Login

द बॉस- The Boss (पर्व 2- भाग 23)

Who Should Be The Next CEO?


भैरवचं समजल्यापासून तनिषा चिंतेत होती. ती विचार करू लागली, "खरंच आपलं चुकलं का? भैरवला त्याच्या योग्यतेनुसार वागवू शकलो नाही का?"

तनिषा आतल्या आत बैचेन झाली, इथे तिला आधीच मिस्टर रॉन मुळे खूप मनस्ताप झाला होता, पण आपलीच माणसं साथ सोडायचं म्हणत असतील तर ! भैरव तिचा राईट हॅन्ड होता. तनिषाच्या प्रत्येक कल्पना सत्यात साकारायला त्याने जिवाचं रान केलं होतं, प्रत्येक क्षणी तनिषा मॅमची साथ दिली होती. पण आता तो face of America जॉईन करणार? त्याने तिथे काम करण्याबद्दल तनिषाला अडचण नव्हती, पण त्याने आपल्यावर अविश्वास दाखवला, इतक्या वर्षाचं नातं तो तोडायला निघाला याचा तिला जास्त त्रास होत होता. Face of America आता कायम आपल्या कंपनीशी स्पर्धा करेल, आपल्याला मात देण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवेल...ही स्पर्धा थेट भैरवसोबत असेल. ज्याने शब्दांतर उभं करायला इतका हातभार लावला त्याच्याशीच स्पर्धा?

या सगळ्या कारणांनी तनिषा पहिल्यांदा इतकी बैचेन झाली होती. आज ऑफिसमध्ये The Real Face Of America च्या नवीन वृत्तपत्राबाबत मिटिंग ठेवली होती पण तिने ती कॅन्सल केली. तिचं मन लागत नव्हतं, तिच्या खुर्चीवर ती डोळे मिटून बसली होती. आईचं काहीतरी बिनसलं आहे हे आर्याच्या लक्षात आलं, ती आईकडे गेली.

"मॅम, सगळं नीट आहे ना?"

"आर्या..भैरव शब्दांतर सोडतोय"

"काय?" आर्याला मोठा धक्का बसतो..

"मॅम भैरव सरांच्या भरवश्यावर शब्दांतर सुरू आहे, आता तेच सोडून गेले तर..."

"शेवटी ज्याची त्याची मर्जी, जाऊदे..त्याला नव्या ऑफर मध्ये त्याचं भविष्य दिसत असेल"

"काय ऑफर आलीये त्यांना?"

"Face of America, CEO"

"अच्छा..मिस्टर रॉन यांनी बरोबर खेळी केली म्हणायची"

"आपल्याला पुरस्कार मिळाल्यापासून मिस्टर रॉनचं चित्त ठिकाणावर नाहीये. आपल्याला मात देण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो तो माणूस"

"इतका राग का आहे पण त्याचा आपल्यावर?"

"वर्णद्वेष. काळे गोरे हा वाद फार जुना आहे. जगावर गोऱ्यांची सत्ता असावी, आपल्यासारख्या लोकांनी पुढे आलेलं त्यांना पचत नाही. त्यामुळे इतर इतक्या कंपन्या असतांना त्याने face of America मध्ये इंटरेस्ट दाखवून ती कंपनी ताब्यात घेतली. कंपनी चालत नाहीये हे दुःखं तर त्याला आहेच, पण सर्वात मोठं दुखणं हे आहे की मी त्याच्यापासून वेगळं होऊन यशस्वी होऊन दाखवलं"

"मॅम, मला आता भीती वाटतेय अश्या वातावरणात राहायची. वर्णद्वेषातून खूप एशियन लोकांच्या हत्या झालेल्या बातम्या ऐकू येतात, तेव्हा वाटतं आपण बरं आणि आपला देश बरा"

"आपण जर इथून पळून गेलो तर आपल्या देशात शून्यातून साम्राज्य निर्माण केलेल्या क्रांतिवीरांचा अपमान होईल आर्या. मूठभर मावळे घेऊन लढलेल्या शिवरायांचा, इंग्रजांच्या तावडीतून भारताला स्वतंत्र करणाऱ्या वीरांचा..आपण जेव्हा बाहेरच्या देशात येतो तेव्हा आपल्या देशातले संस्कार आपल्या वागणुकीवरून दिसून येतात. आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतो"

"खरंय, पळवाट काढणं सोपं आहे, पण लढा देणं कठीण..मातीची मूर्ती बनवणं सोपं पण दगड कोरून मूर्तीला आकार देणं कठीण, पण शेवटी वजन मात्र कठीण दगडाच्या मूर्तीचंच असतं.. कितीही उन्हाळे पावसाळे आले तरी ती मूर्ती तटस्थ उभी असते..आणि तुला घाबरायची गरज नाही, मी आहे ना? माझं लक्ष आहे तुझ्यावर"

हे सगळं ऐकून आर्या भावुक होते..

"काय झालं रडुबाई?"

"या वयात जे मी बोलायला हवं ते तू बोलतेय, मी म्हणायला हवं की तू घाबरू नकोस, मी आहे.."

"बाई गं, मोठी झालीस की तू..असो, तुही तसं म्हणशील, काठीणतला कठीण काळ आला तर तूच मला वाचवशील, खात्री आहे मला, mark my words..!!!"

आर्याला समाधान वाटतं. ती पुन्हा मूळ विषयावर येते,

"आई भैरव सरांचं काय? काय करायचं?"

"आता त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे म्हटल्यावर आपण मध्ये यायला नको, मी माझ्या परीने त्यांना समजवायचा केला प्रयत्न, पण व्यर्थ"

"आपण त्यांना डबल पगाराची ऑफर दिली तर?"

"लालूच दाखवणं आपल्या तत्वात नाही, भैरव सर जर थांबले तर ते पैशाच्या अमिषावर थांबतील..कामाबद्दल त्यांना प्रेम उरणार नाही..हा माणसांचा आणि पैशाचा बाजार नको. बरं मी म्हणत होते की एकदा भारतात जाऊन यावं, आपल्या घरी"

"जाऊयात, आपण दोघी जाऊयात"

"नाही, आर्या तू इथे थांबायला हवं..मी परत आले की तू जा"

"ठीक आहे, तू कधी जातेय?"

"आपलं न्यूजपेपरचं एकदा फायनल झालं की जाऊन येईन.."

"आज घेतेय ना मिटिंग?"

"आज खरंच मनावर मळभ दाटून आलंय भैरवच्या त्या निर्णयामुळे, या अवस्थेत मिटिंग नको..उद्या करूया शेड्युल"

****

संध्याकाळी तनिषा आपल्या घरी गेली. दारावरची बेल वाजली, मेघना दारात हजर..दारातच तिने तनिषाला मिठी मारली..

"Congrats..congrats..congrats...तुला अवॉर्ड मिळाला अन मी जाम खुश झाले बघ, शेवटी द बॉस.. तनिषाला शक्य नाही अशी कोणती गोष्ट आहे म्हणा जगात.."

"ते सोड, कुठे होतीस इतके दिवस?"

"कंपनीने कामानिमित्त एका टूर वर पाठवलेलं मला कॅनडामध्ये, महिनाभर.. पूर्ण डिसेंबर तिकडेच गेला. काम झालं आणि लागलीच इकडे आले"

"बरं, बाकी काय म्हणतेस, लग्नाचा वगैरे विचार काही?"

"इतक्या कमी वयात लग्न? बालविवाह होईल तो.."

"30 वर्षाची झालीये तू.."

"कॅटरिनाने 38व्या वर्षी केलं"

"तू स्वतःला कॅटरिना समजतेस का मग?"

"ते सोड गं..तुझं सांग, सध्या काय सुरुये.."

"तेच..The real face of America चं काम.."

"छान आहे मासिक, वाचलं मी..अजून काय नवीन प्लॅन?"

"आहेत भरपूर प्लॅन्स, सांगेन नंतर.."

"नंतर का? सांग की आताच"

"माझं ना आज डोकं दुखतंय.. जरा बसू दे मला शांत.."

"Ok ok.. तू आराम कर, एक मिनिट, तू बस मी तुझ्यासाठी काहीतरी करून आणते..गरम गरम सूप?"

"चालेल..फार बरं होईल"

"आणि हे काय? आल्या आल्या तुझी बॅग सुद्धा आत ठेवली नाही तू..आल्यावर हातपाय सुद्धा धुतले नसणार.." असं म्हणत मेघना तिची बॅग उचलून आत बेडमध्ये ठेऊन देते आणि गरम गरम सूप बनवून आणते.

"बरं वाटलं हा सूप पिऊन..थँक्स.."

"वेलकम.."

"हे तुझ्या हातात काय आहे?"

"अरे हो, सांगायचंच विसरले.. आई आलेली इथे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी..सारप्राइजच दिलं गं, नशिब, त्या दिवशी मी मार्कला घरी नव्हतं बोलावलं.. नाहीतर, बापरे!"

"अजून सुरूच आहे का तुझं, कितवा बॉयफ्रेंड आहे हा?"

"एवढी नोंद ठेवायला तो काय रेकॉर्ड आहे काय..हा हा.."

****

"माई झालं का? मला उशीर होतोय"

"हो हो, हा घे डबा.. थकले बाबा मी"

माई आता खरंच थकत होत्या, वयानुसार त्यांनाही हे सगळं झेपत नव्हतं.

"माई, तनिषा येणार आहे लवकरच, काळजी करू नकोस"

"तिचा काही भरवसा नाही रे ! कधी येईन आणि कधी जाईन कळणारही नाही..मला तर वाटतं तू बायको आहेस आणि ती नवरा...बायकोला घरी टाकून नवरा कामानिमित्त बाहेरगावी जातो, इथे उलटंच"

"आता ती आली ना, परत जाऊ देणार नाही मी तिला..जे काय करायचं ते इथेच कर असं सांगेन"

"ती ऐकेल का तुझं? मला नाही वाटत, आजपर्यंत कुठली गोष्ट ऐकलीये तिने तुझी? मनाला येईल ते करत गेली.. डोक्यावर बसवून ठेवलंय तू तिला..उद्या लोकं म्हणतील, बायकोला ताब्यात ठेवावं नाहीतर त्या मानव सारखं होईल"

माईंचे हे शब्द मानवच्या जिव्हारी लागले. खरंच आपण तनिषाला प्रमाणाबाहेर सूट दिली का? तिच्या स्वातंत्र्याचा तिने विपर्यास केला..इतकी वर्षे घराबाहेर कुणी राहूच कसं शकतं? स्पर्धा, यश, पैसा हे सगळेच मिळवतात पण आपल्या कुटुंबाला सांभाळून.. असं संन्यास घेतल्यासारखं कुणी अज्ञातवासात जातं का?

मानवच्या मनात पुन्हा एकदा पुरुषी अहंकार जागृत होऊ लागलेला. Credit goes to "माई".
****

(भारतातील शब्दांतर ऑफिस)

"इनाया मॅम इथले महत्वाचे निर्णय घ्यायला आता एखादा CEO हवा..आतापर्यंत भैरव सर बघत होते पण आता तेही नसणार..प्रत्येकवेळी प्रत्येक निर्णयाला मॅनेजमेंटचे मत घेऊन पोल घेऊन निर्णय घ्यायला खूप कठीण होईल.."

"नवीन CEO, कुणी आहे का तुमच्या डोक्यात?"

"मॅम तुम्ही स्वतः.."

"ते तर मी केव्हाच होऊ शकले असते, पण ती जागा फक्त तनिषाची आहे.."

"मॅम तुम्हाला या खुर्चीवर बसायचं नाही, आर्या मॅम इथे नाही, भैरव सर आता नाही म्हणताय...पण कुणीतरी हवं ना इथे?"

क्रमशः

(तुम्हाला काय वाटतं, कोण हवा शब्दांतरचा नवीन CEO? कमेंट्स मध्ये नक्की सांगा)
0

🎭 Series Post

View all