पोर्ट्स चे टि-शर्ट कुठे ठेवले. लवकर दे, काॅलेजला जायला उशीर होतो आहे." अथर्व देखील रुबाब झाडल्याप्रमाणे आईशी बोलत होता.

" अग बागेतून फुले आणली का? देवपूजेला उशीर होतो आहे." सासूबाई मीनाला बोलत होत्या.

" आई मी बटाट्याची भाजी बनवली आहे. डब्याला तिचं घेवून जाणार आहे. अथर्व तुला हवी का भाजी." आनंदी बोलत होती.

" गुणाची बाय माझी. काॅलेजला आहे तरी पण अभ्यास सांभाळून घरात कामात मदत करते. नाहीतर हा लाडोबा काहीच काम ऐकत नाही घरातले." मीना आपल्या मुलांकडे पाहून बोलत होती.

घरातले काम आवरुन झाल्यावर अचानक दारावरची बेल वाजत होती. जरा कुठे विश्रांती घ्यावी तर, कोण आले काय माहित स्वत:ची पुटपुटत मीना दार उघडायला गेली होती.
दारात मावस सासूबाई आणि त्यांचे कुटूंब होते. जवळच्या नातेवाईकाचे लग्न पाच दिवसांनी होते. हळद आणि शेवतीच्या कार्यक्रमामुळे इथे आल्यावर ये-जा करणं बर पडेल म्हणून मीनाकडे राहायला आल्या होत्या.

मीना मावस सासूबाईंचा पाहुणचार उत्तम प्रकारे पार पाडत होती. तरीही मीनाच्या सासूबाई मात्र तिला सतत कोणत्या ना कोणत्या कामावरुन आपल्या बहिणी समोर तिचा पाण उतारा करत होत्या. भाजी नीटच नाही बनवली, जास्त पाण्यासारखी पातळ केली. झाडून सुद्धा नीट काढता येत नाही तुला. या प्रश्नांना हसतमुखाने सामोरी जात मीना निमुटपणे आपलं कम करत होती.

कपडे घट्ट पिळून वाळत घालायला काय होते तुला. ह्यांची कपडे वाळल्यावर लगेच बाजूला घडी करुन नाही ठेवता येत का तुला. सासूबाई जास्तच मीनाला सुनवतात ही गोष्ट मावस सासूबाईंच्या लक्षात आली होती.

तीन दिवस तेच पाहिल्यानंतर मीनाची होणा-या कोंडी विषयी कोणासोबत बोलवं कळतच नव्हते. एकीकडे नवरा, सासरा, मुलगा, सासू सगळे तिला टारगेट करत होते. मुलगी आनंदी मात्र आईच्या बाजूने उभी होती.

मावस सासूबाई कोणते पाऊल उचलतील पाहुया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all