Login

बंध रेशमाचे!

बंध रेशमाचे!
*शीर्षक:- बंध रेशमाचे*

अलगद गुंफले
रेशमाचे बंध
त्यातून दरवळला
प्रेमाचा गंध

सोबत सदा
अशीच राहावी
समजुतीची सुमने
त्यातून वाहावी

नात्याची वीण
असावी घट्ट
सहवासासाठी
करते प्रीत हट्ट

मनसौंदर्य पाहून
हरपते भान
प्रेमगीत ऐकण्यास
आतुरले कान

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all