दिवाळीमध्ये काही वेगवेगळे पदार्थ खायला सगळ्यांना नक्कीच आवडतात......... त्यात नमकीन पदार्थ तर सगळ्यांचे खूप आवडते असतात.......... माझ्या घरात मला त्यासोबतच सगळ्यांना गोड पेक्षा जास्त नमकीन पदार्थ खायला आवडतात म्हणून मी नमकीन मध्ये खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवत असते.......... आजही आपण अशाच एका पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.........
साहित्य
१) एक कप तांदळाचे पीठ
२) दोन मोठे चमचे अमूल बटर
३) एक छोटा चमचा ओवा
४) एक छोटा चमचा कलोंजी
५) तळणीसाठी तेल
६) चवीपुरते मीठ
१) एक कप तांदळाचे पीठ
२) दोन मोठे चमचे अमूल बटर
३) एक छोटा चमचा ओवा
४) एक छोटा चमचा कलोंजी
५) तळणीसाठी तेल
६) चवीपुरते मीठ
कृती
आपण पहिल नॉनस्टिक कढईमध्ये दोन कप पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत....... त्या पाण्यामध्येच अमूल बटर आणि चवीपुरते मीठ घालून त्याला त्याच्यात बटर पूर्णपणे विरघळे पर्यंत त्या पाण्याला उकळवायचे आहे.......... आता त्या पाण्यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचे पीठ टाकून त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे ........ पाणी पूर्ण शोषून घेतल्यानंतर त्या पिठाला वाफेवर झाकण लावून पाच ते दहा मिनिटं ठेवून द्यायचे आहे..........
आता गॅस बंद करून झाकण उघडून त्याच्यामध्ये ओवा आणि कलौंजी टाकून थोडे थोडे पाणी घालून ते पीठ व्यवस्थित मऊसर मळून घ्या........... मलेल्या पिठाच्या चकलीच्या शाशाने छान चकल्या पाडून घ्या.........
एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यावे....... जेव्हा ते तेल व्यवस्थित गरम होईल तेव्हा मिडीयम आचेवर या चकल्या छान तळून घ्याव्या......... सगळ्यांना आवडणार आशा बटर चकली खाण्यासाठी तयार आहेत.........
तुम्ही पण तुमच्या घरी हा पदार्थ नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट्स करून कळवा......... रेसिपीला लाईक करायला विसरू नका.........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा