हे सगळे आठवत असताना अचानक तिला क्षितिजा ची आठवण येते. " क्षितिजा माझ्याबाबतीत चुकीचं वागेल. पण आईच्या बाबतीत असं काही वागणार नाही. हर्षद ला काहीतरी गैरसमज झाला असणार. हर्षद नाहीय तो पर्यंत मी तिला बोलवून घेते आणि बोलते तिच्याशी..असे म्हणून देवयानी क्षितिजाला फोन लावते. सुरवातीला ४-५ वेळा प्रयत्न करूनही फोन लागत नाही. सहाव्यांदा फोन लागतो. काही वेळ रिंग वाजल्यावर समोरून फोन उचलला जातो.
" हॅलो.. क्षितिजा..मी देवयानी..तुझ्यासोबत बोलायचं होत."
" काय बोलणार आहेस तू माझ्यासोबत हो जे झालं ते माझ्यामुळेच झालंय...."
एवढं बोलून फोन कट होतो.....
To Be Continued...
अपने ही गिराते हैं नशेमन पे बिजलियाँ
अपने ही गिराते हैं नशेमन पे बिजलियाँ
ग़ैरों ने आ के फिर भी उसे थाम लिया है
उम्र भर का ग़म हमें ईनाम दिया है
दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है....
उम्र भर का ग़म हमें ईनाम दिया है...
देवयानी संपूर्ण तुटून जाते. क्षितिजा असं काही करेल ह्याचा विचार तिने स्वप्नात देखील केलेला नसतो. आपण मैत्री करण्यात चुकलो की माणूस ओळखण्यात ह्याच विचारात ती रडत बसलेली असते.
काही वेळाने हर्षद तिच्यासाठी खायला घेऊन येतो आणि त्याला बघून देवयानीला अजूनच रडू कोसळते. तो तिला जवळ घेतो आणि शांत करायचा प्रयत्न करतो. आज हर्षद तिची एखाद्या लहान मुलीसारखी काळजी घेत असतो. तिला खायला आणलेलं स्वतःच्या हातांनी भरवतो. नंतर सगळे आवरून ठेवतो. तिला जवळ घेऊन झोपवतो. देवयानी दिवसभराच्या थकव्याने झोपी जाते.
हर्षद विचार करत बसलेला असतो. देवयानी सोबत जे घडतंय त्याच त्याला वाईट वाटत असतं. विचार करता करता त्यालाही झोप लागते. सकाळी दोघेही एकत्र लवकर उठतात. सगळे आवरून घेतात.
देवयानी - सगळी माणसं कालच येऊन गेली आहेत हर्षद. तुला कामाला जायचं तर जा मी थांबेन एकटी.
हर्षद - नाही मी सुट्टी सांगितली आहे ऑफिसमध्ये. तुला असे एकटीला सोडून मी नाही जाणार.
देवयानी च्या आईला जावून एक महिना होतो. सगळे हळूहळू पूर्ववत होत असते. मधल्या काळात हर्षद सुध्दा देवयानी ची खूप काळजी घेतो. तिला वेळ देतो. तिला हवे नको ते बघत असतो. अगोदरच्या हर्षदमध्ये आणि आताच्या त्याच्या वागण्यात खूप फरक पडलेला असतो. देवयानी आई गेल्याच्या धक्क्यातून सावरत असते. हर्षद देवयानीची लहान मुलाप्रमाणे काळजी घेत असतो.
ऑफिसमधे सुध्दा त्याच पोस्टिंग झालेलं असतं. त्याच्या ह्या प्रगतीने देवयानी खूप खुश असते. पण अचानक एक दिवस देवयानी ची तब्येत बिघडते. हर्षद देवयानीला दवाखान्यात घेऊन जातो. तर तिथे देवयानी आई होणार आहे आणि तो बाबा ही गोड बातमी त्याला मिळते.......दोघेही खूप खुश असतात. हर्षद देखील जमेल तशी देवयानी ची काळजी घेत असतो.
इथे क्षितिजा देवयानी बद्दल विचार करून तिची आठवण काढून रोज रडत असते. हे असे काय घडल आणि का घडल ह्याचे तर्क लावून ती वेडी झालेली असते. नक्की काय घडतंय आपल्या सोबत आणि का??? ह्याची तिला काहीच कल्पना नसते. आपली काहीच चूक नसताना देखील आपण देवयानीच्या नजरेत अपराधी आहोत आणि हे आपण तिला बोलूही शकत नाही. ह्याच विचाराने तिला दिवसरात्र वेढलेल असतं. काहीतरी लिहीत बसायचं किंवा मग गाणी ऐकत बसायचं हाच क्षितिजाचा दिनक्रम असतो. ती कुठे आहे काय करते? काय खाते? जिवंत आहे का? हे कोणालाच माहीत नसत. देवयानी आपल्या पासून लांब गेलीय ह्या धक्क्याने तिने स्वतःला एका बंद खोलीत कोंडून घेतलेलं असते. देवयानीचे ते रिसॉर्टच्या बाथरूम मधले फोटो त्यानंतर घडलेला प्रत्येक प्रसंग आणि देवयानीच्या आईने तिला फोन करून भेटायला बोलवण त्यातच त्यांचं असे अचानक मृत्यू होणे. त्यांना काय बोलायचं असेल माझ्यासोबत? हे सगळे प्रसंग क्षितिजाला सतत सतावत असतात.
देवयानी कशी असेल? ती स्वतःची काळजी घेत असेल ना? हर्षद तिच्यासोबत कसा वागत असेल? आईच्या मृत्यूनंतर तिने स्वतःला सावरलं असेल ना? असे अनेक प्रश्न तिला पडत असतात. पण काय करणार देवयानी चा फोन लागत नसतो. त्यांनी घर देखील बदलेल असतं आणि हर्षद फोन उचलत नाही. देवयानीला भेटायचं तर तिला माझा चेहरा सुद्धा बघायचा नाहीय. एवढा राग का? तेही एवढ्या जीव लावणाऱ्या मैत्रिणीवर... मी तिच्या बद्दल कधीच चुकीचा विचार केला नाही ना कधी तिचं वाईट व्हावं असे वाटल. तरी सुद्धा आमच्या मैत्रीत हे असे फाटे का फुटत गेले? असे का घडले? देवयानीला कळत नाहीय का.. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत.. मला तिला बघायचे आहे. एकदा तिचा आवाज ऐकायचा आहे. एकदा तिला मिठी मारून रडायचे आहे... असे कोणीही येईल आणि आम्हाला लांब करेल असे नाही होऊ शकत. मी ह्या सगळ्या विचारांनी स्वतःचा जीव गमावेन. पिल्लु एकदा भेट ग मला एकदा भेट...क्षितिजा हुंदके देऊन रडत असते.
क्षितिजा तशीच कविता वाचत रडत झोपते...
वाटते भेटावे तुला
विसरुनी ह्या जगाला...
धावत यावे ह्या क्षणाला
सांगावे मनातले तुला...
गैरसमज आपल्यात खूप असतील
पण विसरू नको तू माझ्या प्रेमाला...
आठवतात ते दिवस मला
जेव्हा आपण भेटलो होतो...
रडता रडता क्षितिजाला कधी झोप लागते कळत नाही. तिचे सगळे दिवस सारखेच चाललेले असतात. देवयानी तिच्यासाठी तीच सर्वस्व असते. तिने तीच सर्व काही गमावलेले असते. चूक नसतानाही ती सतत चुकीची ठरत असते. सगळ्या गोष्टी वेगाने घडत असल्याने तिला स्वतःची बाजू मांडायची किंवा स्वतःला सिद्ध करायची वेळ सुद्धा मिळत नाही.
देवयानी गरोदर असण्याची बातमी सगळ्यांना कळते. तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा सगळे तिची काळजी घेत असतात. बघता बघता दोन महिने निघून जातात. हर्षदची कामावरची आणि घरातली जबाबदारी वाढलेली असते. त्याची ह्या सगळ्यात खूप धावपळ होत असते पण तो खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडत असतो. देवयानी सुध्दा आता सावरलेली असते. सगळ्यांमध्ये मिळून राहत असते. पण आईची उणीव तिला नेहमी भासत असते. आज आई असती तर माझे असे लाड केले असते. मला खायला काही ना काही बनवून दिलं असते. एका व्यक्तीमुळे मी किती काही गमावलं आहे. मी कधीच क्षितिजाला माफ नाही करू शकत. हर्षदमुळे मी स्वतःला सावरून शकले तो नसता तर मी एकटीने काय केलं असत. त्यात ह्या जगात एकट्या मुलीने जगायचं म्हणजे सगळ्यांच्या नजरा बदलणार. मी हर्षदला कधी thank you सुद्धा नाही बोलले. तो किती करतोय माझ्यासाठी. नवरा असल्याची सगळी कर्तव्य पार पाडतो. आज लवकर घरी जाते आणि हर्षद साठी काही तरी छान surprise करते. देवयानी आपल्याच विचारात असताना चार वाजतात. देवयानी मैत्रिणी सोबत चहा घेते आणि थोडी फ्रेश होते.
हर्षद आज घरीच असतो. अचानक कोणीतरी दरवाजा ठोकत. हर्षद विचार करत उठतो. आता कोण असेल जरा शांत रहाव म्हणतो तर साला यायलाच हवे कोणाला तरी. कोण आहे काय माहित तसाच बडबडत दरवाजा उघडतो. हर्षद दरवाजा उघडताच ती व्यक्ती घरात शिरते आणि हर्षद ला बडबड करायला लागते.
" काय रे हर्षद तू तर तिला माझ्याकडे पाठवणार होतास आणि हे काय तू तर इथे संसार मांडलास. इथपर्यंत ठीक होत पण मी ऐकल की तुझे मुलं तिच्या पोटात वाढतंय. काय रे बाबा तू खरचं तिच्या प्रेमात वैगरे पडलास की काय. तस काही असेल तर सांग उगाच तुझ्यावर अवलंबून नाही राहणार मी मग ह्यासाठी दुसरा कोणी मुलगा बघतो. तुझ्याकडून काही जमायचं नाही हे काम आणि पैसे दिले होते ते परत कर माझे. "
हर्षद त्याच्यावर ओरडतो दरवाजा तर बंद कर तू येताना सांगून नाही येऊ शकत का? आणि तू समजतो तसे काही नाहीय यार. असं काही नाहीय उगाच काही अर्थ लावू नकोस. तीच माझ्या गळ्यात पडली आणि हे तिच्या गरोदरपणाच विचारशील तर मलाच त्या दिवशी जरा आनंद घ्यायचा होता म्हणून केलं असच रे. मला वाटल नव्हत इतक्या लगेच ही गरोदर राहील ते.
" ते काही असो साल्या तू केलंय ना. तूच सगळे नीट कर. माझी भूक कधी भागवु मी की असच उपाशी राहू. मला जबरदस्तीच्या जेवणात काही मज्जा नाहीय. प्रेमाने वाढून हवंय. तू हो लवकर बाजूला म्हणजे मी पोटभर जेवतो."
दोघेही जोरात हसू लागतात. अचानक बाहेरून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज येतो. दोघेही धावतच बाहेर जातात तर देवयानी असते.
देवयानी दरवाजाच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. ते दोघेही तिला उचलून घरात आणतात आणि तिला उठवायचा प्रयत्न करतात. हर्षद तिच्या तोंडावर पाणी मारतो तरी देवयानी उठतं नाही.
हर्षद त्या व्यक्तीला ओरडतो. तरी तुला सांगत होतो. सांगून येत जा. आता हिने सगळे ऐकलं असेल तर तू निघ आता इथून. मी डॉक्टरला बोलवत आणि बघतो हिला काय झालंय ते . तुझ्यामुळे एक दिवस मला फाशी घ्यावी लागणार आहे. अरे काय बघतोस निघ आता जा. मी सांभाळतो सगळे. तसे ही ऐकलं असेल तर ऐकू दे कधी ना कधी कळणारच होत. ती व्यक्ती तिथून निघून जाते.
हर्षद डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो. डॉक्टर देवयानीला तपासतात. " ती येईल थोड्या वेळात शुद्धीवर पण आताच काही सांगता येणार नाही. असे होत ह्या दिवसात पण काळजी घ्यायला हवी ह्यांची. शुद्धीवर आल्यावर ह्यांची एक सोनोग्राफी करून घ्या. मग कळवा मला आणि वेळेवर जेवायला द्या त्यांना.
हर्षद देवयानी शुद्धीवर यायची वाट पाहत असतो. काही वेळाने देवयानी शुद्धीवर येते पण ती काहीच बोलत नसते. हर्षद तिला पाणी देतो आणि तिच्यासाठी जेवायला घेऊन येतो. तिला जेवण भरवतो आणि गोळ्या देवून तिला आराम करायला सांगतो. ह्या दरम्यान दोघांमध्ये काहीच बोलणं होत नाही. हर्षद देवयानी जवळ बसलेला असतो. अचानक त्याचा फोन वाजतो. तो फोनवर बोलायला बाहेर जातो.
"काय रे. सगळे ठीक आहे ना.ऐकलं का तिने सगळे.?"
हर्षद - ऐकलं असते तर इतकी शांत नसती राहिली मला तरी वाटत नसेल ऐकलं. तू फोन करू नकोस सारखं ती झोपली की मी स्वतः हून फोन करतो तुला. चल बाय....
To Be Continued.....
( माफ करा. खूप उशिरा भाग पोस्ट करत आहे. अडचणी होत्या काही आहेत अजून पण त्या करता sorry...)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा