बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 1

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 1 देशमुख सरांच लेक्चर सुरु होण्यास 10 मिनिटच बाकी होते त्यामुळे ?

 बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 1

देशमुख सरांच लेक्चर सुरु होण्यास 10 मिनिटच बाकी होते त्यामुळे सगळे गडबडीने क्लासरुमकडे जात होते....देशमुख सर हिस्ट्रीचे शिक्षक होते...खुप स्ट्रिक्ट.....जर क्लास मध्ये वेळेत नाही आले की 1 आवठवडा लेक्चरला बसु दयायचे नाहीत........त्यामुळे सगळे गडबडीने क्लासरुमकडे जात होते........

सगळे क्लासरुमध्ये जावुन बसले....शेवटचा एखादा मिनिट राहीला असेल....मेघना लेक्चर सुरु होईल म्हणुन फास्ट जात असते.......तिचा हया कॉलेजमधला पहीलाच दिवस होता........तिला कोणी तरी सांगितलेल असत की.........सरांना लेट झालेल चालत नाही........म्हणुन ती गडबडीने क्लासरुमकडे जात होती..तेवढयात तिचा धक्का एका मुलाला लागतो........आणि त्याचे नोट्स सगळे खाली पडतात......

सॉरी सॉरी ते चुकुन झाल....मेघना त्या मुलाला सॉरी म्हणत त्याचे पडलेले नोट्स गोळा करु लागते....त्या मुलाच लक्ष मेघनाकडेच होत......तो नोट्स गोळा करत तिच्याकडेच बघत असतो........

मेघना गडबडीने नोट्स गोळा करुन त्या मुलाच्या हातात देते व त्याच्याकडे न ‍ बघताच गडबडीने निघुन जाते.......

तो मुलगा सुध्दा मेघना गेल्यावर त्याच्या कलासरुमध्ये जातो........

मेघना नविन असल्यामुळे तिला पटकन तिचा क्लासरुम मिळत नव्हता...... ति विचारत विचारत क्लास शोधत असते...काही वेळच राहीलेला असतो तेवढयात ती क्लासमध्ये पोहचते...

क्लासमध्ये गेल्यानंतर बसण्यासाठी बॅन्च शोधत असते.......सगळे तिच्याकडेच बघत असतात......तो मुलगाही त्याच क्लासमध्ये होता.........त्याच लक्ष मेघनाकडे जात.........अरे ही तर आपल्याच क्लास मध्ये आहे.....

मेघना एका बॅन्चवर जावुन बसते......

.हुश्श्श्श्..... पोहचले एकदाची......

मेघना थोडावेळ रिलॅक्स झाल्यानंतर बॅगेतून नोटबुक पेन वगेरे काढुन ढेवते....तेवढयात देशमुख सर येतात

गुड मॉर्निग स्टुडंन्टस् ........

गुड मॉर्निग सर.....  सगळे उभा राहुन सरांना गुड मॉर्निग करतात.....

सिट डाऊन ऑल ऑफ यू...

सर ब्लॅकबोर्डवर टॉपिकच नाव लिहतात..........व लेक्चरला सुरवात करतात.......सरांच लेक्चर सुरु असत पण त्या मुलाच लक्ष सगळ मेघनाकडे असत......

सरांच लक्ष त्या मुलाकडे जात.....

मानस मोहीते...........सरांनी त्याच नाव घेतल्यानंतर तो भानावर येतो...लक्ष कुठे आहे तुझ....उभा रहा...

त्याला काय बोलाव कळेनाच.....सगळेजण त्याच्याकडे बघु लागतात.....मेघनाचही लक्ष त्याच्याकडे जात....

सॉरी सर......आता लक्ष देईन.........ओके सिट डाऊन....

मानस मोहीते.......देखणा हुशार रुबाबदार......सावळा रंग पण दिसायला ॲट्रॅक्टीव....बी.ए च्या लास्ट इयर ला होता...

मेघना...मेघना जगताप......हुशार, देखणी, गोरी, लांब काळेभोर केस, सडपातळ बांधा, पाहताक्षणी प्रेमात पडेल अशी...वडीलांची बदली झाल्यामुळे हया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली.....

सर शिकवतील तस सगळे नोट्स नोटबुक मध्ये उतरुन घेत होते...सरांच लेक्चर संपल....मुलांनो परवा दिवशी झालेल्या टॉपीकची टेस्ट आहे...सगळेजण तयारी करुन या देशमुख सर...

एवढ सांगुन सर क्लासरुमधुन बाहेर जातात......सरांच्या लेक्चर नंतर 10 मिनिटाचा ब्रेक होता

तशी सगळयांची गुजबुज सुरु होते.....2 दिवसात कशी तयारी करायची त्यांना कळेनाच...थोडया मुल-मुलींनच्याकडे नोट्स नव्हते....ते कुणाकडे नोट्स मिळतात का ते बघत होते...

मेघनाचीही तीच कन्डिशन होती....कारण ती 1 महिना लेट आलेली असते.....त्यामुळे तिच्याकडे आधिचे नोट्स नव्हते..तिला कळेनाच कोणाकडे नोट्स मागायचे...कोणाशी ओळखही नव्हती..

मेघना पहिला मुलींशी ओळख करुन घ्यायच ठरवते..तिच्या साईडला एक मुलगी बसली होती.......

हॅलो मी मेघना......नविन ॲडमिशन आहे..........आज माझा पहीलाच दिवस आहे....ती एका मुलीला ओळख करुन देताना म्हणाली.......

हाय मी श्वेता...

मेघना श्वेताच्या साइडला येवुन बसलेली.....तिच्या सोबत ओळख झाल्यानंतर एकएक करत सगळयांशी ओळख करुन घेते........ब्रेक संपल्यानंतर परत लेक्चर सुरु होत......

एकएक लेक्चर करत वेळ संपते.... मेघना परवाच्या टेस्टच टेन्शन आलेल असत तिला  नोट्स मागायचे कुणाकडे हे कळत नव्हते.. मला कोण फारस ओळखत पण नाही इथे त्यामुळे मला कोण नोट्स देणार.....असा विचार करत ती शांत बसलेली असते....

श्वेताच लक्ष मेघनाकडे जात....काय ग मेघना काय झाल......काही हवय का तुला.....

श्वेता ते....मेघना

अग बोल कसला संकोच नको करु...मला तुझी मैत्रिण समज.....श्वेता

श्वेता मी एक महिना लेट आलेय ना......सो माझ्याकडे आधिचे नोट् नाहीयेत.. आणि परवा टेस्ट आहे...तयारी कशी करु कळेना..व मी कोणाकडुन मागु पण शकत नाही..कारण माझी कोणासोबत ओळख पण नाहीये...

अग एवढच ना.......मी देईन तुला नोट्स.......

खरच श्वेता........मेघनाला खुप आनंद होतो....

हो ग......आपण कॉलेज सुटल्यानंतर जाऊन झेरॉक्स काढुन आणुया..चालेल ना....

हो चालेल.......थॅक्स श्वेता......

वेलकम..मेघना.....

मेघना : फ्रेन्ड्स..मेघना श्वेताकडे हात करत म्हणते.....

श्वेता: श्वेताही मेघनाच्या हातात हात देत फ्रेन्ड्स म्हणते व त्यांच्या गोड मैत्रीला सुरवात होते.....

कॉलेज संपल्यानंतर दोघी झेरॉक्स काढायला जातात....

मानस व त्याच्या मित्रही तिथे येतात......

मानस मेघनला पाहुन परत ब्लॅन्क होतो........

मानस....ए हॅलो......कुठे लक्ष आहे तुझ....श्वेता मानसला बोलवते...

तसा मानस भानावर येतो.....हा...काय म्हणालीस का

श्वेता : कुठे लक्ष आहे....केव्हाची बोलवत आहे......

मानस: काही नाही.....बोल ना काय म्हणत होतीस...

🎭 Series Post

View all