अंगापेक्षा बोंगा जड कुठे चालला सोंगा? भाग -1

कौटुंबिक
भाग -1

अंगापेक्षा बोंगा जड कुठे चालला सोंगा? – ख-या गोष्टी पेक्षा दिखाऊपणाच जास्त.

" प्रीती आज तुझं लग्नानंतर पहिलं हळदी कुंकू आहे, बायकांना वाण म्हणुन काय देणार आहेस..? " शेजारी राहत असलेल्या लता काकू विचारतात..

" हो काकू मि वाण म्हणुन हळदी कुंकू आणले आहे वाटायला.. " प्रीती बोलते..

" अरे वाह छान.. सगळ्या बायकांना तु आमंत्रण तर दिलं आहेस ना..? " लता काकू बोलतात..

" हो तर काकू, ह्यावर्षीचं हळदी कुंकू जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे.. " प्रीती लता काकूंना सांगत असते.

तेवढ्यात तिचं बोलणं, राणे काकी ऐकतात.
राणे काकी आणि लता काकी तिचे शेजारी असतात, राणे काकी थोड्या स्मार्ट असतात..

स्मार्ट म्हणजे तशा नाही काही, त्यांचा प्रत्येक गोष्टीचा उत्साह जरा इतर स्त्रियांपेक्षा जास्त असतो..

सोसायटी चं हळदी कुंकू म्हणा, नाही तर एखाद सनसूद म्हणा त्या उत्साहात तयारीत असतात..

" काय गं काय बोलतेस..? बरं आहे बाई त्या बहाण्याने मला नविन कोऱ्या साडीची घडी मोडायला भेटेल.. " राणे काकू बोलतात..

" हो काकू... तुम्ही सुद्धा या... आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे.. " प्रीती बोलते..

" हम्म्म्म बरं आहे बाई, आमच्या वेळी असं काही नव्हतं.. त्यामुळे हौस मौस कमी भेटली करायला.. " राणे काकू बोलतात..

" अगं तेव्हा नाही भेटली, पण आता तु करते हौस ती काय कमी आहे का.. " लता काकू टोमन्याने राणे काकूंना बोलतात..

राणे काकू वसंत चाळीतल्या एकमेव अशा व्यक्ती होत्या ज्यांना उत्साह नावाचं प्रकार कुटुन कुटून भरलेला असतो.

तेवढ्यात जोशी काकू येतात, " काय गं प्रीती झाली का तयारी संध्याकाळ ची..? " जोशी काकू बोलतात..

" हो ही काय झाली, आणि आमंत्रण सुद्धा आलं.. हटके करणार आहे ती हळदी कुंकू... " राणे काकू फार जोशात बोलतात..

" काय ओ राणे वहिनी, हळदी कुंकू तिचं आहे की तुमचं..? नाही म्हटलं उत्साहात दिसत आहात.. " जोशी काकू नाक मुरडत बोलतात..

" हळदी कुंकू कोणाचं ही असो, बायकांना कामातून वेळ काढून तेवढीच एक मजा करायला भेटते... नाही तर मेल रांधा वाढा उष्टी काढा.. " राणे काकू बोलतात, जोशी काकू, प्रीती, लता काकू एकमेकांकडे पाहतात..

" बरं मि जाते आवरते... संध्याकाळची साडी काढून ठेवावी लागेल ना.. " असं बोलुन राणे काकू घरात जातात.

प्रीती युवा पिढीतली, तिला वेगळं आणि हटके हळदी कुंकू करायचा असतो.. म्हणजे थोडक्यात बायकांच्या किटीपार्टी सारखं..

संध्याकाळ होते... हळू हळू करून संध्याकाळी सात वाजता बायका प्रीतीच्या घरात जमतात..

प्रीतीच्या घरातुन फास्टफूड चा वास दळवळत होता.. आणि साऱ्या बायकांचं आणि खास करून राणे काकूंच लक्ष सारखं किचनमध्ये असत..

" काय गं... इतका सुंदर वास तुझ्या आतल्या किचन मधुन येतो आहे का...? " राणे काकू हळूच प्रीतीच्या कानात कुजबुजतात.

" हो काकू.." प्रीती बोलते..

साऱ्या बायकांचं लक्ष राणे काकू वर असत. असणारचं राणे काकू फॅशन ची साडी आणि खुप सारे दागिने जे घालून आले होते..

लांब फॅन्सी मंगळसूत्र, त्यात घातलेला चपला हार. हातावर बाजूबंद इतर अनेक दागिने तिच्यावर उठून दिसत होते..

" काय ओ राणे वहिनी... कुठे लग्नाला वगरे जाणार आहेत का...? " जोशी काकू विचारतात..

" छे ओ भारती ताई मि कुठे जातेय... हिच्या कडे प्रोग्रामला यायचं म्हणुन आपली तयारी केली.. " राणे काकू बोलतात..

राणे काकू साडी नीट करतात, दागिने नीट करतात..

" हो गं.. ह्यांची साडी पण सुंदर आहे.. काय गं कितीला घेतलीस..? " विमल काकू विचारतात..

" छे ओ मि कुठे जाणार घ्यायला... आमच्या ह्यांनी मला बर्थडे ला दिली गिफ्ट म्हणुन.. " राणे काकू बोलतात..


क्रमश...

🎭 Series Post

View all