"ओझं"
लहानपणा पासुन आर्या आईला कायम म्हणायची, आई तू ताईचा खूप लाड करते माझा नाही. तीच तुझी लाडकी .
ती तुझ्यासारखी गोरीपान आहे ना. मी काळी म्हणुन मी तुला आवडत नाही.
नाही ग बाळा, आईला आपली सगळी मुलं सारखीच असतात. काळी, गोरी असे आईच्या मनात कधीच येत नाही.
बाबा पण तसेच, ते पण ताईचाच लाड करतात. लहानपणी तिची कशीबशी समजुत काढत होतो.
पण जशी मोठी झाली तिला उत्तर देणे आम्हा दोघानाही जमत नव्हते. काय सांगावे तिला हाच प्रश्न कायम पडायचा.
उद्या आदिराची कॉलेजची ट्रीप जाणार होती. इतक्या लांब ती पहिल्यादांच जाणार होती.तिचे बाबा सुट्टी घेऊन तिला हवे नको ते बघत होते.
या आधी आर्याची ट्रीप दोन दिवसासाठी गेली होती.
सगळी तयारी करून दिली होती. पण बाबांनी सुट्टी घेऊन माझी तयारी का नाही करून दिली म्हणून आज इतकी मोठी असूनही गाल फुगवून बसली होती.
आदिरा तिला सांगत होती. आर्या तुझ्या सोबत मी होते ना. आपण दोघींनी मिळून तुला हवे नको ते आणले होते की नाही. कदाचित बाबांना तेव्हा वेळ नसेल.
थोडे समजून घे ना राजा !
नाहीतर मी माझे जाणे रद्द करते !
आपण दोघी मज्जा करू !
नाही ग ताई !
तु जा !
माझी तुझ्या बद्दल तक्रार नाहीच.
पण तूच सांग, आईबाबा नेहमी असे करतात की नाही.
माझ्या लाडक्या आर्याताई, असे काही नाही हा तुझा समज तु करून घेतलेला.
आणि तु कायम म्हणते मी काळी म्हणून तुम्हाला आवडत नाही.
तु आरश्यात कधी स्वतःला निरखून पाहिले का?
अग किती रेखीव आहेस?
मी फक्त रंगाने उजळ असेल कदाचित.
पण रेखीव तूच!
कितीदा तू खूप छान तयार झाली आणि बाहेर जाऊन आली की तुला कणकण जाणवायची. मग आई म्हणायची नजर लागली असेल माझ्या ब्लॅक ब्युटी ला. आणि मग दोन, तीन दिवस तुझी नजर काढावी लागायची . आठवत ना !
हो ग तायडे !
खरच असे व्हायचे मला !
आत्ताही होते !
आणि आई नजर काढते .
मग मला सांग सुंदर कोण ?
मला कधी लागली का कोणाची नजर?
मग सुंदर कोण ?
आमची आर्याच ना !
आपण दोघी आईबाबांना सुध्दा सारख्याच ग.
ताई हे मात्र मला मान्य नाही. तूच दोघांची लाडकी.
बरं, पण तू माझी लाडकी आहेस ना !
तायडे, love you!
Love you too !
ताई जा तू पिकनिक ला!
मजा कर !
आदिरा बॅग भरत होती. आर्या आई जवळ येऊन पुन्हा म्हणाली.
आई!
खर सांग ना !
तुला आणि बाबांना ताई जास्त का आवडते?
मला हे जाणवते नेहमी!
आर्या खर सांगु!
हो आई!
मला असे वाटत नाही तर जाणवते.
मला कारण कळले पाहिजे!
तू तिच्यावर जास्त प्रेम करत राहा !
मला काही वाटणार नाही.
पण मला कारण सांग!
ताई कुठे आहे?
ती तिच्या रूम मध्ये बॅग भरते.
आर्या, ताई माझी मुलगी नाही .
काय ?
होय बेटा !
आदिरा तुझ्या वडिलांच्या मोठ्या भावाची मुलगी.
मग तिचे आईबाबा?
या जगात नाहीत!
काय ?
सांगते सगळ!
आमच्या लग्नाच्या आधीच तुझे आजी आजोबा एका कार accident मध्ये वारले.
सुधीर तुझे काका म्हणाले, तुमचे एकमेकांवर प्रेम आहेच तर तुम्ही लग्न करून घ्या. मला घरी सगळेच ओळखत होते. आजी गेल्यावर घराला एका स्त्री ची गरज होतीच.
लहान असून आधी आमचे लग्न झाले.
दोन वर्षाने तुझे काका सुधीर यांचे लग्न प्रिया काकु बरोबर झाले.
घरात मी एकटीच, सगळी कामं एकटीला करावी लागायची.
प्रिया काकु लग्न करून या घरात आली. आणि माझ्या मोठ्या बहिणीची जागा घेतली. मला म्हणायची सलोनी दोन वर्ष तु एकटीने या घराचा डोलारा सांभाळला. आता जरा आराम कर .
मी आहे!
आम्ही दोघी सख्ख्या बहिणी सारख्या राहिलो. दोन वर्ष खूप फिरलो , मजा केली. सगळी काम हसत खेळत करत गेलो. भांडणं, अबोला आम्हाला माहीतच नव्हता.
एक दिवस प्रिया काकु सकाळी उठली ती उलट्या करतच. Acidity असेल म्हणून घरातले medicine दिले . लिंबू पाणी पाजले.
पण आराम नाही.
मग माझ्याच लक्षात आले, मी म्हणाले प्रिया ताई good news तर नसेल ना ग?
मग ती म्हणाली अग हो, माझा महिना टळून गेला ग!
मग मी तुझ्या बाबांना, काकांना नाचून नाचून ही आनंदाची बातमी सांगितली. Kit आणून टेस्ट केली positive निघाली. आनंदाला उधाण आले. परोपरीने प्रिया ताईला आम्ही जपत होतो.
त्याच वेळी तुझ्या सुधीर काकांना थोडा हृदयाचा त्रास झाला. पण लवकर बरे वाटले.
ताईचे डोहाळे जेवण दोन्ही घरी जोरात झाले. त्यांचे माहेर जिथे होते तिथे डॉक्टरांच्या इतक्या सोई सुविधा नाहीत म्हणून मग इकडेच बाळंतपण करायचे ठरले.
आजूबाजूच्या बायका म्हणायच्या तुझ्या मागुन येऊन नंबर लावला हो!
मी म्हणायचे त्यांचाच नंबर आधी होता. ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत ना.
आमच्या घरात बाळ येणार हा आनंद जास्त महत्वाचा नाही का?.
नऊ महिने नऊ दिवस भुर्रकन उडून गेले.
पहाटे पहाटे ताईच्या पोटात दुखायला लागले.
हॉस्पिटल मध्ये गेलो. बाळंतपणाच्या वेळी ताईला खूप त्रास झाला. ताई एकदम निपचित पडल्या.
डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले तुमच्या मिसेसला वाचवणे कठीण आहे आम्ही प्रयत्न करतो . बाळ मात्र सुखरूप आहे.
सुधीर काकांनी याचा धसका घेतला. ते जागेवरच कोसळले. त्यांना तिथेच admit केले. बाबा तुझ्या काकांजवळ आणि मी ताईची वाट पाहत ऑपरेशन थिएटर बाहेर.
अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर आले. तुम्ही आत जा म्हणाले. मी आत गेले, दुसरे डॉक्टर आणि नर्स होत्या.
डॉक्टर म्हणाले सॉरी!
आम्ही पेशंटला वाचवू शकलो नाही. पण बाळ सुखरूप आहे .
पांढऱ्या शुभ्र दुपट्यात लपेटलेले इवलेसे बाळ माझ्या हातात दिले.
मी एकदा बाळाकडे, एकदा जगाचा निरोप घेतलेल्या माझ्या ताई कडे आळीपाळीने पाहत होते.
ताई जवळ गेले, तिला खूप खूप हाका मारल्या. ताई एकदा डोळे उघडून तुझ्या बाळाकडे बघ ग.
बघ तो तुझ्याकडे पाहतो आहे.
तिचा हात बाळाच्या डोक्यावर ठेवला. बाळाचा गाल ताईच्या गालाला लावला. शेवटची पापी दिली .
मी बाळ दाखवायला सुधीर काकांकडे गेले.
दादा आता शुध्दीवर आले होते.
दादा बघा आपलं पिल्लू !
किती गोड आहे?
तुझ्या सारखे गोरे गोमटे दिसते सलोनी.
हो दादा!
दादांनी तिला जवळ घेतले.
एक पापी घेतली.
सलोनी, प्रिया कशी आहे?
माझ्या डोळ्यात पाणी आले.
मी जागीच थरथर कापायला लागले. तुझ्या बाबांनी आधार दिला.
काका समजून चुकले त्यांची प्रिया त्यांना सोडून गेली.
एका हातात बाळ, एका हाताने माझा हात धरला. बाबांना म्हणाले विनय चल.
आम्ही त्यांच्या सोबत आलो. ताई जवळ आल्यावर मला म्हणाले.
सलोनी हे बाळ घे. मी बाळाला माझ्या जवळ घेतले. विनय त्यांचा हात धरून उभे होते.
सलोनी, विनय हे बाळ सांभाळायची जबाबदारी तुमची.
हो दादा !
आपण हे बाळ सांभाळू, आम्ही आहोत!
आपण नाही!
तुम्ही!
हो दादा आम्ही नक्की सांभाळू.
तुम्ही आहातच सोबतीला!
नाही!
माझी सोबत इथेच संपली!
दादा तुम्ही हे काय बोलता?
सलोनी, मी तुझ्या प्रिया ताईला वचन दिले होते. तुला एकटीला कधीच सोडणार नाही.
आज ती एकटी कशी जाऊ शकते ?
मी तिच्या सोबतीला चाललो. हे बाळ मी तुमच्या ओटीत घालतो.
सलोनी, विनय मला माहीत आहे. तुम्ही ही अमानत प्राणा पलीकडे जपणार.
येतो मी!
सलोनी, पट्कन बाळाला तुझ्या जवळ घे!
माझ्या छातीत जोराची चमक आली.
मी बाळाला जवळ घेतले आणि काका प्रिया काकूंच्या शरीरावर उभ्यानेच पडले. क्षणात सर्व संपले.
त्या क्षणी मला वाटले, कदाचित मला आदिराचां सांभाळ करायचा असेल म्हणूनच ताईच्या आधी लग्न होऊन मला बाळ झाले नाही.
आता हीच आमची मुलगी.
तशीच उठले, डॉक्टरांना विनंती केली. या बाळाचे आईबाबा या जगात नाही. आम्ही काका काकु आहोत. आम्ही तिचा सांभाळ करू. तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही बाळाच्या नावापुढे बाबा म्हणून विनयचे नाव टाका.
डॉक्टर म्हणाले असे नाही करता येणार. मी खूप विनंती केली. त्यांना सांगितले हे बाळ आमचे म्हणून आम्हाला वाढायचे आहे. वडिलांचे नाव सुधीर बघून तिला कळेल आम्ही तिचे आईबाबा नाही आहोत. इवल्या जीवाला खूप त्रास होणार.
शेवटी डॉक्टर तयार झाले
तिच्या आणि माझ्या घरच्यांना निक्षून सांगितले . तिला आम्ही तिचे आईबाबा नाही हे कधीही कळता कामा नये. सगळ्यांनी हे कबूल केले.
ताईचे आणि सुधीर दादांचे चे सगळे विधी पार पाडले. तुझ्या बाबांनी त्यांची बदली दुसऱ्या शहरात करून घेतली. जिथे कुणालाच कळणार नाही आदिरा आमची मुलगी नाही.
दोन वर्ष लोटले, अचानक मला दिवस गेले. तेव्हा मी तुझ्या बाबांना म्हणाले. आपण हे बाळ abort करु. आपल्याला बाळ झाल्यावर आदिरा कडे दुर्लक्ष होणार.
पण दोन्ही घरच्या लोकांनी खूप समजावून सांगितले आणि तुझा जन्म झाला.
तु झाली त्याच दिवशी आम्ही तुझ्या डोक्यावर हात ठेऊन शपथ घेतली.
बाळा आम्हाला माफ कर!
पण आमचे पाहिले अपत्य आदिरा असेल. कळत नकळत तुझ्यावर अन्याय झाला तर आम्हाला नेहमी माफ कर.
म्हणून आमचे दोघांचे प्रेम आदिरा वर जास्त आहे.
नकळत आर्याच्या डोक्यातून अश्रु वाहू लागले.
आई मला माफ कर !
किती मोठे मन आहे तुमचे?
स्वतःच्या मुली पेक्षा जास्त तुम्ही ताईला प्रेम दिले .
सुधीर काकांना दिलेले वचन पाळत आले.
अभिमान आहे मला अश्या आईबाबांचा.
आर्या, मला कधी वाटते. माझी प्रिया ताई माझ्या पोटी जन्माला आली.
तुझ्या सारखीच होती काळी सावळी पण रेखीव.
आम्ही दोघी बाहेर गेलो की तिला तुझ्या सारखी नजर लागायची.
मग मी दोन, तीन दिवस तिची नजर काढायचे.
मला म्हणायची अग वेडी आहेस तु!
काहीही करते!
तुझ्या सारखा तिला नजर काढल्यावर आराम वाटायचा.
प्रिया ताई समजून तुझ्यावर प्रेम करतो. पण आदिरा, तिची बरोबरी प्रिया ताई कशी करू शकणार.
माझ्या प्रियाताई वर थोडा अन्याय झालेला चालेल मला समजून घेईल ती.
पण आदिरा, हेच आमचे पाहिले अपत्य. तिच्या सुखासाठी आम्ही काहीही करू.
हो आई, ताईच तुझी पहिली आणि लाडकी मुलगी.
आपण सगळेच तिचा लाड करू.
आई प्रिया काकु आणि सुधीर काकाचा एखादा फोटो आहे का ग?
मला बघायचा आहे.
अग माझ्या मोबाईल च्या स्क्रीन वर जो फोटो आहे तो त्या दोघांचा.
तुला एकदा विचारले होते तर तू म्हणाली माझी मैत्रीण आहे म्हणून.
मग काय सांगु?
आम्ही सर्व आठवणी आमच्या मनाच्या कप्यात दडवून ठेवल्या. त्यांचा कुठलाच फोटो आम्ही ठेवला नाही. चुकून कधी आदिराला दिसला तर!!!
आई बघू म्हणून तिने मोबाईल हातात घेतला. तेव्हढ्यात इतका वेळ दारा लगत कपाटाच्या मागे लपून बसलेली आदिरा बाहेर आली.
आई! असा तिने जोराने हंबरडा फोडला आणि सलोनीला कडकडून मिठी मारली.
सलोनी गोंधळून गेली. तिला काहीच सुचत नव्हते. जी गोष्ट आपण इतके वर्ष लपून ठेवली आता ती तिला कळून चुकली होती. आता ती कशी react होते याचीच तिला भीती वाटत होती.
आदिरा डोळे पुसत आईला म्हणाली.
आई !
देवाला प्रार्थना करते, पुढच्या जन्मात मला तुझ्या पोटी जन्म दे.
तु केलेल्या प्रेमाचं ऋण मी या जन्मात कधीच फेडू शकणार नाही.
त्यासाठी पुढचा जन्म तुझ्याच पोटी.
आई! आई म्हणत तिने सलोनीला पुन्हा मिठी मारली.
सलोनी आदिरा ! आदिरा!
करत तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली.
आज इतक्या दिवसाचं सलोनीच्या मनावरचं ओझं उतरलं होत.

©️®️
कृपया कथा शेअर करतांना माझ्या नावानिशी कथेत कोणताही बदल न करता करावी.
सौ. प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा