बोल तिचे जिद्द माझी भाग ३ अंतिम

आत्मसन्मान जपताना कोणीतरी त्याची जाणीव करुन दिल्यावर जिद्दीने उभे राहता येते.
आईने बनवलेली डिझाईन आनंदीने त्या मॅडमला दाखवताच त्यांना ते डिझाईन इतके आवडले की त्यांनी अश्या प्रकारच्या कपडे डिझाईन करण्याची आॅर्डर दिली होती. मीना हळूहळू अश्या आॅर्डर घेत खूप पैसे कमवत होती. घरी मात्र याविषयी कोणत्याच प्रकारे वाच्यता ती करत नव्हती. आनंदीला तशी शपथ देखील घातली होती.

एक दिवस मीनाने सर्वांना हि गोष्ट सांगायचे ठरवले होते. "तिने आनंदीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपण देखील उत्तम बिजनेस करु शकतो हे बोलण्यातून नाही तर कृतीतून दाखवून दिले होते.

इतकी वर्ष माझ्यात असणारे टॅंलेट विसरुन दिवस-रात्र घरा करता सुख-दुख बाजूला सारुन पडेल ते काम केली होती. त्याबदल्यात नेहमी मला हिणवले जायचे. ती नाही कमवत... पण मी काय करते हे कोणी कधी विचारात घेतलं का?

सास-यांचे मित्र न सांगता जेवायला आले की भाजी आणण्यापासून ते स्वयंपाक बनवण्यापर्यंत होणारी धावपळ कधी अनुभवलीत का तुम्ही? अथर्व ला वेगळी, सासूबाईला वेगळी भाजी आवडती म्हणून भूक लागली असताना देखील जेवत्या ताटावरुन उठून दुसरी भाजी बनवत होते. मुल लहानाची-मोठी कशी झालीत, याकडे कधी लक्ष तरी दिल का तुम्ही. पैसा फेकला की सगळ्या गोष्टी होतात. का? तर ती कमवत नाही. म्हणजे कसही वागवू शकता अस नाही.

आज मी जे काही बोलते ना ते आमविश्वासाने माझ्याकडे देखील बोलायला आहे, मी देखील आज माझे छोटे दुकान उभे केले आहे. फॅशनचे कपडे हव्या त्या डिझाईन मधे शिवून देण्याचे. माझ्या देखील हातात आज पैसा आहे."

मीनाच्या बोलण्याने घरातला प्रत्येक जणाला आपली चूक लक्षात आली होती. सर्वांनी मीनाची माफी मागितली होती.

" तू केलेल्या त्यागाची कधी किंमतच केली नाही. न बोलता सहन करत गेल्यामुळे तुझ्यावर किती तणाव येत असेल याचा अंदाज कधी बांधता आलाच नाही." मोहन मीनाशी बोलत होता.

" घरात पाहुणे आल्यावर मी देखील तुला मदत कधी केली नाही. तुझी सतत परीक्षा घेत मी देखील डोळ्यावर झापडं बांधली होती." सासूबाई मीनाला बोलत होती.

" सून नाहीतर घरात मुलीलाच आणतो हे मी विसरुन गेलो होतो. तुला सतत काम सांगून मी स्वत: अपाहिज असल्यासारखे वागलो होतो. मला क्षमा कर. " सासरे मीनाला बोलत होते.

" गप्प बसून काम केली तर अन्याय करत होते. आणि आज मनातल्या भावना बोलून दाखवल्या वर माझे महत्व लक्षात आले." मीना सर्वांकडे पाहत बोलत होती.

" मावस सासूबाई पाच दिवस आल्या पण जीवनात कमालीचा बदल घडवून गेल्या होत्या. त्यांच्यामुळे आज माझे अस्तित्व जिवंत आहे. नाहीतर या रोजच्या कामांना , अपमानाला कंटाळून कधीच आयुष्य संपवणार होते." मीना बोलत होती.

" कमवत नव्हते मान्य करते मी. पण माझं जीवन तुमच्या भोवती जगत होते मी. त्यात तुम्ही मला अस काय अडकवत गेला की मला माझाचं विसर पडत होता. प्रत्येक काम माझ्याच हातातून झालचं पाहिजे असे एकाच वेळी सर्वजण हाक मारुन करुन घेतं होते. सुरवातीला नविन असल्याने न बोलता करत गेले ते आज तागायत अंगवळणी पडत गेले होते." मीनाच्या शब्दांचा आज बांध फुटला होता.

आनंदीला जवळ घेत मीना घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. अखेरीस सर्वांनी आपली चूक मान्य करत सन्मानाने मीनाला वागवण्याचे ठरवले होते. तिला उभारी देत आज वेगवेगळ्या शाखांमधे मीनाचे फॅशन डिझाईनच्या कपड्यांना मागणी होती.
एवढेच नाहीतर, परदेशात देखील या फॅशनला पसंति दर्शवली जाऊन एका पुरस्कारा करता मीनाला मानकरी ठरवले होते.

🎭 Series Post

View all