चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा
लघुकथा
"काकू.. ओ काकूsss तुम्ही सांगितलेले ठिकाण आले आहे." रिक्षाचालकाने जोरात आवाज दिला तशी साधना विचारांमधून बाहेर आली. तिने रिक्षामधून बाहेर डोकावून पाहिले आणि शेजारी सीटवर ठेवलेली पर्स हातात घेऊन ती रिक्षामधून उतरायला लागली पण उतरण्याअगोदर तिने स्वतःचा चेहरा आरशात न्याहाळला आणि खांद्यावर असलेला साडीचा पदर नीट करून ती रिक्षामधून खाली उतरली.
एक दीर्घ श्वास घेऊन साधना कॅफेच्या पायऱ्या चढायला लागली. कॅफेमध्ये पोहचल्याबरोबर साधनाने चोहीकडे नजर फिरवली. प्रत्येक टेबल आणि खुर्चीवर
तरूण मुलं मुली बसले होते. त्यातील काही मुलं मुली तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले, साधनाला अगदी ओशाळल्यागत झाले खरे आणि ती त्या कॅफेमधून बाहेर पडणार इतक्यातच तिचा फोन वाजला. साधनाने फोन उचलला.
एक दीर्घ श्वास घेऊन साधना कॅफेच्या पायऱ्या चढायला लागली. कॅफेमध्ये पोहचल्याबरोबर साधनाने चोहीकडे नजर फिरवली. प्रत्येक टेबल आणि खुर्चीवर
तरूण मुलं मुली बसले होते. त्यातील काही मुलं मुली तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले, साधनाला अगदी ओशाळल्यागत झाले खरे आणि ती त्या कॅफेमधून बाहेर पडणार इतक्यातच तिचा फोन वाजला. साधनाने फोन उचलला.
"हॅलो रावीsssss"
" मी ट्रॅफिकमध्ये आहे आणि दहा मिनिटात कॅफेमध्ये पोहचत आहे आणि मी तिथे येईपर्यंत तुम्ही अजिबात कुठेही बाहेर पडायचे नाही. आपल्या नावाने मी टेबल नंबर ११ बुक केला आहे तुम्ही तिथे जाऊन बसा, मी आलेच." साधना पुढे काही बोलायच्या आतच समोरून फोन कट झाला.
'कायं करायचे या मुलीचे? ऐकूनच घेत नाही. कधी कधी तर वाटते ही नजर ठेवून आहे की कायं? ' मनातल्या मनात विचार करत साधना टेबल नंबर ११ वर जाऊन बसली. आजूबाजूला असलेली काही मुले अजूनही तिच्याकडे पाहत होती ते पाहून साधनाने तिची मान खाली वळवली.
'या रावीने इथेच का बोलावले? ती घरी सुद्धा बोलू शकली असती. नक्की कायं बिनसलं असेल बरं तिच्यामध्ये आणि दुर्वेशमध्ये की थेट घटस्फोट घ्यायचा विचार करतेय? ', साधना विचार करतच होती इतक्यात रावी तिथे आली.
"सॉरी आई उशीर झाला मला. बरं मला सांगा मी आपल्यासाठी काय ऑर्डर करू? काही खायला मागवू की कॉफी घ्यायची?" खुर्चीवर बसता बसता रावीने एकामागे एक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. साधना मात्र मूग गिळून गप्प बसली होती आणि रावीकडे आश्चर्याने पाहत होती.
"आईss" रावीने पुन्हा एकदा आवाज दिला तशी साधना "ह्म्म्मss " म्हणून तिच्याकडे पहायला लागली.
"मी आपल्यासाठी कॉफी आणि सँडविच ऑर्डर करते. खूपच भूक लागली आहे मला. तुम्हाला चालेल..?" साधनाने रावीच्या प्रश्नावर फक्त मान डोलावली. रावीने वेटरला बोलावून त्या दोघींसाठी सँडविचेस आणि कॉफी ऑर्डर केली.
आता मात्र साधना ताईंचा धीर सुटला त्यांनी रावीला थेटच विचारले.
" रावी खूप झालं आता माझा संयम संपला.. मला सांग तू इथे का बोलवलं मला? आपण घरी सुद्धा बोलू शकलो असतो? नक्की कायं झालं तू एवढा मोठा निर्णय घेतला? दुर्गेश काही बोलला का?" साधना ताईंची एकावर एक प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.
" रावी खूप झालं आता माझा संयम संपला.. मला सांग तू इथे का बोलवलं मला? आपण घरी सुद्धा बोलू शकलो असतो? नक्की कायं झालं तू एवढा मोठा निर्णय घेतला? दुर्गेश काही बोलला का?" साधना ताईंची एकावर एक प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.
रावीने त्यांना शांत केले सर्वात अगोदर.
" आई.. तुम्ही अगोदर शांत व्हा बघू.. सर्वात अगोदर तर कान पकडून माफी मागते की मी तुमच्याशी खोटं बोलले. "
" आई.. तुम्ही अगोदर शांत व्हा बघू.. सर्वात अगोदर तर कान पकडून माफी मागते की मी तुमच्याशी खोटं बोलले. "
" खोटं?? " रावीचे बोलणे ऐकून साधना ताई अधिकच गोंधळतात.
"आई खरंतर दुर्गेश आणि माझ्या मध्ये काहीच वाद नाही झाले आणि मी घटस्फोट देखील घेत नाही आहे."
"रावी मगं का इथे बोलावले तू मला? आणि हे सगळे कशासाठी? " साधना ताई थोड्याशा चिडल्या.
" आई तुम्ही अगोदर शांत व्हा.. मी हे खोटे बोलले ते तुमच्यासाठी.. मी लग्न होऊन घरात आल्यापासून पाहतेय की तुम्ही फक्त किचन आणि घर यामध्येच सतत गुंतलेल्या असतात. इतक्या दिवसात मी तुम्हाला फार कोणाशी फोनवर बोलताना देखील पाहिले नाही. तुम्ही बाहेर देखील फार कुठे जात नाही.. तुमच्याकडे असलेले अनेक कलागुण पाहिले आहेत मी.. शिवाय तुम्हाला बाहेर फिरायला खूपच आवडते हे देखील मला समजले आहे पण इतक्या वर्षात तुम्ही स्वतःला घरात इतके गुंतून घेतले आहे की तुम्हाला स्वतःचा देखील विसर पडला आहे.
मी माझ्या आईकडे पाहते तुमच्याकडे तेव्हा मला कायमच वाटतं तुम्ही देखील बाहेर पडावं.. माझ्यासोबत फिरायला यावं पण घरी तुमच्याशी कधी बोलताच आलं नाही म्हणून आज खोट बोलून मी तुम्हाला इथे बोलावलं.
आई माझ्याशी मैत्री कराल का? मला ना तुम्हाला असेच कॉफी प्यायला, बाहेर फिरायला घेऊन जायचे आहे माझ्यासोबत.. माझ्या गमतीजमती बोलायच्या आहेत.
सासू सून या नात्याने आपण बांधलो असलो तरी तुम्ही आणि मी खूप छान मैत्रीण सुद्धा होऊच शकतो ना? " रावीचे बोलणे ऐकून साधना ताईंचे डोळे भरून आले.
" रावीs आजपर्यंत माझ्या मुलाने सुद्धा माझा एवढा विचार नसेल केला आणि मी देखील माझा विचार नाही केला पण खरंच किती विचार करते गं तु माझा.
तुझं अगदीच बरोबर आहे बाळा आपण मैत्रीणी होऊच शकतो. तू मला तुझ्या या नव्या जगातील सगळ्या गोष्टी शिकवशील का गं?"
"हो ना आई.. मला आवडेल उलट.. " रावीने साधना ताईंच्या हातावर हात ठेवला आनंदाने. इतक्यात वेटर कॉफी घेऊन आला. रावीने आणि साधना ताईंनी कॉफीचा कप उचलला.
" चिअर्स.. टू अवर मैत्री... " म्हणतं दोघींनी कॉफीचा कप तोंडाला लावला.. एका नव्या मैत्रीची सुरूवात झाली.
*समाप्त*
©ऋतुजा कुलकर्णी - सावजी✍️
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा