बोल तिचे जिद्द माझी भाग २

आत्मसन्मान जपताना कोणीतरी त्याची जाणीव करुन दिल्यावर जिद्दीने उभी राहण्याची ताकद मिळते.
आनंदी समोर विषय काढताच एक गोष्ट मावस सासूबाईंच्या लक्षात आली होती की घरात मीना कमवती नाही. त्यामुळे घरचे सगळे काम तिला करणे भाग होतेच. बाकीच्यांच्या सूना घर पाहून बक्कळ पैसे कमावून आणत होत्या. मीना बरोबर याविषयी बोलताच, मोहनने नोकरी करायला विरोध दर्शवला होता. नको ती लफडी बायका करतात, त्यापेक्षा घरातल आणि पाहुण्यांचे तेवढं बघत जा असे लग्न झाल्यापासून सांगत होता.

नव-याच्या विरोधात जावून काम करणं मीनाला न पटणारं नव्हते. म्हणून समोर येईल ते काम निमूटपणे करण्याची तिला सवयचं दडली होती.

" तू अशी गप्प राहिली तर, आनंदीन पण तुझ्यासारखचं जगायचं का? तिला पण तू अशीच बनवणार का? मावस सासूबाई मीनाला बोलत होत्या.

" नाही मी माझ्या मीनाला स्वत:च्या पायावर उभी करणार. तिच्या बाजूने उभी राहणार. मी जे सोसले ते आता तिला सोसून देणार नाही." मीना मावस सासूबाईला सांगत होती.

"हिच जिद्द तू स्वत: करता ठेवली असती तर आज आत्मसन्मान जपला असतास आणि कोणाचे ऐकून देखील घ्यावे लागले नसते तुला. माझी बहिण आहे पण मी देखील तिला काही बोलू शकत नाही." मावस सासूबाई मीनाशी बोलत होत्या.

" मी काय दोन दिवसाची पाहुणी. इथे राहणार आणि जाणार. पण आयुष्यभर तुलाच या सर्वांना तोंड द्यायचे आहे. स्वत:चं आयुष्य असं कवडीमोल नको करुन घेऊस. यावर तू स्वत:च स्वत:ची मदत करु शकते." मावस सासूबाई मीनाला सांगत होत्या.

" दोन मुलं एवढी मोठी झाली तरी मी काही बोलू शकले नाही. आता काय माझं तोंड उचकटणार आहे का." मीना मावस सासूबाईंना सांगत होती.

" चला आता लग्न सोहळा झाल की तिथून जावू आम्ही." सर्वांचा निरोप घेत मीनाच्या मावस सासूबाई तिथून गेल्या होत्या.

आपल्या आईला सर्वांच्या नजरेत सन्मानाने वागायचे असेल तर काही ना काही तर उपाय करायलाच हवा असे आनंदीला मीनाच्या आणि मावस सासूबाई मधले बोलणे ऐकल्यानंतर वाटत होते. खरतर खूप काही करण्याची इच्छा असून देखील घाबरुन आनंदी गप्प बसत होती. परंतु आता आपल्या मावस आज्जी मुळे पुन्हा एकदा नव्याने उभी राहण्याची ताकद निर्माण झाली होती.

आईच्या मदतीने आनंदीने मीनाला फॅशन डिजाईन चा कोर्स लावला होता. घरी घरातले सामान, भाजीपाला, बॅंक चे व्यवहार, अशी कारणे देत कधी कोर्सचा टाईम बदलून तर कधी कोणते निमित्त शोधत आनंदी मीनाला घराबाहेर काढून त्या कोर्सला नेऊन पोहचवत होती.

कोर्स पूर्ण झाल्यानंतर परीक्षा देखील घेण्यात आली होती. त्यात मीनाने टाॅप केले होते. घरातले सगळे दुपारच्या वेळी आपल्या कामाला लागल्यानंतर मीना मात्र कपडे आणून त्याची निरनिराळी फॅन्सी डिझाइन स्वत: करु लागली होती.

पुढे जावून मीनाचे आयुष्य कोणते वळण घेईल पाहुया अंतिम भागात.

🎭 Series Post

View all