पुस्तक परिक्षण :इकिगाई
इकिगाई हे जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक आहे.ह्या पुस्तकाचे लेखन हेक्टर गार्सिया अणि फ्रान्सिस मिरेलस ह्या दोन लेखकांनी मिळुन केले आहे.
इकिगाई ह्या पुस्तकात जपानी लोकांच्या दिर्घायुषी,निरोगी अणि आनंदी जीवणाचे रहस्य सांगितले आहे.अणि ह्या रहस्यामागचे मुळ कारण आहे त्यांचा इकिगाई.
इकिगाई म्हणजे जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा कधीच विनाकारण जन्माला आलेला नसतो.त्याच्या जन्मामागे एक कारण असते.जसे की आपले सर्वाचे लाडके शिवाजी महाराज अणि बाबासाहेब आंबेडकर हे विनाकारण जन्माला आले नव्हते.त्यांच्या जन्मामागे हिंदवी स्वराज्याची स्थापणा तसेच भारतीय राज्यघटनेची निर्मिती तसेच दीनदुबळयांची सेवा ही रहस्ये दडलेली होती.एकदम त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या ह्या पृथ्वीवर जन्मण्यामागे एक कारण दडलेले आहे तेच आपले सर्वाचे इकिगाई आहे.
अणि हे इकिगाई आपल्याला शोधता आले पाहिजे.यालाच सोप्या भाषेत आपल्याला महत्वाकांक्षा तसेच जगण्याचे कारण असेही म्हणता येईल.कोणाची महत्वाकांक्षा(इकिगाई) मोठा अधिकारी बनुन भ्रष्टाचार तसेच गुन्हेगारी मुळासकट संपविणे हा असतो.तर कोणाची महत्वाकांक्षा डाँक्टर,इंजिनिअर इत्यादी बनणे असते.म्हणजे ह्यावरुन आपल्याला लक्षात येईल की प्रत्येकाचे आपल्या आयुष्यात एक ध्येय असते.स्वताचा एक इकिगाई ठरलेला असतो अणि प्रत्येकाने त्याप्रमाणेच काम करणे गरजेचे आहे.
पण ह्यातच काही जणांची मला अशी पण तक्रार ऐकु येते की आम्हाला आमच्या आयुष्य जगण्याचे उददिष्ट म्हणजेच आमचे ध्येय आमचा इकिगाई अजुनही सापडलेला नाहीये.मग आम्ही तो कसा शोधायचा.आम्हाला तो कसा सापडेल?ज्यांना अजुनही आपल्या जगण्याचे कारण,आपली महत्वकांक्षा,आपले ध्येय आपले इकिगाई अजुनही कळालेले नाहीये त्यांनी एकदा हे पुस्तक नक्की वाचावे.मी खात्री देऊन सांगतो त्यांना त्यांचा इकिगाई नक्कीच सापडेल.
अणि माझी सगळयांना कळकळीची विनंती आहे की मोबाईलवर पीडीएफ फाँरमँट मधुन हे पुस्तक वाचण्यापेक्षा हे पुस्तक एखाद्या ग्रंथालयात जाऊन वाचा नाहीतर घरबसल्या का होईना आँनलाईन मागवुन खरेदी करुन वाचा.कारण प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यात जो आनंद अणि सुख आहे तो आनंद पीडीएफ वाचताना आपल्याला अजिबात प्राप्त होत नाही.हे आपल्या तरुणाईला कसे समजावुन सांगावे मला कधी कधी हा पण प्रश्न पडतो?
कारण आपली तरुणपिढी आँनलाईन पीडीएफ फाँरमँट मधील पुस्तके वाचण्यात इतकी हरवत चालली आहे.की
प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याची खरी मज्जा काय असते? हेच त्यांना कळत नाहीये,ते विसरत चालले आहेत.म्हणुन प्रत्यक्ष पुस्तके वाचण्यासाठी आपल्या तरुणपिढीला प्रोत्साहित करावे ह्या हेतुने मी सदर पुस्तकाचे परिक्षण लिहिले आहे.अणि ज्यांना खरच पुस्तकांविषयी प्रेम आहे त्यांनी पीडीएफ फाँरमँट मधील पुस्तके वाचण्यापेक्षा
पुस्तकाची हार्डकाँपी खरेदी करुन ती वाचावी बाकी तुमची सगळयांची ईच्छा.मी कोणावर माझे मत लादून काही बळजबरी नाही करु शकत.
तरी तुम्हाला इकिगाई हे पुस्तकाचे वाचन करून आपल्या जगण्याचे कारण,आपले ध्येय,उददिष्ट आपले इकिगाई शोधायचे असेल किंवा ते जाणुन घ्यायचे असेल तर नक्की हे पुस्तक वाचा.
मराठी भाषा दिनाच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा
माझ्या लेखांबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आपण मला संपर्क साधु शकता.
व्हाँटस अँप मो नं : 9356186023
ईमेल :www.yogeshsonawane26@gmail.com
पुस्तक परिक्षक : योगेश वंदना पोपट सोनवणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा