गाडी सिग्नलला थांबली तशी निशाची नजर शेजारच्या रिक्षात बसलेल्या वृद्ध जोडप्यांवर पडली.
तितक्यात त्या वृद्ध महिलेनं निशाला ओळखलं आणि तिच्याकडे पाहून हसली.
निशाने तूसडेपणाचे भाव आणत चेहरा समोर फिरवला आणि कार चालवत निघून गेली.
तितक्यात त्या वृद्ध महिलेनं निशाला ओळखलं आणि तिच्याकडे पाहून हसली.
निशाने तूसडेपणाचे भाव आणत चेहरा समोर फिरवला आणि कार चालवत निघून गेली.
निशा निघून तर गेली खरी पण त्यांचा तो उदास आणि थकलेला चेहरा तिच्या नजरेतून सुटला नाही. मग
६० सेकंदाचा तो सिग्नल तिला ६ वर्ष मागे घेऊन गेला.
६० सेकंदाचा तो सिग्नल तिला ६ वर्ष मागे घेऊन गेला.
सहा वर्षांपूर्वी........
निशा आणि समीर . दोघांची ओळख एका कॉमन मित्राद्वारे झाली होती. पाहताच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनी ठरवून एकाच कॉलेजमध्ये एकाच फील्ड मध्ये ॲडमिशन घेतले.
अभ्यासाबरोबरच दोघांच एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास वाढत गेला.
अभ्यासाबरोबरच दोघांच एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास वाढत गेला.
काही काळाने दोघांनाही वेगवेगळ्या नामांकित कंपनीमध्ये भरघोस पगाराची नोकरी मिळाली.
समीरने बऱ्याचदा आपल्या आईवडिलांना निशाबद्दल सांगितले होते.
त्यामुळे एकदा तो त्यांना भेटवायला निशाला आपल्या घरी घेऊन गेला.
आईवडिलांना निशा सून म्हणून फार आवडली. मग त्यांनी सरळ निशाच्या आईवडिलांना मागणी घातली.
त्यांनीदेखील हसत हसत होकार कळवला.
त्यामुळे एकदा तो त्यांना भेटवायला निशाला आपल्या घरी घेऊन गेला.
आईवडिलांना निशा सून म्हणून फार आवडली. मग त्यांनी सरळ निशाच्या आईवडिलांना मागणी घातली.
त्यांनीदेखील हसत हसत होकार कळवला.
त्याच्या पुढच्याच वर्षी दोघांचं लग्न लावून द्यायचं असं ठरलं.
पण नशिबाला हे मंजूर नव्हतं.
नेहमी भेटणारा , फोनवर भरपूर गप्पा मारणारा ,निशाची भरभरून काळजी करणारा समीर कुठेतरी हरवत चालला होता.
निशाला हे जाणवलं तसं तिने समीरला विचारलं पण त्याने कामाचं खूप प्रेशर आहे. टार्गेट्स वाढले आहेत त्यामुळे operations टीम चा पण वर्कलोड आला आहे म्हणून दुर्लक्ष होतंय असं कारण दिलं.
निशाने दुसरी नोकरी बघण्याचा सल्ला दिला त्यावर समीर म्हणाला, सध्यातरी तसं काही नाही जर खूपच काही इश्यू झाला तर मी ऑन द स्पॉट resignation देईल.

दुसऱ्याच आठवड्यात निशाला जबरदस्त धक्का बसला जेव्हा समीरने तिला कॅफेमध्ये भेटायला बोलावले आणि सांगितले की लग्न नाही करू शकणार त्यामुळे प्लीज मला विसर आणि तुझं पुढचं आयुष्य बघ .
मला कंपनीतर्फे ५ वर्ष सिंगापूर ला पाठवत आहे त्यामुळे मी १ आठवड्याने निघणार आहे.
सध्या मला नोकरी आणि करियर महत्त्वाचं आहे.
निशाने खूप आकांडतांडव केला त्याला, त्याच्या आईवडिलांना समजावले . ५ वर्ष वाट पहायची तयारी दाखवली पण आईवडिलांनी मुलाची इच्छा आहे असं म्हणत हात वर केले होते.
मग रागाच्या भरातच निशाने देखील आईवडिलांना सांगून त्यांचा पसंतीने आशिष सोबत लग्न केले. निशा आणि आशिष चा सुखी संसार होता. आशिष निशाला खूप जीव लावायचा त्यामुळे निशा समीरला पूर्ण विसरून गेली.

आज अचानक तिने समीरच्या आईवडिलांना पाहिले आणि जुन्या गोष्टी आठवल्या.
समीर एव्हाना भारतात आला असेल का? की लग्न केलं असेल आणि तिथेच सेटल झाला असेल ?
काहीही असो पण त्याची आई खूप थकलेली वाटत होती.
तसाही माझ्या मनात आता समीरला स्थान नाही पण एकदा आई वडिलांना बघून यायला हवं.
समीर एव्हाना भारतात आला असेल का? की लग्न केलं असेल आणि तिथेच सेटल झाला असेल ?
काहीही असो पण त्याची आई खूप थकलेली वाटत होती.
तसाही माझ्या मनात आता समीरला स्थान नाही पण एकदा आई वडिलांना बघून यायला हवं.
दुसऱ्या दिवशी निशा समीरच्या घरी गेली . पण आतून दुसऱ्याच एका अनोळखी बाईने दार उघडले. निशाने आपले येण्याचे कारण आणि समीरच्या आई वडिलांची चौकशी केली.
अनोळखी स्त्री - मॅडम आम्ही इथे ५ वर्ष झाले राहत आहोत. या घराचे ते जुने मालक होते. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी आम्हाला हे घर विकले आणि आता कोणत्यातरी NGO की संस्थेमध्ये राहत आहेत. याशिवाय मला जास्त काय माहित नाही. असे म्हणून त्या बाईने दार बंद केले.
समीर sssssssss मृत्यू sssssssss कधी ...??? कसा ??????
निशाला खूप मोठा धक्का बसला.
एकेकाळी ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला ज्याला आपलं सर्वस्व मानलं तो या जगात नाही.
रडत रडत ती आपल्या माहेरी आली.
आई वडिलांना तिने ही बातमी सांगितली .
एकेकाळी ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला ज्याला आपलं सर्वस्व मानलं तो या जगात नाही.
रडत रडत ती आपल्या माहेरी आली.
आई वडिलांना तिने ही बातमी सांगितली .
आई वडिलांनी तिला रडू दिले . शांत झाल्यावर आईने तिला पाणी प्यायला दिले .तोवर वडिलांनी एक नंबर डायल केला. थोड्याच वेळात दाराची बेल वाजली. समीरचे आईवडील आत आले.
त्यांना पाहून निशा आणि समीरची आई एकमेकांना मिठी मारून रडू लागल्या.
त्यांना पाहून निशा आणि समीरची आई एकमेकांना मिठी मारून रडू लागल्या.
समीरचे बाबा म्हणाले....बाळा तो कधीच परदेशी गेलां नाही ना त्याला कसलं कामाचं टेन्शन होतं.
खरतर एकदा घरी असताना त्याचे डोके तीव्र दुखू लागले , अचानक चक्कर येऊन कोसळला म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो .
डॉक्टरांना शंका आली त्यांनी टेस्ट केली रिपोर्ट्स आले.
ब्रेन ट्यूमर.....! फक्त ५ महिनेच होते त्याच्याकडे.

त्याच्या जाण्याने तुला दुःख होऊ नये तुझं आयुष्य त्याच्याभोवती थांबू नये म्हणून प्रेमभंगाचा चटका तुला देऊन गेला.
निशाचे बाबा - सावर निशा स्वतःला ....खरंतर समीरने आम्हाला जाण्याआधी ही गोष्ट सांगितली होती.तुला कधीच हे कळू द्यायचं नाही ही त्याचीच शेवटची इच्छा होती शिवाय त्याने हे जग सोडायच्या आधी तुझं लग्न पहायचं होतं त्याला.
जर तुला हे माहीत झालं असत तर तू कधीच लग्न केलं नसतं. त्याच्या आठवणीत झुरत राहिली असती.
जर तुला हे माहीत झालं असत तर तू कधीच लग्न केलं नसतं. त्याच्या आठवणीत झुरत राहिली असती.
तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला आशिषला आम्ही ही कल्पना आधीच दिली होती. तुझ्या लग्नाच्या सोहळ्याचे फोटो व्हिडिओ त्याने हॉस्पिटलमध्ये पाहिले आणि त्याच्या २ दिवसानंतर त्यानं समाधानाने ह्या जगाचा निरोप घेतला.
हे ऐकून निशा समीरचं नाव घेत रडू लागली. ...
ज्याला ती स्वार्थी, मतलबी माणूस समजत आली तोच तिच्यावर निस्वार्थ प्रेम करून निघून गेला होता.
ही कथा एक सत्यघटना आहे . मात्र वास्तवातला समीर हा टीबी या आजाराने निघून गेला आणि निशाने त्याला शेवटपर्यंत साथ दिली आणि नंतर त्याच्या इच्छेनुसार लग्न पण केले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा